रहाणीमान बदललं तर...? (in Marathi and English)
(दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून) डॉक्टर A. सांगत होता, की वैद्यकीय व्यवसायाद्वारे तो बक्कळ पैसा कमावतोय, पण प्रचलित वैद्यकातून खऱ्या अर्थाने रोगनिवारण होत नसल्याचं त्याला कळून चुकलंय. ...प्रामाणिक व्याधीमुक्तीच्या कामात A. स्वतःला झोकून देऊ इच्छितो. परंतु तसं केल्यास त्याच्या सध्याच्या रहाणीमानात बदल घडणार. खुद्द A. ला याची पर्वा नाही, मात्र पत्नी, मुलंबाळं या बदलाला आक्षेप घेतील. A. नं आपल्याला योग्य वाटणारा मार्ग पत्करल्यास त्याच्या कौटुंबिक जीवनाला तडे जातील. आप्तेष्टांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकणं, त्यांच्या हौसामौजा पुरवणं यात A. चा स्वार्थ गुंतला होता का? प्राप्त परिस्थितीत नेमकं काय उत्तरदायित्व होतं त्याचं?? ऐंद्रीय, भोगवादी मूल्यं निर्माण करून, त्यांना शरण जाऊन आपण घोर सामाजिक विपत्ती, युद्धं, क्रूराचार व दैन्याची पायाभरणी करत असतो, नाही का? उच्चभ्रू रहाणी सांभाळून, तीवर भर देऊन आपण निष्ठुरता, स्पर्धेबाजी व अहंमन्यतेने भरलेलं यंत्रवत्, बर्बर जग निर्माण करतोय, हो की नाही? ...बाह्य परिस्थितीला शरण गेल्याने - मग ती कौटुंबिक वा समाजिक ...