Posts

Showing posts from May, 2020

Intolerance to dream-ruptures

You wore black I wore white I couldn't resist the invitation to dine thigh to thigh in the loaded mess - ain't that what you wish to remember? We stopped to contemplate the parched old fountain, vacant signs of a bird, We walked, the unspent winter jingling thin in our pockets. Under petit vined arbor loosely I declined one invitation for another. That's what I remembered until another afternoon slid into my palm like chance cigarette. Why were you back? - And gone again? Excuse me. your absence, amongst all this death, wasn't counted apart. Your news, your return - your voice through the microphone slot couldn't touch me. It took an endless night, and water (less soft, more saline) to realize you were alive. ..Not such a bad surprise. One day you will pass, me too, but it hadn't been any of the last three days. Why do you come?  Why does a drowning face reappear? It better not, I thought, you better die - forgive me -

Observations - 27.05.2020

Image
Noon Evening Last rays

जॉर्ज बर्नार्ड शॉ, फुलं, प्राणी

पशुपक्षी माझे मित्र आहेत आणि मी आपल्या मित्रांना खात नाही. माझं शरीर म्हणजे प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणारं मसण व्हावं अशा माझी इच्छा नाही. मला फुलं आवडतात, मुलंही आवडतात. पण मी मुलांची मुंडकी छाटून, ती पाण्यानं भरलेल्या तबकांत मांडून माझं घर सजवत नाही. - जॉर्ज बर्नार्ड शॉ

लाओ-त्सू न्यायप्रमुख होतो तेव्हा...

Image
लाओ-त्सूच्या (ऊर्फ लाओझी / लाओ-त्से) शहाणीवेची ख्याती हळूहळू चीनभर पसरली, चीनच्या सम्राटाच्याही कानांवर गेली. आपली न्यायव्यवस्था या शहाण्या तत्त्वज्ञाच्या हाती असेल  तर... राजानं आपला मनोदय नम्रपणे लाओ-त्सूला कळवला: 'कृपया तुम्ही आपल्या साम्राज्याचे न्यायप्रमुख व्हाल का?' लाओ-त्सूनं वारंवार सांगितलं: 'बाबा रे, तू चुकीच्या माणसाला विचारतो आहेस. हे पद भूषवण्यालायक व्यक्ती मी नव्हे.'  पण सम्राटानं आपला विनवणीवजा आग्रह लावून धरला. अखेर लाओ-त्सू म्हणाला, "ठीक आहे. मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो. पुन्हा एकदा अगदी स्पष्ट सांगतो - माझं न्यायदान तुमच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही." पहिला दिवस. एका अट्टल दरोडेखोराला न्यायसभेत आणलं गेलं. नगरातील महाधनाढ्य व्यक्तीच्या खजिन्यावर या चोरानं लंबा हात मारला होता. लाओ-त्सूनं संपूर्ण प्रकरण ऐकून घेऊन आपला निर्णय सुनावला: चोर व धनाढ्य व्यक्ती दोघांनाही समान काळासाठी तुरुंगवास! "काय बोलताय काय तुम्ही! माझ्याकडे चोरी झाली, दरोडा पडला तर मलाच शिक्षा? मी का म्हणून कैदेत जावं, तेदेखील चोराइतक्याच काळाकरता? हा कुठला न्य

अलेक्झांडर व डायॉजिनिस

Image
सम्राट अलेक्झांडर विश्व पादाक्रांत करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला डायॉजिनिस दिसला. हा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे एक वल्लीच होती. अलेक्झांडरला त्याच्याविषयी कुतुहल वाटे. "आजचा दिवस विश्राम करा," तो सैन्याला उद्देशून म्हणाला, "आपण याठिकाणी तळ ठोकत आहोत. मी डायॉजिनिसकडे जाणार आहे. अनेक वर्षांपासून त्याला पाहण्याची इच्छा होती, कदाचित आज पुरी होईल. इथपासून काही मैलांवर तो मुक्कामाला आहे असं समजतं. त्याची भेट घेणं नक्कीच आवडेल मला." अलेक्झांडर डायॉजिनिसचा पत्ता शोधत निघाला. सकाळची वेळ होती. स्वारी नदीकिनारी ऊन खात पडली होती. फकीरवृत्तीचा डायॉजिनिस नग्नावस्थेत रहायचा म्हणतात. ...वाळूत पहुडलेल्या त्या नंग्या शरीराचं आगळंच तेज होतं. आगळंच रुपडं होतं ते. समाधान झळकत होतं त्या देहावर. महान सम्राट अलेक्झांडर डायॉजिनिसचपासून काही अंतरावर उभा राहून त्याचं जगावेगळं सौंदर्य न्याहाळत राहिला. अलेक्झांडर म्हणाला, "तुला पाहून मन प्रसन्न झालं. तुझ्यासाठी करण्याजोगं काही असेल, तुला देण्यायोग्य माझ्यापाशी काही असेल तर अगदी आनंदानं देईन मी." "तू जे देशील त्याची मला गरज

Observations - 05.05.2020

π   The desire to help is the most unexamined of human desires. π   A band of boys in our neighbourhood often plays loud music on stereo. They cut every song short - so annoying! - not listening anything through. They simply crave a distraction. I realize, upon observation, that the work of mind is much the same. What does it distract us from, then? π   Have you ever washed your self with moonlight?

ओळख

Image
 'ओळख' ( An introduction )    कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty)   राजकारणातलं फारसं कळत नाही, पण सत्तेत असणाऱ्यांची नावं ठाऊक आहेत मला, आणि ती आठवडयाच्या वारांसारखी किंवा महिन्यांच्या नावांसारखी घोकू शकते मी, अगदी नेहरूंपासून. मी भारतीय, दाट सावळी, मलबारमधे जन्मलेली तीन भाषा बोलणारी, दोनांत लिहिणारी, एकीत स्वप्नं पाहणारी. "इंग्लिशमधे लिहू नकोस", ते म्हणाले, "ती मातृभाषा नाहीय तुझी". - टीकाकारांनो, मित्रांनो, भेटायला येणाऱ्या भावंडा-बिवंडांनो, तुम्ही सगळे मला अंमळ एकटं का सोडत नाही? ..हव्या त्या भाषेत व्यक्त होऊ दया नं मला. मी जी भाषा बोलेन ती माझी होते तिचे विपर्यास, तिच्या वेडया कळा… माझं असतं सारं, फक्त माझं. तिचं थोडं इंग्रजी-थोडं भारतीय असणं विचित्र वाटेल कदाचित, पण ती प्रांजळ असते माझ्याइतकीच 'माणसाळलेली' असते, कळत कसं नाही तुम्हाला? ..ती असते माझ्या सुखांची, अभिलाषांची, माझ्या आशांची अभिव्यक्ती आणि मुख्य म्हणजे तिचा मला उपयोग होतो, कावळ्याला कावकाव किंवा सिंहाला गर्जना उपयोगी पडावी तसा. ती मानवी वाचा असते; त्या म

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग तीन

Image
  रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश     ( भाग एक इथे वाचा ) ( भाग दोन इथे वाचा )   आर्थर फिशर - मागे उरलेल्यांपैकी अजून एक. मात्र तो तगला, बुडाला नाही. देश सोडून जाताना फिशर कुटुंबीय त्याला इथेच टाकून निघून गेले. गोऱ्यांच्या राज्याचे असे 'जिवंत अवशेष' हे सामान्यतः अशिक्षित, मनदुबळे मुलगे असत. यांना कोणी आप्तस्वकीय नसत, आधाराला आपलं माणूस नसे. इंग्रजांना आपल्या अनौरस संततीबद्दल फारशी पर्वा नव्हती. आर्थर फिशरच्या सुदैवाने गार्ल बहिणींनी त्याला आश्रय दिला. या अँग्लो-इंडियन, अविवाहिता भगिनी पूर्वी शाळाशिक्षिका होत्या. त्या छोटेखानी बोर्डिंग हाउस चालवत असत. आर्थर त्यांच्या आउटहाउसमधे राहत असे, त्यांची छोटीमोठी कामं  करत असे. शिक्षण म्हणाल तर त्याला आपलं नाव तेवढं लिहिता येई, पण त्याच्या हातांत कसब होतं. आयत्यावेळी प्लायवूडची स्वस्तातील शवपेटी बनवण्यात इथल्या दफनयोजकाला आर्थरची बऱ्याचदा मदत होत असे.  रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांचा आर्थर लाडका होता. तो मुलांसंगे गोट्या खेळत असे, त्यांना भवऱ्याला गिरकी देण्यास शिकवत असे - मोबाईलवर चालणाऱ्या नंग्यानाचापायी आज हे

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग दोन

Image
  रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश     ( भाग एक इथे वाचा ) आणखी तो फॉस्टर बाबा - स्कॉटलंडच्या बॉनी प्रिन्स चार्लीचे आपण वंशज असल्याचा त्याचा दावा होता.  'टेल्स ऑफ फॉस्टरगंज ' या सुरस कादंबरीत मी फॉस्टरची कहाणी सांगितली आहे. 'फॉस्टरगंज' म्हणजे खरंतर 'बार्लोगंज', मसुरीतील एक उपनगर आहे ते. फॉस्टर वस्तुतः स्किनर कुटुंबाशी संबंधित होता, इंग्रजांच्या राज्यातील बऱ्यापैकी प्रतिष्ठित असा हा परिवार. मॉसी फॉल्सच्या दिशेने जाणाऱ्या उतारावर फॉस्टरच्या मालकीची थोडीथोडकी जमीन होती. वर्षानुवर्षं व्यसन केल्यामुळे तो शारीरिक व आर्थिकदृष्ट्या पिचला होता. बहुतेकदा तो दारुच्या नशेत तर्र होऊन पडलेला असे. फॉस्टर आपल्या सावत्र बहिणीसोबत राहत असे. तीसुद्धा दारुबाज होती. दोघांमधे 'तसले' संबंध असल्याची बोलवा होती. कालांतराने दोघांनी पुष्कळशी जमीन विकली, घराच्या छतावरचे पत्रे विकले, बरंचसं फर्निचरही विकून टाकलं. शेवटी ती दोघे पूर्वी जिथे तबेला होता तिथे, आउटहाउसमधे राहू लागली.  तुलनेनं सुस्थितीत असलेल्या अँग्लो-इंडियन्स व भारतीय ख्रिश्चनांनी हालाखीत ज

गोऱ्यांचं राज्य गेल्यानंतर.. भाग एक

Image
रस्किन बॉण्ड यांच्या आत्मवृत्तपर लेखनातील काही अंश ...१९५० साली माझं शालेय शिक्षण पूर्ण झालं तेव्हा बहुतांश इंग्रज व अँग्लो-इंडियन मुलं शाळा सोडून गेली होती. त्यांचे कुटुंबीय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडला स्थलांतरित होत होते. मुस्लिम मुलं (-एकूण विद्यार्थीसंख्येच्या एक तृतीयांश मुलं) १९४७मधे, फाळणीच्या वेळीच निघून गेली होती. सबंध उत्तर भारतात, नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानातही तेव्हा भीषण रक्तपात झाला. ही मुलं शाळेत बरीच लोकप्रिय होती. पैकी बहुतेक जण पठाण होते -  माझे मित्र अजहर व उमरसुद्धा. शिमल्यात जागोजाग दंगे उसळले तेव्हा या मुलांना सैन्याच्या ट्रक्समधून न्यावं लागलं. मुलं सुखरूप आपापल्या घरी पहोचली. त्यांच्या जाण्यानं शाळेत मात्र पोकळी निर्माण झाली. पटसंख्येत एकाएकी घट झाली, तीतून सावरण्यास शाळेला दोन-तीन वर्षं लागली. दरम्यान अनेक शीख मुलं शाळेत दाखल झाल्यामुळे ही पोकळी भरून निघाली.  अँग्लो-इंडियन परिवारांचे थवेच्या थवे माझ्या मूळ शहरातून म्हणजे डेहराडूनमधून काढता पाय घेत होते. श्रीमंत लोक आपल्या प्रवासाची तजवीज स्वतःच करत. ज्यांना प्रवासखर्च परवडणार नसे ते

'ब्रा' न घालण्यातलं सुख

Image
** मी स्त्रीवादी नाही, परंतु लेखिकेच्या स्त्रीवादाला माझा आक्षेप नाही.  **     'ब्रा ' न घालण्यातलं सुख हिलरी ब्रेनहाउस 'दि न्यू यॉर्कर' वर (ऑनलाइन आवृत्ती ) ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी लेखाचं हे मराठी भाषांतर लेखिकेच्या संमतीने  'मिळून साऱ्याजणी' (फेब्रुवारी २०२०) या मासिकात प्रसिद्ध करण्यात आलं.  पेरुमधील सेक्रेड व्हॅलीत राहत असताना एके सकाळी लुईसानं (माझी मैत्रिण) मला विचारलं: "तू ब्रा का घालतेस?" भाड्याने घेतलेल्या घराच्या स्वयंपाक-खोलीत आम्ही उभ्या होतो. चहाचं आधण उकळत होतं. टीशर्टच्या आत मी स्पेशल अंडरवायर ब्रा घातली होती - स्ट्रॅप्स घट्ट अॅडजस्ट केलेले, दोन्ही डीडीडी कप्स पूर्ण ओथंबलेले. तिच्या अंगावर करड्या रंगाचा ढगळ स्वेटशर्ट होता. आत काहीच नव्हतं. "- घालावी लागते म्हणून." उत्तर देताना किंचित हसू फुटलं मला. प्रश्नाचा सूर असा होता की जणू ही ऐच्छिक बाब असावी. "अगं, ब्रेस्ट्स खूप मोठ्ठे आहेत माझे." "माझेही," ती म्हणाली. मग तिनं आपला शर्ट वर उचलला. तिचेही स्तन चांगलेच मोठ्ठे होते, दोन

अर्सूला के. लं ग्विन - काही उद्गार

Image
जग सत्कारणी लावायचं असेल; जगाची व जगात व्यतीत होणाऱ्या आपल्या काळाची उधळमाख थांबवायची असेल तर 'या जगात असावं कसं' हे आपण पुन्हा नव्याने शिकून घ्यायला हवं. जगण्याचं कसब; आपण इथलेच, या विश्वाचेच असल्याचं भान; विश्वाचा एक अंश असण्यातला अत्यानंद या साऱ्यात नित्य जाणीव अंतर्भूत असते - पशुमात्रांशी एक पशू म्हणून, भूतजीवांशी एक जीव म्हणून, पदार्थवस्तूंशी एक पदार्थवस्तू म्हणून आपलं जे सख्य असतं, नातं असतं त्याची जाणीव. झाडं, नद्या, टेकड्यांना सहचरांच्या, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सामावून घेऊ शकलो तर कदाचित आपण त्यांच्याकडे निव्वळ 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहणार नाही. मला वाटतं मी अखिल सृष्टीला विषयरूप देण्याचा, तिला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला स्वतःवेगळं काढल्याने, तिचं ठोस वस्तूकरण केल्याने आपण कुठे येऊन पडलोत पहा ना! ताब्यात घेणं, पादाक्रांत करणं, पिळवणूक इतकाच फक्त 'आपलं म्हणण्या'चा अर्थ नव्हे. ही आपणवणूक मन व कल्पनाशक्तीपल्याड मोठी झेप घेण्याशी निगडित असू शकते. ...विज्ञान बाह्यात्काराचं अचूक वर्णन करतं. कविता अभ्यंतराचं स्पष्टवर्णन करते. विज्ञान विवेच