Posts

Showing posts with the label नाटक

म्हातारचळ (जर्मन नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *   म्हातारचळ मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर     (म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)  म्हातारा:  म्हातारचळ झिंदाबाद!   सर्व म्हातारे (पेला उंचावत):  झिंदाबाद! झिंदाबाद!   (सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात.  पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)

उद्या नक्की (जर्मन नाटुकलं)

  * * हे भाषांतर माझे नाही * *   उद्या नक्की मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर        (एक माणूस घराचं दार उघडून आत येतो, आणि सुरा बाहेर काढतो.)   तो: आज सोडत नाही मी तिला. (आतल्या खोलीतून बाईचा आवाज) ती: आलं का माझं नवरुडं! ये, सरळ आत ये. तो (सुरा पायपुसण्यावर घासत): आज संपवतोच कसा तिला. थंडगार करून सोडतो. ती (आतूनच, जरा मोठ्यानं): पायपुसणं पुन्हा फाटलं ना तर माझ्यइतकी वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते!

कबूल कर! (जर्मन नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     कबूल कर! मूळ जर्मन नाटुकले   कबूल कर, तुला इथे स्वातंत्र्य आहे. - कबूल.   कबूल कर, तुला आम्ही प्रेमाने वागवतो. तूसुद्धा आमच्यावर प्रेम करतोस. - कबूल.   सारंकाही अगदी तुला हवं तसं आहे - कबूल कर. - कबूल करतो.   एखादी गोष्ट तुला कबूल नसेल, तर तसं सांग.  - ...माहित नाही.   कबूल कर, की हा विजय तुझाच आहे. - कबूल.   कबूल कर, की आपण एकमेकांना भावासमान आहोत. - कबूल करतो.    तू सुखी आहेस, हे कबूल आहे तुला?  - माहित नाही.  कबूल कर! - कबूल.   मन मोकळं केल्यावर आता तुला हलकं वाटतंय ना? - हो. कबूल कर! - कबूल करतो.   हं. शेवटी काय म्हणायचं असतं-? - धन्यवाद.

‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’: बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!

Image
‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ :   बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!   मुक्ता 'असरार'   सगळीकडे बाजार भरू लागलाय, सगळे बाजारात भरती होताहेत. तनाच्या, मनाच्या, धनाच्या, धर्माच्या, विधिनिषेधांच्या, सभ्य-असभ्यतेच्या...मिळेल त्या रंध्रांत घुसून बाजार पिसाटतोय. एकमेकांच्या काना-डोळ्या-नसांत बाजार ओतून फसफसवतो आम्हीच आम्हाला, नि जिवात जीव आणतो पुन्हा बाजारचं प्रतिविष पाजून. बाजारू नख्यांनी आमची आम्हीच बोचकारून काढली नसतील अशी गात्रं उरली नाहीत, नि ज्यांत बाजार-जंतू वळवळत नसतील अशा जखमाही उरल्या नाहीत. कपाळमोक्ष करून घ्यावा म्हटलं तर बाजाराची उशी आडवी येते, नैराश्यावर इलाज करायला सांगते.   आकाश-पाताळ बाजार होताहेत, आत्मे चोंदताहेत, एकमेकाच्या मेंदूचे वडे तळून खाण्यात कुणालाच आता संकोच वाटत नाही. पण यावर तिळाएवढा जरी आक्षेप असेल आपल्याला, तर? - प्रयोग करून बघावा लागतो. वीजेच्या उरात वीज खुपसावी लागते, पूर गिळून टाकणारा महापूर आणावा लागतो - बाजारात उभं राहूनच बाजार पेटवून द्यावा लागतो!    ‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ हे नामदेव ढसाळांच्या मोजक्या कविता गात, ...

नाटक नाटकी असलंच पाहिजे का?

Image
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय.   कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*     नाटक नाटकी असलंच पाहिजे का?  नाटकांच्या नाटकीपणाचा एखाद्याला वैताग येत असेल तर? - एखाद्याला म्हणजे मला.  होय, नाटकाच्या सादरीकरणातील, विशेषतः अभिनयातील नाट्यातिरेकाचा मला वीट येतो. नाटकांच्या गावी फारशी जात नाही मी. (प्रस्तुत लेखनाला किती महत्त्व द्यायचं, हे वाचणाऱ्यानं स्वतः ठरवावं!)  परंतु नाटक लिहीण्याची हुक्की आली म्हटल्यावर तंबूत शिरायलाच हवं. आजवर पुण्यातच पाहिलेल्या मोजक्या प्रायोगिक नाटकांपैकी (- व्यावसायिक नाटकांमुळे मेंदूचं आरोग्य बिघडण्याचा धोका वाटतो -) मानव कौल ची नाटकं वगळता बहुतांश नाट्याविष्कार संहितेत कच्चे व (म्हणूनच की काय) सादरीकरणात कर्कश, छापपाडू वाटले. (गोळीबंद संहिता, तडाखेबाज सादरीकरणातून काळजाला भिडलेलं परंतु काळजात भिनू न शकलेलं एक नाटक म्हणजे 'दि कंपनी थिएटर'चं 'टेकिंग साइड्स'.)   'दि ट्रायलॉग स्टुडिओ' निर्मित 'तानसेन' नाटकाचा समावेश माझ्यामते दुर्दैवानं  या जंत्रीत ह...

घंटा घंटा घंटा घंटा घंटा - प्रतिकाराच्या थिटेपणाची!

Image
* ईमेल-खातं बदलल्यामुळे ही जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो. *       व्यावसायिक तथा चुचकारू प्रायोगिक नाटकांमधील ठोकळेबाज नेपथ्य, पटकथा, विनोद; बौद्धिक शिथिलता, राजकीय औदासीन्य, गबाळ वर्तमान संदर्भ इत्यादी घटकांना टक्कर देणारी नाटकवाली मंडळी पुण्यात दीडेक दशकांपासून सक्रिय आहेत. व्यक्तिगत कामं करता करता वेळोवेळी एकत्र येऊन हा कंपू नाट्यनिर्मिती करतो. ('कंपू' शब्द इथे तटस्थपणे वापरतेय मी.) खूप चांगली गोष्ट आहे. परंतु ही नाटकंसुद्धा ठोकळेबाज जाणीवांमधूनच उगम पावत असल्यामुळे - ते ठोकळे विजोड, विषमभुज, उत्तर-आधुनिक, अ‍ॅबस्ट्रॅक्ट धाटणीचे असले तरी; खुर्च्यांच्या पाठीला पट्ट्या कमी-जास्त असल्या, एकोणिसशेसाठ-सत्तरांतली  बंडखोर गाणी वाजली, मंचावर निर्धास्त चुंबनं झडली तरी - शेवटी 'यांचे' ठोकळे व 'त्यांचे' ठोकळे एवढाच काय तो फरक उरतो.  माझ्यामते बहुसंख्य नाटकांप्रमाणं या कंपूचं ना्ट्यदेखील झेप घेण्यास असमर्थ ठरतं. ते निराळ्या पद्धतीनं वावरतं, पंख फडफडवतं इतकंच.    सॅम...