Posts

Showing posts with the label सहज

कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे

Image
  * ईमेल खातं बददल्यामुळे जुनी पोस्ट पुनःप्रकाशित करतेय *     कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे   निक पॅटन वॉल्श, वास्को कोटोविओ   |  सी.एन.एन. , मार्च २०, २०२०    मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' वटवाघूळ: अलिप्त, निशाचर, दाटी करून राहणारा प्राणी. वटवाघळाला कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत मानलं गेलं आहे. तथापि आपल्या दैनंदिन आयुष्यात उलथापालथ घडवणाऱ्या या रोगाचा प्रसार होण्यास वटवाघूळ जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत यावर काही वैज्ञानिकांचं एकमत आहे. प्राणिशास्त्रज्ञ व रोग-विशेषज्ञांनी सी.एन.एन.ला दिलेल्या माहितीनुसार मानवी वर्तणुकीतील बदल - मानव करीत असलेला नैसर्गिक अधिवासांचा विनाश; तसंच त्याचं प्रचंड संख्येने, जलदगतीने पृथ्वीवर संचार करणं - यामुळे आतापावेतो निसर्गात कुलूपबंद असणारे विकार मानवामधे वेगाने प्रवेश करत आहेत. कोरोना विषाणूची उत्पत्ती मुळात कशी झाली याचं खात्रीशीर उत्तर वैज्ञानिकांना अद्याप गवसलेलं नाही. संशयित प्रजातीतील जिवंत विषाणूचं पृथक्करण करता आल्यास त्याचा मूलस्रोत सिद्ध करता येईल - हे फार जिकिरीचं ...

उगाच आख्यान

  संसारी माझ्या येउनि का ऐसा  केला घात पुरा, का असा रे घननीळा..   भारी गंमत आहे. 'का? का आलास तू?' भक्त / भक्तीण विचारतेय.  देवाला, प्रेमाला, सत्याला वारंवार केला जाणारा प्रश्न: 'का?'  एकूणेक उत्तरं या प्रश्नाच्या मापाची असतात, या प्रश्नात मावतात असं वाटतं की काय आपल्याला? हा घात आहे, विनाश नाही. विध्वंस नाही. कुणा माथेफिरूनं केलेली तोडफोड नाही, इतकं समजतंय. घननीळानं केलेला घात - असं भक्तिणीला वाटतंय बरं का. 'घात झाला. हे काय घडू दिलं मी?! आता कसं होणार माझं, काय होणार? ...का केलंस तू हे??!' शंकित झालीय ती. मनात खळबळ उडालीय. इथे कृष्णाचा विचार करत नाही आपण. कसा घडत असेल, मोडत असेल तो क्षणोक्षणी? कसा प्रकटत असेल, लोपत असेल? कृष्ण-कृष्ण म्हणजे तरी कोण?  आणि घात झालाच असेल तर नेमका कशाचा? - संसाराचा? नात्यागोत्यांचा? दैनंदिन कामाधामाचा? की असत्याचा? काय ढळतंय नेमकं? - मानमर्यादाच ना, रूढ कल्पनाच ना?  पण का?? 'का' काही संपत नाही!   मीच का? माझ्याच संसारात का? माझ्याच आयुष्यात का? आत्ताच का? याच रूपात का? नक्की उद्देश काय आहे याचा? ... छे, मला नकोय ह...

Something I heard...

Millions of people live. Millions die.  Thousands search. How many of them find each other?

Is there a difference between a contradiction and a paradox?

Yes, there is. If, for instance, I uphold truthfulness but am in fact untruthful, and if I deny the discrepancy, there's contradiction. If I do not deny the discrepancy, well, that's paradoxical - I am truthful about my untruthfulness. In contradiction there's conflict, in paradox there isn't. We demand consistency, and we call things contradictory when they fail to meet the demand.   Paradox is manifest the moment we let go of the demand; when we realize that the world does not owe us fulfilment. It's really something extra, a cherry on top. Fulfilment is a kind of a grace. Paradoxes then could be doors to wider, limitless understanding. Living with contradictions feels terrible; we constantly struggle to make the world available to our limited, past-based thinking. In living with paradoxes, we make ourselves available to the world.

मृत्यूशय्येवर... (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     मृत्यूशय्येवर...    मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक   (एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. कुटुंबातील सारेजण त्याच्या शय्येभवती जमलेत. त्याच्या पायांच्या दिशेला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळते आहे.) शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठे आहेस तू? मेरी : मी इथेच आहे तुझ्यापाशी. शेतकरी : एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं? एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे. (अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या सगळ्या माणसांना - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - हाका मारून तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)   शेतकरी : सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!   मेरी (त्याला झोपवत): असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही? शेतकरी : छे ,छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर. मेरी : ठीक आहे. चला, सगळे आपापल्या कामाला जा. (सगळे निघून जातात. फक्त मेरी उरते.) शेतकरी : आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला ...

कबूल कर! (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     कबूल कर!   मूळ जर्मन नाटुकले     कबूल कर, तुला इथे स्वातंत्र्य आहे.   - कबूल.   कबूल कर, तुला आम्ही प्रेमाने वागवतो. तूसुद्धा आमच्यावर प्रेम करतोस.   - कबूल. सारंकाही अगदी तुला हवं तसं आहे, कबूल कर. - मला कबूल आहे. एखादी गोष्ट तुला कबूल नसेल, तर तसं सांग.  - मला माहित नाही. कबूल कर, की हा विजय तुझाच आहे.  - कबूल.   कबूल कर, की आपण एकमेकांना भावासमान आहोत.    - मला कबूल आहे.  तु सुखी आहेस, हे कबूल आहे ना तुला?    - माहित नाही.  कबूल कर! - कबूल. मोकळेपणाने बोलून आता तुला हलकं वाटतंय ना? - हो. कबूल कर!   - मला कबूल आहे.   हं. शेवटी काय म्हणायचं असतं..?   - धन्यवाद.

उद्या नक्की (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *   उद्या नक्की मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर (Friedrich Karl Waechter)     (एक माणूस घराचं दार उघडून आत येतो, आणि सुरा बाहेर काढतो.) तो: आज सोडत नाही मी तिला. (आतल्या खोलीतून बाईचा आवाज) ती: आलं का माझं नवरुडं! ये, सरळ आत ये. तो (सुरा पायपुसण्यावर घासत): आज संपवतोच कसा तिला. थंडगार करून सोडतो. ती (आतूनच, जरा मोठ्यानं): जर तू पुन्हा पायपुसणं फाडलंस तर माझ्यइतकी वाईट कोणी नसेल, सांगून ठेवते!

म्हातारचळ (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *     म्हातारचळ मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर (Friedrich Karl Waechter) (म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)  म्हातारा: म्हातारचळ झिंदाबाद! सर्व म्हातारे (पेला उंचावत): झिंदाबाद! झिंदाबाद! (सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात.  पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)

ऐकणारा व गाणारा

 ऐकणारा व गाणारा एकच असतात. ऐकणारा हा गाणाऱ्याच्या मनात, कल्पनेत, विचारांत असतो. गाणारा हा ऐकणाऱ्याच्या मनात, कल्पनेत, विचारांत असतो. प्रत्यक्षात कुणी नसतं, केवळ वास्तव असतं. 'कुणासाठी' तरी गाणं म्हणजे काय? हा कुणीतरी, 'अन्य कुणी' म्हणजे नेमकं कोण? कुठला श्रोता? कोण प्रेक्षक? - ती समोर/भवताली बसलेली माणसं? आपण त्यांना प्रत्यक्ष जाणतो का? प्रत्यक्षात पहातो का? की डोळ्यांपुढे मनातल्याच प्रतिमांचा, इच्छांचा, अभिलाषांचा खेळ सुरू असतो?   तेव्हा 'ज्याच्यासाठी' कला सादर केली जाते तो 'अन्य', ती 'दुसरी' व्यक्ती - ‘the other’ हा मुळी गायकाच्या, नटाच्या, चित्रकाराच्या, दिग्दर्शक वगैरेंच्या डोक्यात असते. आपल्याला ती खऱ्या अर्थाने गाऊ, चित्र काढू देत नाही, अभिनय करू, दिग्दर्शन करू देत नाही. हे जाणलं, तर आपण  'अन्य'च्या भ्रमातून मुक्त होऊ, व तत्क्षणी 'मी'च्याही भ्रमातून मुक्त होऊ. 'मी' म्हणजेदेखील तेच - प्रतिमा, आठवणी, कल्पना, विचार इत्यादी.   ..मग गाणारा वास्तवात गाऊ लागेल. खरंखुरं चित्र, खराखुरा चित्रपट काढेल. मग आपण खऱ्या अर्थानं जगू...

Ego

 Ego is nowhere to be found within the organism. Nor is it an external factor. It is our fearful hold on things, people and events.  Our great disdain for the unknown. Great disregard for the present.   In whatsoever one does or feels with ego one can be 'accurate' but never be 'right'. One can be 'sure' but never deeply 'calm'. One can even be 'clear' but never innocent, 'pure'.

तुम्हाला नात्यामध्ये रस आहे, की नातं टिकवण्यामध्ये?

तुम्हाला नात्यामध्ये रस आहे, की नातं टिकवण्यामध्ये?  - होय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. कारण दोन्ही एकसाथ घडूच शकत नाही.    जेव्हा तुम्ही कुठल्याही नातेसंबंधात पूर्णतः रममाण असता, खरोखर त्या नात्याचा भाग असता तेव्हा तुम्ही नातं टिकवण्याची धडपड करत नसता. तशी गरजच नसते! नातं टिकवण्याची धडपड करता तेव्हा तुम्ही नात्याशी समरस नसता, एकरूप नसता. नात्यापासून निराळं होऊन, पृथक् होऊन तुमचा तो उद्योग चालतो.    ...ज्या क्षणी आपण वास्तवाकडे, जे आहे त्याकडे थेट पाहू शकत नाही किंवा पाहू इच्छित नसतो; ज्याक्षणी स्वतःचं वर्तमानातील वास्तव सर्वांशानं पाहण्यात आपल्याला रस नसतो / तितकं धैर्य नसतं / सबुरी नसते / ऊर्जा नसते / भान नसतं, त्याचक्षणी 'आदर्शा'ची चर्चा सुरु होते. त्याचक्षणी आपण जग 'आदर्श' व 'वास्तव' यांत विभागून टाकतो. हे सेकंदाच्याही एखाद्या तुकड्यात घडून जातं, पण ती मनानं शोधलेली पळवाट असते. मनाचा थकवा / आळस / भ्रम असतो. प्रत्यक्षात असतं ते केवळ वास्तव, बाकी काही नाही. नि ते समजून घेता येतं फक्त पाहण्यानं. प्रश्न सुटतात फक्त समजून घेण्यानं. हे लक्षात घेणं महत्त्वाचं. ...

(No kidding, Mr. Orwell!)

Everything is real but some things are more real than the others. Everything is natural but some things are more natural than the others. Right and and wrong aren't a matter of judgment, they are a matter of insight - wisdom is to recognize which is which without pronouncement, without emphasis, without tearing it apart from the rest, like lovers silently greeting one another across a crowded room. Division alone is what's unreal, unnatural.

हेतूची शुद्धी

Image
सत्याचा शोध घ्यायचा आहे? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल.. कळतच नाही.    आपल्याला मार्गदर्शक, गुरु हवा असतो, तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवा आहे का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवा आहे? आशीर्वाद देणारा कुणी हवा आहे? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवा आहे का? जुन्या नातेसंबंधांना मन विटलं आहे, तर नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? ..पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर! आपल्या मनाला, अहं ला रुचलं नाही तर! तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणे वाकवून मग ते ग्रहण करायचे?   काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवं आहे का? आपण आहोत तसे स्वीकारणारा हवा आहे का कोणी?   ...ही स्वतःची जी ओळख आह...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures.  यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो. ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकान थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं.    या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही, तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण आमच्या त्या बापाचे बाप आम्ही होतो! आमचा स्वतःवर विश्वास तर नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट ईश्व...

कर्म हेच फळ

Image
जोपर्यंत कर्म हाच आनंद बनत नाही, जोपर्यंत कर्माच्या बाहेर काहीतरी, कोठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे अशी तुमची भ्रांती राहील, तोपर्यंत दुःखच दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. वास्तविक आपल्या कर्मात, आपल्या आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो, परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता मी जे केलं, इथे मी जे केलं त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ..कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला!   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून...

With regards to music..

With regards to music, I was interested in the inside of the shirt - the actual, living experience. Now I realize that the inside and the outside of the shirt - it's technical, analytical knowledge, can't exist without one another. Thinking of them as two separate things and trying to put on over the other is in fact the source of many problems.   It's like arguing over whether 'the beloved' is a person, a mere mortal or God itself!    I've always wondered whether mystics, sufis would distinguish between the earthly and the godly, the erotic and the spiritual. Not at all, I think. Oneness is precisely what they point at all the time.

संस्कृती लयास का जातात?

Image
"शेवटी जनता राजकारण्यांचं ऐकते, ती कवीचं म्हणणं मनावर घेत नाही म्हणून जनजीवन ध्वस्त होतं, संस्कृती लयास जातात."  - जोनास मेकास “In the very end, civilizations perish because they listen to their politicians and not to their poets.”  - Jonas Mekas      

स्वप्न

 मी, जॉर्ज ऑर्वेल आणि टी. एस. एलियट एका मोठ्या खाटेवर एकमेकांशेजारी पहुडलो होतो. जाड पांघरुणातही थंडी वाजत होती. ही खाट नेमकी कुठे असावी? वर खुलं आकाश होतं, भवती अंधार. आम्ही वाळवंटात आहोत असं वाटत होतं. इतरांना विचारण्याची, वा स्वतः उठून खात्री करून घेण्याची इच्छाच होत नव्हती. माझ्या पाठीमागं ऑर्वेल आणि एलियट एकमेकांकडे तोंड करून बोलत होते. मी शेजारच्या खाटेवर शाल लपेटून, पाय छतीशी मुडपून बसलेल्या आमच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांशी गप्पा मारत होते. मागून येणारा आवाज बंद झाला. दोघे झोपी गेले असावेत. बऱ्याच वेळाने ऑर्वेल म्हणाले, "जरा इकडे बघ." मी मागं वळून पाहिलं. ऑर्वेल एलियटकडे एकटक पाहत होते. त्यांनी माझा हात हातात घेऊन एलियटच्या मनगटाला लावला - नाडी बंद पडली होती. मग मी व ऑर्वेल शांतपणे झोपी गेलो. डोळे मिटण्यापूर्वी मी शेजारच्या खाटेवर नजर टाकली -  गुढघ्यांवर हनुवटी टेकवून आमचे प्राध्यापक विचारांत पार गढले होते.

'प्रत्येकाला स्वयंपाकातले काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत

मोदकांसंबंधी लिहिताना दुर्गाबाई सांगतात:   '...आमच्याकडे स्वयंपाकाला एक बाई होत्या. (त्यांची आई लहानपणीच वारली, त्या एका इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले.) त्या माझ्या आत्याच्या घरी नोकरीला राहिल्या. या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर ठरलेलं.  त्या मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. एकावर एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची. पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा. उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.  प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कैशल्य प्राप्त असते...

दुर्गाबाई सांगतात पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं..

विस्मरणात चाललेल्या मराठी पाककृती व एकंदर पाकवैविध्यासंबंधी दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले लेख 'खमंग' या शीर्षकाखाली पुस्तकरुपाने संकलित करण्यात आले. पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं दर्शवणारे दोन-तीन दाखले बाईंनी दिलेत. आवर्जून वाचावे:   ...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते.  ..अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही ...