नाटक नाटकी असलंच पाहिजे का?

* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.* नाटक नाटकी असलंच पाहिजे का? नाटकांच्या नाटकीपणाचा एखाद्याला वैताग येत असेल तर? - एखाद्याला म्हणजे मला. होय, नाटकाच्या सादरीकरणातील, विशेषतः अभिनयातील नाट्यातिरेकाचा मला वीट येतो. नाटकांच्या गावी फारशी जात नाही मी. (प्रस्तुत लेखनाला किती महत्त्व द्यायचं, हे वाचणाऱ्यानं स्वतः ठरवावं!) परंतु नाटक लिहीण्याची हुक्की आली म्हटल्यावर तंबूत शिरायलाच हवं. आजवर पुण्यातच पाहिलेल्या मोजक्या प्रायोगिक नाटकांपैकी (- व्यावसायिक नाटकांमुळे मेंदूचं आरोग्य बिघडण्याचा धोका वाटतो -) मानव कौल ची नाटकं वगळता बहुतांश नाट्याविष्कार संहितेत कच्चे व (म्हणूनच की काय) सादरीकरणात कर्कश, छापपाडू वाटले. (गोळीबंद संहिता, तडाखेबाज सादरीकरणातून काळजाला भिडलेलं परंतु काळजात भिनू न शकलेलं एक नाटक म्हणजे 'दि कंपनी थिएटर'चं 'टेकिंग साइड्स'.) 'दि ट्रायलॉग स्टुडिओ' निर्मित 'तानसेन' नाटकाचा समावेश माझ्यामते दुर्दैवानं या जंत्रीत ह...