Posts

Showing posts with the label भाषा

Tongue-twisting rant for the letter 'R'

PETER POTTER BOATER BRUTE FATHER RATHER GATHER GROUP SHOWER HOUR POWER BREAD NEWER SEWER FEWER DREAD TRICKY TRIPPY TREMENDOUS TROT RUMOUR RULER ROOSTER ROT CRANE BRAIN GRAIN REFRAIN TRUSTED CRUSTED BURSTED TRAIN MUSTARD CUSTARD REGISTERED BASTARD SHAKER QUAKER BAKER MASTERED FETTER LETTER WETTER SWEATER NURSE'S PURSE VERSES BETTER INSTAGRAM AMSTERDAM LORRY SORRY HORRIBLE PRAM ARMS ALARM CHARMING WARM WRIST PRIEST GREETING NORM HIGHER WIRE CHOIRS ADMIRE LIAR TYRES FIRE REQUIRE WINKER PINKER TINKERBELL JINGER FINGER LINGERS WELL PEARS WEAR HARE'S HAIR TEARS NEAR EARS FAIR  

मराठी शब्दांबाबत विलास सारंग म्हणतात:

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     मराठीतील चांगले चांगले शब्द आता दृष्टिआड होत आहेत. यात वृत्तपत्रांची जबाबदारी आहेच; वृत्तपत्रं रूढ, धोपटमार्गी शब्द वापरतात. यात त्यांचा दोष नाही. वाचकाला जे समजेल, सवयीचे असेल अशा मर्यादित शब्दभांडारावर वृत्तपत्रांचा गाडा चालतो. वाचकांना तसदी नको असते. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वाचण्याची प्रवृत्ती असते. या परिस्थितीत उत्तमोत्तम, समर्पक शब्द बिनवापरामुळे नाहीसे होत आहेत. सामाजिक बदलाच्या रेट्यामुळे लोक काही शब्द वापरायला घाबरतात. निरुपद्रवी शब्द वापरण्याकडे पत्रकार-लेखकांचा अप्रत्यक्षपणे कल असतो. मी मागेही सांगितलं आहे की ही प्रवृत्ती घातक आहे. नेणीवेतील (unconscious) भावना व दृष्टिकोन जितक्या प्रमाणात प्रकाशात येतील तितकं आपलं गंडग्रस्त (neurotic) मन मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हा एक मार्ग आहे. सरकारी भाषेत, व्यासपीठावरून केलेल्या भाषणात स्वातंत्र्याचा फक्त देखावा असतो. आपलं अनकॉन्शस मन जुन्या सवयी सोडायला तयार नसतं. कॉन्शस व अनकॉन्शस (जागृत व सुप्त मन) यांमधे आपल्या...

श्री. अरुण फडक्यांशी झालेला वाद

  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     श्री. अरुण फडके (१९६० - २०२०) हे मराठी शुद्धलेखन, कोशनिर्मिती इ. क्षेत्रात कार्यरत असणारे लेखक, अभ्यासक होते.  मार्च २०१८  रोजी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात श्री. फडके यांचं 'मराठी परिभाषा: कशी नसावी-कशी असावी' नामक व्याख्यान झालं. व्याख्यानानंतर आमच्यात घमासान चर्चा / वाद झाला. वेळेअभावी प्रत्यक्ष मांडता न आलेलं कौतुक, आक्षेप व शंका यांची टिपणं काढून मी श्री. फडक्यांना ईमेलवर पाठवली. त्यांच्याकडून मला उत्तर आलं नाही. असो. ही टिपणं खालीलप्रमाणे:   भाषेबाबत झपाटून काम करणाऱ्यांतले एक म्हणून श्री. फडके यांचं कौतुक आहे. पण 'मराठीची इंग्रजीशी तुलना करू नये' म्हणतानाच सतत इंग्रजीशी स्पर्धा करण्याचा त्यांचा आवेश ('मराठीतील धातूंची संख्या इंग्रजीहून वाढली पाहिजे' वगेैरे) मला पटला नाही. दोन्ही भाषांचा जन्म व विकास भिन्न पद्धतीने झाला असताना मुळी स्पर्धात्मक तुलना करण्याचं कारण काय? भाषांचा लोप होण्याला भाषांमधील हेवेदावे, भाषांबद्दल उच्चनीचतेच्या भावना सर्वाधिक कारणीभूत आहेत असं मी म...

जिभपिळणी (tongue twister)

 * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     काळे राळे गोरे राळे राळ्यांत राळे मिसळले | काळे डोळे डोळे घारे डोळयांत डोळे निवळले ||   उलटा तीळ पलटा तीळ तिळांत तीळ दिसेना  | नाकावरला एक एका ओठातल्याला भेटेना ||   © मुक्ता असनीकर