Posts

Showing posts with the label extract

कर्म हेच फळ

Image
जोवर कर्म हाच आनंद बनत नाही; कर्माच्या बाहेर कुठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे या भ्रमात जोवर तुम्ही रहाल, तोवर दुःखंच दुःखं तुमच्या वाट्याला येणार हे नक्की .   वास्तविक कर्मात, आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो; परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता , इथे मी जे केलं, त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ...कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला.   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून जाऊ देत नाही. मनात धरून ...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures . यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो.     ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकानं थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं! या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही; तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण त्या बापाचे बाप आम्ही होतो! स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट...

हेतूची शुद्धी

Image
सत्याचा शोध घ्यायचाय? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल...कळतच नाही.    तुम्हाला मार्गदर्शक, गुरु हवाय तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवाय का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवाय? आशीर्वाद देणारा कुणी हवाय? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवाय का? जुन्या नातेसंबंधांना मन विटल्यामुळे नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर? आपल्या मनाला, 'अहं'ला रुचलं नाही तर? तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणं वाकवून मग ते ग्रहण करायचे? काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवंय का? आपण जसे आहोत तसा आपल्याला स्वीकारणारा हवाय का कुणी? ही स्वतःची जी ओळख आहे, ती आधी साधली पाहिजे...

दीना!

Image
मास्टर दीनानाथ मंगेशकरांबद्दल काही लेख वाचनात आले. भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा अभ्यास नाही, तितकीशी ओढही नाही. मात्र का कोण जाणे, संगीत-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी या कलाकाराबद्दल वर्णलेल्या काही आठवणी इतरांशी वाटून घेण्याची इच्छा होतेय:     संगीतातील रुचिपूर्ण, उत्तम काहीही शिकण्याबद्दल मास्टर मुक्तग्राही होते. विद्वान लोकांकडून त्यांनी चिजांचा मोठा संग्रह केला. उत्तरेकडील, थोडे दक्षिणेकडील गायकीचे ढंग आत्मसात केले. ...गोव्यातील मडकइ ते वाफर या तासा-दीड तासाच्या पायी प्रवासात विलक्षण बुद्धिमत्तेच्या मास्टरांनी आपले गुरू बाबा माशेलकर यांजकडून अकरा चिजा शिकून घेतल्या, असा प्रसंग ऐकीवात आहे!  फार फार आत्मीयतेनं त्यांनी हे भांडार मिळवलं, व मुक्तहस्ते शिष्यांना देऊ केलं. मास्टरांची शिकवण्याची ठराविक पद्धत नव्हती. मनात येईल तसे, हिशोबीपणा न करता शिकवत. प्रभाकर जठारांना भरभरून बंदिशी देतेेवेळी ते म्हणाले: "एकच राग सहा-सहा महिने शिकवायचा माझा स्वभाव नाही. शे-दोनशे बंदिशी गळ्यातून गेल्या म्हणजे तुझा आवाज आपोआप निकोप होईल. एकदा शिकवून झाल्यानंतर गाणं हे ज्याच्या-त...

दुर्गाबाई उलगडतात पशुपक्षी व पाकशास्त्राचं नातं...

...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते. अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही जंगलात होतो तेव्हा पाहिलं, की मादी माकड बाळंत झाल्यावर नर माकड जंगलात डिंक व मध गोळा करतं, त्याचे ओबडधोबड लाडू वळून ते मादीला खाऊ घालतं. उत्तर प्रदेशात गंगा-यमुनेच्या काठची माकडं चारोळ्या गोळा करून, डिंक व मधात त्या घोळून लाडू बनवतात. अर्था...

'प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते' - दुर्गा भागवत

...आमच्याकडे स्वयंपाकाला एक बाई होत्या. त्यांची आई लहानपणीच वारली, एका इस्पितळात आश्रित म्हणून वाढल्या. रूपाने देखण्या परंतु अस्थिर बुद्धीच्या असल्यामुळे पुढे नवऱ्याने त्यांना टाकले. मग त्या माझ्या आत्याच्या घरी नोकरीला राहिल्या.   या बाईंचे सारे काम दिव्य असे. उत्तराला प्रत्युत्तर ठरलेलं. मोदक अतिशय सुरेख करायच्या. मी मोदक त्यांच्याकडून शिकले. पीठ दळण्यापासून सारे त्या करायच्या. बारीक पिठी दळण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. एकावर एक तीन मोदक कसे करायचे ते त्यांनी मला शिकवलं: एक बरीच मोठी पारी करायची. पहिल्यांदा सर्वात खालच्या मोदकाचे कंगोरे काढायचे, सारण भरून तो मिटवताना बरंचसं पीठ वर येतं. त्या पिठाचा पहिल्यापेक्षा लहान मोदक करायचा. उरलेल्या पिठाचा तसाच वर तिसरा मोदक करायचा. तीन-तीन मोदकांच्या अशा चार उतरंडी करून गणपतीच्या मखराच्या चारी बाजूंना मांडायच्या. हे कसब मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पाहिलं, आणि माझ्या कुवतीप्रमाणे हस्तगतही केलं.  प्रत्येक व्यक्तीला, बाई असो वा बुवा, स्वयंपाकातले काही ना काही अजब कौशल्य प्राप्त असते अशी माझी समजूत तेव्हापासून झाली आहे.

duende

Manuel Torre, a great artist of the Andalusian people, once told a singer: "You have the voice, you know the styles, but you will never triumph in your art, for you have no ' duende ' - the passion on the very edge of life and death."

चिं. वि. जोशींच्या लिखाणात फक्त विनोद नव्हता...

Image
***प्रस्तुत लेखन माझं नाही व त्याद्वारे कोणत्याही स्वरूपात मोबदला मिळवण्याचा माझा हेतू नाही ***  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   चिं. विं.च्या "आमचा पण गांव " (प्रथम प्रथमावृत्ती : १९५२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या पुस्तकातील उतारा:    ......आम्ही परत घरी  येण्यास निघालो; थोड्याच वेळात अंधार पडणार होता. हरणगावात स्थानिक स्वराज्य अथवा नगरपालिका नव्हती, त्यामुळे रस्त्यात रात्री दिवे नसत. त्यातून ते दिवस घासलेटाच्या टंचाईचे आणि ब्लॅकआऊटचे (दुसऱ्या महायुद्धाचे) असल्याने नगरपालिका असती तरी तिने काय दिवे लावले असते म्हणा! आम्ही बाहेर पडून चार पावले गेलो नाही तोच उलट बाजूने गावातील गायी-म्हशींचा जंगी कळप येऊन त्याने सगळी वाट अडवून टाकली होती म्हणून आम्ही बाजूस उभे राहिलो. गाई येताना विशिष्ट जागेशी थबकून भुईवरचा एक काळा पदार्थ हुंगून तो टाळून जात होत्या. आम्ही न्याहाळून पाहिले, तेव्हा दिसले की ते एक महिन्याहून कमी वयाचे कुत्र्याचे पिलू आहे. आपल्या दोन्ही बाजूंनी एक-सारख्या पसार होणाऱ्या त्या प्रचंड प्राणसंकटाने ते पिलू घाबरून कापत ...

अवचिता परिमळु

*हा ललितलेख एका दिवाळी अंकात वाचला. मनाला भावला. त्यातील काही अंश. सदर लेखनावर स्वामित्व हक्क सांगण्याचा, वा त्यापासून कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.   ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   अवचिता परिमळु    राणी दुर्वे   आडवाटेचा महाराष्ट्र पाहण्याच्या हौसेपायी सुखाचा जीव दुःखात घालून प्रवासाला निघालो होतो. दिवसभराच्या एस.टी.च्या प्रवासाने अंग आंबल्यासारखे झाले होते. संध्याकाळ होत आली होती. एकदाचा प्रवास संपावा आणि कुठेतरी जाऊन पडावे इतकीच इच्छा उरली होती. एस.टी.चा कुबट वास आणि त्यात मिसळलेले अनेक वास... पोटात ढवळत होते.    माळशेज घाट पार करून एका ठिकाणी एस.टी. थांबली. बस थांबताच धडपडत आम्ही बाहेर पडलो. श्वास भरून आधी मोकळी हवा पिऊन घेतली. खेड्याचे नाव आता आठवत नाही. ऑफिसमधल्या एका माणसाच्या ओळखीने एक पत्ता मिळाला होता. तिकडची वाट धरली. घर गाठले. चांगले नांदतेगाजते शेतकऱ्याचे घर होते. संध्याकाळच्या उजेडात एखाद्या चित्रासारखे दिसत होते. गायीगुरे, मोकळी बैलगाडी, बकऱ्या, कोंबड्या, मुले-माणसे सगळे...

मराठी शब्दांबाबत विलास सारंग म्हणतात:

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *     मराठीतील चांगले चांगले शब्द आता दृष्टिआड होत आहेत. यात वृत्तपत्रांची जबाबदारी आहेच; वृत्तपत्रं रूढ, धोपटमार्गी शब्द वापरतात. यात त्यांचा दोष नाही. वाचकाला जे समजेल, सवयीचे असेल अशा मर्यादित शब्दभांडारावर वृत्तपत्रांचा गाडा चालतो. वाचकांना तसदी नको असते. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वाचण्याची प्रवृत्ती असते. या परिस्थितीत उत्तमोत्तम, समर्पक शब्द बिनवापरामुळे नाहीसे होत आहेत. सामाजिक बदलाच्या रेट्यामुळे लोक काही शब्द वापरायला घाबरतात. निरुपद्रवी शब्द वापरण्याकडे पत्रकार-लेखकांचा अप्रत्यक्षपणे कल असतो. मी मागेही सांगितलं आहे की ही प्रवृत्ती घातक आहे. नेणीवेतील (unconscious) भावना व दृष्टिकोन जितक्या प्रमाणात प्रकाशात येतील तितकं आपलं गंडग्रस्त (neurotic) मन मोकळेपणाने श्वास घेऊ शकेल. सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हा एक मार्ग आहे. सरकारी भाषेत, व्यासपीठावरून केलेल्या भाषणात स्वातंत्र्याचा फक्त देखावा असतो. आपलं अनकॉन्शस मन जुन्या सवयी सोडायला तयार नसतं. कॉन्शस व अनकॉन्शस (जागृत व सुप्त मन) यांमधे आपल्या...

The sport of writing a song

Image
  * I am re-posting this old post due to change of email account. *   ...The sport of writing a song, a tightly organized genre, is not to smuggle in specifically subversive subtext when the censors aren’t looking but to make the subversive emotions universal enough not to need a subtext.   ...'All art aspires to the condition of music', Walter Pater wrote. All music dreams of becoming another kind of music. Art songs dream of becoming pop songs and pop songs dream of becoming folk songs, too familiar to need an author. We hear Cole Porter now without knowing that it’s Porter we’re hearing. He sublimated his suffering into his songs, until the songs are all we have, thereby achieving every artist’s dream, to cease to be a suffering self and become just one of those things we share.  - Adam Gopnik, from his New Yorker article on Cole Porter      

The middle path

Image
  * I am re-posting this old post due to change of email account. *     QUESTION: What is the middle path?   ALAN WATTS: Middle path is the path that cannot be shown, that no one else can lead you on. It is the one you discover for yourself.  

पार्वती आणि बाउल

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *      पार्वती बाउल यांच्या एका मुलाखतीतून वेचलेले काही परिच्छेद:    लहानपणी कानांवर बाउल संगीत कधी पडलं नव्हतं. सोळा वर्षांची असताना दृष्यकला शिकण्यासाठी रेल्वेने शांतिनिकेतनला निघाले होते. माझा भाऊ आणि मी गाडीत बसलो होतो. एक अंध बाउल साधू डब्यात चढला. त्याची नजर विलक्षण भासली मला, कारण आख्ख्या बोगीतला सर्वांत निःशंक, निर्धास्त मनुष्य होता तो! त्याच्या हातात एकतारा होता. एकताऱ्याला भोपळ्याच्या जागी काय असेल? - बेबी-फूडचा टिनपाट डबा! त्यामुळं चांगलाच टणत्कार होत होता. तार छेडली जाताच...कसलीशी अनुभूती आली. जणू सारंकाही विरून गेलं. डब्यातील इतर सर्व आवाज कुठच्या कुठे गायब झाले. (भारतातल्या रेल्वे फलाटांवर, गाड्यांमधे किती गोंगाट असतो, बहुधा पाहिलं असेल तुम्ही: विक्रेत्यांच्या आरोळ्या - ‘चहा घ्या चहा', 'पोहे घ्या पोहे’!) समस्त कोलाहल नाहीसा झाला. केवळ एकतारा घुमू लागला. साधू गाऊ लागला, जणू दूरदेशीहून साद घालणाऱ्या आवाजात. का कोण जाणे, चिरपरिचित वाटला तो सूर. कुठंतरी नेतोय आपल्याला, असं वाट...

शान्ता ज. शेळके यांनी सांगितलेला एक प्रसंग

बालपणीचा एक प्रसंग शान्ताबाईंनी आपल्या ललितलेखात वर्णिलेला आहे: एकदा नात्यातल्या, की ओळखीतल्या एक बाई घरी आल्या. शान्तेची आई व त्या बाईंच्या गप्पा चालल्या. आईच्या गळ्यात नव्यानंच घडवलेली टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ होती. बाईंचं लक्ष चटकन् माळेकडे गेलं. "..नवीन घडवलीत वाटतं मोहनमाळ." "हो. नवीच आहे." "मणी टप्पोरे आहेत की. लाखेचे असतील. एवढे मोठे मणी शुद्ध सोन्याचे कसे असणार!" आई काहीच बोलली नाही. नुसती हसली. यामुळे त्या बाईंना कसलंसं अगम्य समाधान वाटलं असावं. त्यांच्या मुद्रेवर ते स्पष्ट झळकत होतं. चहा-खाणं झाल्यानंतर बाई आपल्या घरी निघून गेल्या. लहानग्या शान्तीनं प्रश्न केला: "आई, लाखेचे मणी म्हणजे काय गं?" "अगं, लाख नावाचा एक पदार्थ असतो. सोनं परवडत नसेल तर या लाखेचे मणी बनवतात आणि वरून सोन्याचा पातळ पत्रा चढवतात फक्त."  "तुझ्या माळेचले मणी लाखेचे आहेत??" मोहनमाळेकडं संशयानं पहात शान्तेनं विचारलं. एखादी वस्तू आपल्याला वाटली तितक्या मोलाची नाही या भावनेनं तिचा हिरमोड झाला होता. शान्तेचा उतरू लागलेला चेहरा पाहून आईला हसू कोसळलं. ...