शब्द (with original English poem)
शब्द कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty) मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' शब्द, शब्द, शब्द - शब्दच शब्द माझ्याभवती ! पानांसारखे फुटत राहतात मला ते. त्यांचं हे आतपासून सावकाश पालवणं कधी थांबेलसं वाटत नाही तरी मी बजावत रहाते स्वतःला, 'जरा जपून! नसती ब्याद आहे ही. अगं, कस-कसली रूपं धारण करतात ते! - सुसाट पायांनी कचकन् थांबून बघावी अशी रस्ता चिरत गेलेली भेग काय, सुन्न करून टाकणाऱ्या लाटांचा समुद्र काय, पेटलेल्या वाऱ्याचा झोत काय, जिवश्च मित्राचा गळा कापायला शिवशिवणारा सुरा काय!!' शब्द…..वैताग मेला. फुटतात ते मला, जशी पालवी फुटावी झाडाला. कुठल्याशा गाढ आंतरिक शांतीतून त्यांचं हे उगवत रहाणं कधी थांबेलसं वाटत नाही. WORDS Kamala Das All round me are words, and words and words, They grow on me like leaves, they never Seem to stop their slow growing From within... But I tell my self, words Are a nuisance, beware of them, they Can be so many things, a Chasm where running feet must pause, to Look, a sea with paralyzing waves, ...