Posts

Showing posts from 2021

चितमपल्लींचा तक्ता

Image

नातेसंबंधांत प्रतिमा-निर्मिती

Image
 आपले परस्परसंबंध - कितीही दूरचे वा निकटचे असोत - या संबंधित्वाचा पुरा अर्थ उमगायचा, तर मेंदू प्रतिमा-निर्मिती का करतो हे समजावून घ्यायला हवं, यावर चिंतन व्हायला हवं. आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मनात प्रतिमा, दृढचित्रं का बाळगतो? स्विस, ब्रिटिश, फ्रेंच इ. म्हणून जर तुमची एक प्रतिमा असेल - या प्रतिमांमुळे आपलं मानवतेबद्दलचं अवलोकन दूषित होतंच, शिवाय त्या माणसा-माणसात फूट पाडतात, नाही का? आणि जिथे विभक्तता, भेदाभेद असेल तिथे संघर्ष उद्भवणारच. प्रतिमा निर्माणच न करणं मुळी शक्य आहे का? - येतंय लक्षात? घडल्या घटनांची नोंद न ठेवणं - प्रसंग आनंदाचा असो, दुःखाचा असो - त्याचा हिशेब न ठेवणं. निंदा, अपमान, स्तुती.. प्रोत्साहन मिळो वा उत्साहभंग होवो... कळतंय? आपल्या दैनंदिन नातेसंबंधांत हे सारं घडत असतं - त्याची नोंद, त्याची गणती न करणं शक्य आहे का? मेंदू जर स्वतःबाबत घडणाऱ्या हरेक गोष्टीची मनोवैचारिक नोंद ठेवत बसला, तर त्याला निवण्याची, शांतवण्याची फुरसत कधीच लाभत नाही; तो  निरावेग, निशांत होऊच शकत नाही. अहोरात्र घरघरणारी यंत्रणा अखेर झिजून जाते, शिणून जाते - सहाजिक आहे. नातेसंबंधांत नेमक...

मृत्यूशय्येवर... (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     मृत्यूशय्येवर...    मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक   (एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. कुटुंबातील सारेजण त्याच्या शय्येभवती जमलेत. त्याच्या पायांच्या दिशेला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळते आहे.) शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठे आहेस तू? मेरी : मी इथेच आहे तुझ्यापाशी. शेतकरी : एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं? एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे. (अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या सगळ्या माणसांना - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - हाका मारून तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)   शेतकरी : सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!   मेरी (त्याला झोपवत): असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही? शेतकरी : छे ,छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर. मेरी : ठीक आहे. चला, सगळे आपापल्या कामाला जा. (सगळे निघून जातात. फक्त मेरी उरते.) शेतकरी : आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला ...

म्हातारचळ (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *     म्हातारचळ मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर (Friedrich Karl Waechter) (म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)  म्हातारा: म्हातारचळ झिंदाबाद! सर्व म्हातारे (पेला उंचावत): झिंदाबाद! झिंदाबाद! (सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात.  पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)

बिल गन - उद्गार

Image
तत्त्वज्ञान हा तुरुंग असतो. तुमच्याबद्दलच्या अघळपघळ, तऱ्हेवाईक गोष्टींना त्यात थारा नसतो.  व्यक्तीच्या विचारप्रक्रियेची निष्पत्ती काय, हे ती प्रक्रियाच जाणे!  माणसाला शिकवण्याची भारी खाज असते. त्यामुळे शिकण्याची सहजप्रवृत्ति नष्ट होते.  दर्यावर्दी ताऱ्यांकडून शिकतो. तारे काहीही शिकवत नाहीत. सूर्य आपलं अंतःकरण खुलं करतो, व फुलापानांवर प्रकाशाचा वर्षाव करतो.  वाचणाऱ्याची नजर पुस्तकाच्या पानांना लाज आणते. संकेतांमुळे कल्पनेचा सत्यानाश होतो. आसक्तीपुढे गर्वही वरमून जातो. तुम्ही पृथ्वीवरील अवमानित आहात. जणू वाळवंटात पाण्यासारखे आहात.  जगाचे लाडके होणं म्हणजे यशाची प्रतीकं होणं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशस्वी होता कामा नये, कारण जगणं अंतहीन आहे.    तुम्ही फुलाइतके अनामिक आहात. व्हीनसचा पुत्र आहात. निसर्गतः वासना हेच व्हीनसचं वात्सल्य असतं. तुमच्या बेंबीभवती तिची जीभ फिरेल, पण त्यात वावगं वाटून घेऊ नका, कारण प्रेमाविना जगात आहेच काय?  तुम्ही प्रेमाच्या रक्षणार्थ कामी येणारा दारुगोळा आहात!     - बिल गन , त्याने दिग्दर्शित केलेल्या ' गांजा अ...

पवित्र सावली

सूफी कथा आहे: कोण्या एके काळी एक अत्यंत सदाचारी व्यक्ती होती. आपण तिला 'साधू' म्हणू. हा साधू इतका निर्मळ होता, की एखादा मानव इतका नितळ, इतका सच्चा कसा असू शकतो, यावर आश्चर्य करीत आकाशातील देवदूतसुद्धा त्याला कौतुकाने न्याहाळत. ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे साधूच्या दैनंदिन जगण्यातून सदाचार पाझरत असे. त्याला याची किंचितही जाणीव नव्हती. त्याच्या रोजच्या व्यवहाराचं वर्णन दोनच शब्दांत करता येईल - दया व क्षमा. पण त्याच्या तोंडून या शब्दांचा उच्चारदेखील झाला नसेल. त्याच्या सहज हास्यातून, करुणामय, सहनशील, उदार वर्तनातूनच ते शब्द प्रतीत होत असत. देवदूतांनी देवाला गळ घातली, "देवा, या माणसाला चमत्काराचं वरदान द्या ना." देव हसून म्हणाला, "असं कसं! त्याला काय पाहिजे, ते आधी त्याला विचारायला नको?"   देवदूत साधूच्या स्वप्नात प्रकटले. "आपण फार फार सज्जन आहात. केवळ स्पर्शाने रोगी-आजारी मंडळींच्या व्याधी दूर करण्याची किमया आपल्याला साधली, तर आपणास ते आवडेल का?"   "कशाला? ते देवाच्या हातांत आहे. ती त्याची कृपा आहे."   ...

नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं:

Image
....साहस, धडाडी, बुद्धिमत्ता आदी प्रभावी गुणांनी युक्त मनुष्य त्या गुणांचा वापर केवळ स्वार्थसाधनेसाठी करत असेल; त्याच्या वर्तनात जर इतरांच्या हक्कांप्रती निर्मम अनास्था झळकत असेल, तर याची परिणती तो मनुष्य अधिकाधिक नीच, पापी होण्यात झाल्याखेरीज रहात नाही. एखादा समाज या गुणांची पूजा करत असेल; गुणांचा वापर योग्यरित्या केला जातो अथवा नाही हे न लक्षात घेताच गुणीजनांचा उदोउदो करत असेल, तर त्यातून त्या समाजाची कृपणबुद्धी, अविवेक दिसून येतो. ....निव्वळ कर्तृत्वावरून, संपादित केलेल्या यशावरून एखाद्या व्यक्तीची पारख करण्यासारखी भीषण चूक दुसरी नाही. जर लोक माणसांचं मूल्यमापन सर्रास यापद्धतीने करत असतील; दुष्ट मनुष्याची सरशी होतेय म्हणून दुष्टवृत्तीला मोकळीक देत असतील, तर 'स्वायत्त संस्थांची भिस्त ही अखेर नागरिकत्वाच्या निष्कलंतेवर असते' हे सत्य समजावून घेण्यास सदर लोक अक्षम असल्याचं स्पष्ट दिसून येतं. दुष्टाईची खुशामत करणारे लोक हे 'आपण स्वातंत्र्याकरता ना-लायक असल्याचं' सिद्ध करतात. ....प्रजासत्ताकातील नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं: 'प्रजा...

विचार मौलिक (original) असतच नाहीत, अनुभूती मौलिक असते

Image
* हे भाषांतर माझं नाही.*   प्रश्न: एकीकडे आपण गीता, बायबल, कुराण आदी धर्मग्रंथांद्वारे प्रतिपादित धर्म मानत नाही. मग त्यांचे विचार का म्हणून चोरता?   रजनीश (ओशो) : ...काही दिवसांपूर्वी जे. कृष्णमूर्तींच्या एका अनुयायाचं पत्रं आलं. माझ्या विचारांमध्ये कृष्णमूर्तींच्या विचारांची झलक दिसते असं त्याचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. पण हेदेखील लक्षात घ्या, की कृष्णमूर्तींच्या बोलण्यात बुद्धाची झलक आहे, लाओ त्सूची झलक आहे, उपनिषदांची छाप आहे. त्यांच्या विचारांमध्ये झेन गुरुंची पुनरुक्ति आहे. याचा अर्थ 'कृष्णमूर्तींनी उपनिषदांतून विचार चोरले' असा घ्यावा का? - नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल. माझी तर अशी धारणा आहे, की विचार मौलिक असतच नाहीत. भाषा मौलिक असतच नाही. 'मौलिक' (original) या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. 'मौलिक' म्हणजे मुळापासून, उगमापासून, स्रोतापासून आलेलं. शब्द मौलिक नाहीत, ते शतकानुशतकांच्या परंपरेतून आलेले आहेत. पण शब्दांचा वापर करावा लागतो, बोलावं तर भाषेतच लागतं! त्याला इलाज नाही. दुर्दैव असं, की भाषेची वस्त्र चढवू लागताच अनुभूती गायब होते, लुप्त होते.  ज्याला ख...

सहजता, संघर्षमुक्तता

Image
सहजता ही मनोवैचारिक गोष्ट नव्हे. मुद्दामहून अंगी बाणवलेली सहजता, साधेपणा म्हणजे निव्वळ धूर्तपणे केलेली तडजोड असते, सुख-दुःखाच्या भोगापासून बचाव व्हावा यासाठी ती केली जाते.  ही स्वतःला स्वतःतच कोंडून घेण्याची क्रिया असते, आणि हीतून नानातऱ्हेचे संघर्ष, संभ्रम उद्भवतात.   संघर्षमुक्त होण्यातून सहजता येते, संघर्षावर मात करण्यातून नव्हे. एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवावा लागतोय याचाच अर्थ ती पुन्हा पुन्हा नियंत्रणाखाली आणावी लागतेय. मग संघर्ष निरंतर चालूच राहणार. संघर्षाचं आकलन करून घेणं म्हणजे इच्छा, वासनेचं आकलन करून घेणं.     निरीक्षणकर्ता व निरीक्षित केली जाणारी एखादी गोष्ट, यांची जी प्रक्रिया असते तीत द्वैत नसतं, ती अखंड प्रक्रिया असते. या प्रक्रियेच्या एकात्म वास्तवाची अनुभूती आली तरच वासना, कलहांतून मुक्तता होते. 'हे वास्तव कसं बरं अनुभवता येईल?' असा प्रश्न विचारून उपयोग नाही. ते स्वाभाविकपणे घडून यायला हवं. दक्षता, अक्रिय, ग्रहणशील सजगता असेल तेव्हाच ते घडून येईल. ...खोलीत बसल्या बसल्या, कल्पनारंजन करून विषारी सापाला सामोरं जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. खर...