Posts

Showing posts with the label nature

कूसा-हिबारी

Image
कूसा-हिबारी   लेखक: लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो मराठी संपादन व भाषांतर: मुक्ता 'असरार' 'पाश्चात्त्य जगाला जपानची ओळख करून देणारा कथाकार' असा लेखक -पत्रकार  लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो (१८५०-१९०४ ) यांचा मुख्य लौकिक म्हणता येईल. सन १८९० पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते जपानमधे राहिले, जपानी भाषा, संस्कृती आत्मसात केली, विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून जपानी लोकसाहित्याचा संग्रह व इंग्रजीत भाषांतर / पुनर्लेखन केलं, जपानी स्त्रीशी विवाह केला, जपानी नागरिकत्व स्वीकारलं. यामागे व्यावहारिक कारणं असतीलही परंतु गूढ श्रद्धांनी, वैचित्र्यपूर्ण चालीरितींनी नटलेल्या, निसर्गाशी नातं सांगणाऱ्या तत्कालीन जपानी जीवनशैलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता, हे तितकंच खरं. आधुनिक पाश्चात्त्य औद्योगिकतेच्या प्रभावाखाली ही संस्कृती नष्ट होणार याची त्यांना खंत वाटे. कोणताही धूर्त राजकीय, धार्मिक वा व्यापारी हेतू न बाळगणारा; साम्राज्यवादाचा, वंशभेदाचा तिटकारा असलेला 'गोरा' म्हणून जपान्यांनीही त्यांच्यावर माया केली.  जपानमधे हौसेखातर लोक नानातऱ्हेचे कीटक पाळ...

कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे

Image
  * ईमेल खातं बददल्यामुळे जुनी पोस्ट पुनःप्रकाशित करतेय *     कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे   निक पॅटन वॉल्श, वास्को कोटोविओ   |  सी.एन.एन. , मार्च २०, २०२०    मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' वटवाघूळ: अलिप्त, निशाचर, दाटी करून राहणारा प्राणी. वटवाघळाला कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत मानलं गेलं आहे. तथापि आपल्या दैनंदिन आयुष्यात उलथापालथ घडवणाऱ्या या रोगाचा प्रसार होण्यास वटवाघूळ जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत यावर काही वैज्ञानिकांचं एकमत आहे. प्राणिशास्त्रज्ञ व रोग-विशेषज्ञांनी सी.एन.एन.ला दिलेल्या माहितीनुसार मानवी वर्तणुकीतील बदल - मानव करीत असलेला नैसर्गिक अधिवासांचा विनाश; तसंच त्याचं प्रचंड संख्येने, जलदगतीने पृथ्वीवर संचार करणं - यामुळे आतापावेतो निसर्गात कुलूपबंद असणारे विकार मानवामधे वेगाने प्रवेश करत आहेत. कोरोना विषाणूची उत्पत्ती मुळात कशी झाली याचं खात्रीशीर उत्तर वैज्ञानिकांना अद्याप गवसलेलं नाही. संशयित प्रजातीतील जिवंत विषाणूचं पृथक्करण करता आल्यास त्याचा मूलस्रोत सिद्ध करता येईल - हे फार जिकिरीचं ...

कोरोना-काळात भाषांतरित केलेला वटवाघुळांवरील लेख

Image
    * ईमेल खातं बददल्यामुळे जुनी पोस्ट पुनःप्रकाशित करतेय * कोरोना-साथीचं खापर वटवाघूळांवर फोडणं ही चूक   पीटर अ‍ॅलागोना  |  'दि कॉन्व्हर्सेशन ',  मार्च २४, २०२०   मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार'    नाइमे ह् नाईमी (Naeemeh Naeemei) या इराणी चित्रकर्तीच्या ' ड्रीम्स बिफोर एक्स्टिंक्शन '   चित्रमालेतून   कोविड-१९ कोरोना विषाणू उत्पत्ती  संभाव्यतः वटवाघुळांमधे झाल्याचं निदर्शनास आणणाऱ्या जिनोमिक (जिनोमिक्स = गुणसूत्र-संचाचं विज्ञान) संशोधनाला  माध्यमांतून प्रसिद्धी मिळाली आहे. एक मोठीच चिंता डोकं वर काढतेय - घाबरलेली जनता व गैरमाहिती मिळालेले अजाण अधिकारी रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या भरात या अद्भुत जीवांचा संहार करतील असा धोका निर्माण झाला आहे. ...जरा लक्षात घ्या - पूर्वीदेखील असले उपाय निष्फळ ठरले आहेत. वटवाघूळ हा प्राणी आपली कशी मोलाची मदत करतो, या प्राण्याला संरक्षण मिळणं किती अत्यावश्यक आहे, ते धोक्यात आलेल्या प्रजाती व जीवशास्त्रीय वैविध्यावर लक्ष केंद्रित करणारा पर्यावरणीय इतिहासकार या नात्यानं म...

कमलतारा - एक ब्राझिलियन लोककथा

Image
  * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   वनस्पतितज्ञ प्रा. हेमा साने यांच्या 'कमळ' नामक पुस्तिकेत राजकमळाबद्दल (जायंट वॉटर लिली - Victoria amazonica / Victoria regia) सुरस माहिती वाचायला मिळते. डुंगी च्या (छोटी होडी) आकाराची अजस्र पानं हे या कमळाचं मुख्य वैशिष्ट्य. पानाचा व्यास दोन मीटरहून अधिक, जाडी जवळपास एक ते दोन मिलिमीटर, आणि वाढीचा वेग ताशी एक इंच! पूर्ण वाढलेलं राजकमळाचं पान सहाशे ते सातशे चौरस फूट भरतं. शिरा व बरगड्यांमुळे निर्माण झालेली जाळीदार नक्षी पानाच्या खालच्या भागाला शोभा आणते.     कमळाचं परागण भुंग्यांमार्फत होतं. ज्या रात्री फूल उमलतं त्या रात्री त्याचा रंग धवल असतो. दुसऱ्या दिवशी त्यावर सुरेख गुलाबी रंग चढतो. न मोडता, न वाकता हे प्रचंड पान १०० ते १२५ किलो वजन पेलू शकतं!     सानेबाईंनी ब्राझीलमधील टुपी-ग्वारानी समाजात या फुलाविषयी प्रचलित असलेल्या लोककथेचा उल्लेख केला आहे, ती अशी: दूरवरच्या टेकड्यांवर चंद्रदेव दिसतो. रात्री तो आपल्या प्रियतमांबरोबर भटकंती करतो. पृथ्वीवरील कुणी सुंदर स्त्री त्याच्या नजरेत भ...

अवचिता परिमळु

*हा ललितलेख एका दिवाळी अंकात वाचला. मनाला भावला. त्यातील काही अंश. सदर लेखनावर स्वामित्व हक्क सांगण्याचा, वा त्यापासून कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.   ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *   अवचिता परिमळु    राणी दुर्वे   आडवाटेचा महाराष्ट्र पाहण्याच्या हौसेपायी सुखाचा जीव दुःखात घालून प्रवासाला निघालो होतो. दिवसभराच्या एस.टी.च्या प्रवासाने अंग आंबल्यासारखे झाले होते. संध्याकाळ होत आली होती. एकदाचा प्रवास संपावा आणि कुठेतरी जाऊन पडावे इतकीच इच्छा उरली होती. एस.टी.चा कुबट वास आणि त्यात मिसळलेले अनेक वास... पोटात ढवळत होते.    माळशेज घाट पार करून एका ठिकाणी एस.टी. थांबली. बस थांबताच धडपडत आम्ही बाहेर पडलो. श्वास भरून आधी मोकळी हवा पिऊन घेतली. खेड्याचे नाव आता आठवत नाही. ऑफिसमधल्या एका माणसाच्या ओळखीने एक पत्ता मिळाला होता. तिकडची वाट धरली. घर गाठले. चांगले नांदतेगाजते शेतकऱ्याचे घर होते. संध्याकाळच्या उजेडात एखाद्या चित्रासारखे दिसत होते. गायीगुरे, मोकळी बैलगाडी, बकऱ्या, कोंबड्या, मुले-माणसे सगळे...

चितमपल्लींचा तक्ता

Image

दुर्गाबाई सांगतात पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं..

विस्मरणात चाललेल्या मराठी पाककृती व एकंदर पाकवैविध्यासंबंधी दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले लेख 'खमंग' या शीर्षकाखाली पुस्तकरुपाने संकलित करण्यात आले. पशुपक्षी व मानवी पाकशास्त्राचं नातं दर्शवणारे दोन-तीन दाखले बाईंनी दिलेत. आवर्जून वाचावे:   ...दोन प्राण्यांनी माणसाच्या पाकज्ञानात भर घातली आहे: अस्वल व माकड.  दक्षिणेकडे अस्वलं मोठ्या प्रमाणावर आढळतात. हे अस्वल शाकाहारी असतं. त्याचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं. वसंतात झाडांना फुलं धरली, की अस्वलं हरतऱ्हेची सुवासिक फुलं गोळा करतात. मधाची पोळीदेखील उतरवतात. ही पोळी व फुलं एकत्र करून पायाने वा काठीने तुडवतात. या काल्याला 'अस्वलाचं पंचामृत' म्हटलं जातं. ते अत्यंत पौष्टिक असतं. माणसालाही ते आवडतं, व ते हस्तगत करण्यासाठी अस्वलांची शिकार केली जाते.  ..अस्वलाने शिकवलेला हा पदार्थ मी (घरी) करून पाहिला. बरीच वासाची फुलं व खूपसा मध घालून मी ते केलं. काहीजण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात, की त्यांना हा पदार्थ रुचला नाही. मी मात्र तो आवडीने खाल्ला.   माकडाकडून मानवजातीला मिळालेला अपूर्व पदार्थ म्हणजे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू! ..आम्ही ...

पक्षीकर्ती

Image
*ही मुलाखत मी घेतलेली नाही. एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतील निवडक अंशांचं हे भाषांतर आहे. सदर मुलाखतीवर, तसेच छायाचित्रांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा वा तिच्या भाषांतराद्वारे कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.*       ...‘ती’ काय करते? ती पक्षी पाहण्यात रमते, पक्ष्यांच्या प्रतिकृती निर्माण करते. विविध शहरांतील, खेडेगावांतील शाळांमधून, पर्यावरण-उत्सवांमधून वन्यजीव संवर्धनाबद्दल संवाद साधते. ‘पेपर चर्र्प्स’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला तिच्या कारागिरीची झलक दिसते. मुख्यतः कागद वापरून साकारलेल्या अत्यंत देखण्या, बारकावेयुक्त प्रतिकृती बघताना आपण थक्क होऊन जातो.  दिल्लीस्थित या तरुणीचं नाव आहे निहारिका रजपूत.        तुझ्या पहिल्यावहिल्या पक्षीकृती बद्दल काही सांगशील? २०१६ साली इंग्लंड मधील ‘बर्डर्स अगेन्स्ट वाइल्डलाइफ क्राईम’च्या जनजागृती मोहिमेकरता मी हेन हॅरिअर (Circus cyaneus) प्रजातीच्या हारीण पक्ष्याच्या काही प्रतिकृती बनवल्या. आजघडीला मी ज्या तऱ्हेच्या प्रतिकृती घडवते त्यांची ती सुरुवात म्हणता येईल....

नखचोखी मुंगी

Image
मी नखं कापून एका जागी रचून ठेवली व काही मिनिटांकरता दुसऱ्या कामात गुंतले. नखं गोळा करू म्हटलं तेव्हा एक मुंगी नखावर चढून काहीतरी करताना (खाताना / चोखताना) दिसली. नखं मोजून पाहते तर दोन तीन कोरी गायब झालेल्या! थोड्या अंतरावर मुंग्यांची रांग भिंतीतल्या फटीत चालली होती. कदाचित त्यांनी नेली असावीत. ही  मुंगी मात्र जरा अधीर असावी, किंवा गर्दी टाळत असावी, कुणास ठावूक! पण ती नक्की काय करत होती? कशासाठी? आपली नखं 'केराटिन' नावाच्या कठीण प्रथिनानं बनलेली असतात. मुंग्यांना हे पचण्यास फार जड. परंतु कापलेल्या नखांतले मृत त्वचेचे अंश, काही प्रकारची बुरशी, (आपण हाताने जेवत असू / स्वयंपाक करत असू तर) अन्नाचे सूक्ष्मांश वा तत्सम जैविक घटक मुंग्यांच्या दृष्टीने खाण्यालायक असतात. त्यामुळे मुंग्यांच्या खाद्य-बेगमीत आपल्या नखांचा समावेश असल्यास आश्चर्य वाटायला नको! पश्चिम गोलार्धात आढळणाऱ्या 'अटिना' उपकुळातील मुंग्या पेशानं शेतकरी, पोषणासाठी बुरशीची लागवड करणाऱ्या.  ही बुरशी केराटिनचं विघटन करू शकते, त्यामुळे या मुंग्या 'बुरशीचा खाऊ' म्हणून मानवी नखं वापरत असाव्यात. भारतातील ...

जॉर्ज बर्नार्ड शॉ, फुलं, प्राणी

पशुपक्षी माझे मित्र आहेत आणि मी आपल्या मित्रांना खात नाही. माझं शरीर म्हणजे प्राण्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणारं मसण व्हावं अशा माझी इच्छा नाही. मला फुलं आवडतात, मुलंही आवडतात. पण मी मुलांची मुंडकी छाटून, ती पाण्यानं भरलेल्या तबकांत मांडून माझं घर सजवत नाही. - जॉर्ज बर्नार्ड शॉ

अर्सूला के. लं ग्विन - काही उद्गार

Image
जग सत्कारणी लावायचं असेल; जगाची व जगात व्यतीत होणाऱ्या आपल्या काळाची उधळमाख थांबवायची असेल तर 'या जगात असावं कसं' हे आपण पुन्हा नव्याने शिकून घ्यायला हवं. जगण्याचं कसब; आपण इथलेच, या विश्वाचेच असल्याचं भान; विश्वाचा एक अंश असण्यातला अत्यानंद या साऱ्यात नित्य जाणीव अंतर्भूत असते - पशुमात्रांशी एक पशू म्हणून, भूतजीवांशी एक जीव म्हणून, पदार्थवस्तूंशी एक पदार्थवस्तू म्हणून आपलं जे सख्य असतं, नातं असतं त्याची जाणीव. झाडं, नद्या, टेकड्यांना सहचरांच्या, आप्तेष्टांच्या गोतावळ्यात सामावून घेऊ शकलो तर कदाचित आपण त्यांच्याकडे निव्वळ 'नैसर्गिक संसाधनं' म्हणून पाहणार नाही. मला वाटतं मी अखिल सृष्टीला विषयरूप देण्याचा, तिला आपलं म्हणण्याचा प्रयत्न करतेय, कारण तिला स्वतःवेगळं काढल्याने, तिचं ठोस वस्तूकरण केल्याने आपण कुठे येऊन पडलोत पहा ना! ताब्यात घेणं, पादाक्रांत करणं, पिळवणूक इतकाच फक्त 'आपलं म्हणण्या'चा अर्थ नव्हे. ही आपणवणूक मन व कल्पनाशक्तीपल्याड मोठी झेप घेण्याशी निगडित असू शकते. ...विज्ञान बाह्यात्काराचं अचूक वर्णन करतं. कविता अभ्यंतराचं स्पष्टवर्णन करते. विज्ञान विवेच...

The difference

The 'world' is out of question, out of danger. It has known a great deal. Above all to spin, to adorn itself with passage of things adorning, with itself, each passing thing. It feeds on much we love and loath, much, in other words, we don't know : 'good' and 'foul' and 'fast' and 'more' are holes in our begging-bowl. We were in danger, we shall be guided by self-surity An eyed man doubts not his sight Anyone breathing brags himself alive Shielded in ambition, he is ready to miss The ethereal arrow. Would you, say, with goods galore, kin more than many, reckon yourself buried already? Would I; quarrying outcome, fondling praise or pearls of concord, suspect myself lost? 'Our' world is in danger - heartless doings, countless, one atop another in collective effort to fill bottomless pits to tuck the abysses neat and fringe bare existence with meaning ankles to feet! In the world voids brim with ghostly stars, heavenly waters; are ramme...