चिं. वि. जोशींच्या लिखाणात फक्त विनोद नव्हता...

***प्रस्तुत लेखन माझे नाही व त्याद्वारे कोणत्याही स्वरूपात मोबदला मिळवण्याचा माझा हेतू नाही *** * ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. * चिं. विं.च्या "आमचा पण गांव " (प्रथम प्रथमावृत्ती : १९५२, कॉन्टिनेन्टल प्रकाशन) या पुस्तकातील उतारा: ......आम्ही परत घरी येण्यास निघालो; थोड्याच वेळात अंधार पडणार होता. हरणगावात स्थानिक स्वराज्य अथवा नगरपालिका नव्हती, त्यामुळे रस्त्यात रात्री दिवे नसत. त्यातून ते दिवस घासलेटाच्या टंचाईचे आणि ब्लॅकआऊटचे (दुसऱ्या महायुद्धाचे) असल्याने नगरपालिका असती तरी तिने काय दिवे लावले असते म्हणा! आम्ही बाहेर पडून चार पावले गेलो नाही तोच उलट बाजूने गावातील गायी-म्हशींचा जंगी कळप येऊन त्याने सगळी वाट अडवून टाकली होती म्हणून आम्ही बाजूस उभे राहिलो. गाई येताना विशिष्ट जागेशी थबकून भुईवरचा एक काळा पदार्थ हुंगून तो टाळून जात होत्या. आम्ही न्याहाळून पाहिले, तेव्हा दिसले की ते एक महिन्याहून कमी वयाचे कुत्र्याचे पिलू आहे. आपल्या दोन्ही बाजूंनी एक-सारख्या पसार होणाऱ्या त्या प्रचंड प्राणसंकटाने ते पिलू घाबरू...