Posts

बिल गनचे उद्गार

Image
तत्त्वज्ञान हा तुरुंग असतो. तुमच्याबद्दलच्या अवांंतर, चित्रविचित्र गंमतगोष्टींना त्यात थारा नसतो. विचारप्रक्रियेची निष्पत्ती काय, हे ती प्रक्रियाच जाणे!  माणसाला शिकवण्याची भारी खाज असते. त्यामुळे शिकण्याची सहजप्रवृत्ति नष्ट होते. दर्यावर्दी ताऱ्यांकडून शिकतो. तारे काहीही शिकवत नाहीत. सूर्य आपलं अंतःकरण खुलं करतो, फुलापानांवर प्रकाशाचा वर्षाव करतो. वाचणाऱ्याची नजर पुस्तकाच्या पानांना लाज आणते. संकेतांमुळे कल्पनेचा सत्यानाश होतो. आसक्तीपुढे गर्वही वरमून जातो.  तुम्ही पृथ्वीवर उपरे आहात, जणू वाळवंटात पाण्यासारखे आहात. लोकप्रिय होणं म्हणजे यशाची प्रतीकं होणं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशस्वी होता कामा नये, कारण जगणं अंतहीन आहे. तुम्ही फुलागत अनामिक आहात, व्हीनसचा पुत्र आहात. निसर्गतः वासना हेच व्हीनसचं वात्सल्य असतं. तुमच्या नाभीभवती तिची जीभ फिरेल - त्याने संकोचू नका, दचकू नका, कारण प्रेमाविना जगात आहेच काय! प्रेमाच्या रक्षणार्थ कामी येणारा दारुगोळा आहात तुम्ही ! - बिल गन , त्याने दिग्दर्शित केलेल्या ' गांजा अँड हेस ' या चित्रपटातून   

मृत्यूशय्येवर... (जर्मन नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     मृत्यूशय्येवर...   मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक   (एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. त्याचं कुटुंब त्याच्या शय्येभवती जमलंय. पलंगाच्या दुसऱ्या टोकाला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळतेय.) शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठायस तू? मेरी : इथेच आहे मी, तुझ्याजवळ. शेतकरी : एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं? एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे. (अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या प्रत्येक माणसाचं - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - नाव घेऊन तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)   शेतकरी : सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!   मेरी (त्याला पुन्हा झोपवत): अरे, असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही? शेतकरी : छे छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर. मेरी : ठीक आहे. (इतरांना उद्देशून) चला, सगळे आपापल्या कामाला जा. (सगळे जातात. फक्त मेरी तिथे थांबते.) शेतकरी : आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला ...

म्हातारचळ (जर्मन नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *   म्हातारचळ मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर     (म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)  म्हातारा:  म्हातारचळ झिंदाबाद!   सर्व म्हातारे (पेला उंचावत):  झिंदाबाद! झिंदाबाद!   (सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात.  पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)

नातेेसंबंधांत प्रतिमा-निर्मिती

Image
आपले परस्परसंबंध - कितीही दूरचे वा निकटचे असोत - या संबंधित्वाचा पुरा अर्थ उमगायचा, तर मेंदू प्रतिमा-निर्मिती का करतो हे समजावून घ्यायला हवं, यावर चिंतन व्हायला हवं. आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मनात प्रतिमा, दृढचित्रं का बाळगतो? स्विस, ब्रिटिश, फ्रेंच इ. म्हणून जर तुमची एक प्रतिमा असेल...या प्रतिमांमुळे आपलं मानवतेबद्दलचं अवलोकन दूषित होतंच, शिवाय त्या माणसा-माणसात फूट पाडतात, नाही का? आणि जिथे विभक्तता, भेदाभेद असेल तिथे संघर्ष उद्भवणारच. प्रतिमा निर्माणच न करणं मुळी शक्य आहे का? - येतंय लक्षात? घडल्या घटनांची नोंद न ठेवणं; प्रसंग आनंदाचा असो, दुःखाचा असो, त्याचा हिशेब न ठेवणं. निंदा, अपमान, स्तुती... प्रोत्साहन मिळो वा उत्साहभंग होवो... कळतंय? आपल्या दैनंदिन नातेसंबंधांत हे सारं घडत असतं - त्याची नोंद, त्याची गणती न करणं शक्य आहे का? मेंदू जर स्वतःबाबत घडणाऱ्या हरेक गोष्टीची मनोवैचारिक नोंद ठेवत बसला, तर त्याला निवण्याची, शांतवण्याची फुरसत कधीच लाभत नाही; तो  निरावेग, निशांत होऊच शकत नाही. अहोरात्र घरघरणारी यंत्रणा अखेर झिजून जाते, शिणून जाते - साहजिक आहे. नातेसंबंध...

‘परित्राणाय साधूनां...’चा नेमका अर्थ काय?

Image
कृष्‍ण-स्‍मृति: प्रवचन पाचवे मधून (२७ सप्टेंबर १९७०, कुल्लू्-मनाली)   प्रश्न: ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्...’ हे कृष्णवचन सुविख्यात आहे. त्याचा नेमका अर्थ काय?   रजनीश (ओशो): ‘साधूंचं रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा विनाश, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी मी अवतरेन...’ हम्म. या वाक्याचे दोन्ही भाग अगदी समानार्थी आहेत. दुष्टांचं निर्दालन म्हणजेच सुष्टांचं रक्षण. मात्र ‘दुष्टांचं निर्दालन’ म्हणजे नेमकं काय, हे जरा बारकाईने समजून घेतलं पाहिजे.   दुष्टांचा अंत कसा होईल? - त्यांचा वध करून? छे! वध केल्याने दुष्ट लोक मरत नाहीत. या विश्वात मारल्याने काही मरत नाही, हे कृष्णाला चांगलं ठावूक आहे. दुष्टाला सुष्ट बनवलेत, असाधूला साधू बनवलेत, तरच दुष्टाईचा अंत होतो. बस्स, अन्य कुठलेच उपाय इथे चालत नाहीत. हत्या केल्याने दुर्जन मरत नसतात. हत्येने फारतर देहाचा अंत होईल. मग तो दुराचार, दुष्टवृत्ती अन्य देह धारण करेल. दुर्जनांचं हृदयपरिवर्तन घडून जेव्हा ते सज्जन होतात, साधू होतात, केवळ तेव्हाच त्यांच्यातील दुष्टवृत्तीचा, पापवृत्तीचा समूळ नाश होतो.   आता, ‘साधूंचं रक्षण’ याचा ...

प्रतिष्ठेसाठी काम करणारा माणूस कार्यक्षम असूच शकत नाही

Image
 ** हे भाषांतर माझे नाही, मी फक्त याचेे संपादन केेले आहे. **   जन्मल्यापासून मरेपर्यंत, अखेरच्या क्षणापर्यंत तुम्ही अहोरात्र लढत, धडपडत असता, भांडत-तंटत असता; अथक, अंतहीन परिश्रम करता. याहून निराळी जीवनरीत अस्तित्वात असणार यात शंकाच नाही, मात्र आपण माणसांनी ही धडपड, हा झगडा (struggle) अगदी मनोभावे आपलासा केला आहे. शाळकरी मुले झगडा स्वीकारतात, वयस्क पिढ्यांनी तो स्वीकारला आहे. आपण का म्हणून झडगतो? त्या धडपडीचे, खटाटोपाचे, आकांक्षांचे सार काय असते? अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, हरेक क्षेत्रात आपण सदैव इतके वखवखलेले का असतो? तथाकथित ‘आध्यात्मिक’ मंडळी, दाढीधारी साधू-संन्यासी, राजकीय नेते, सत्ताधारी, उद्योजक, व्यापारी, ज्ञानसंपादन करणारी माणसे - सर्वचजण महत्त्वाकांक्षेने पछाडलेले असतात ते का बरे?? ही झुंज, वणवण, धडपड, तडफड...कशासाठी?   असे बघा: प्रत्येक जीवाचे काही ना काही कार्य असते. माणूस म्हणून आपल्याला काही कार्ये पार पाडावी लागतात - कामधंदा करावा लागतो, शिकावे लागते, पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात. परंतु मनुष्याला केवळ कार्यधारक (functionary) न राहता आणखी काहीतरी / कोणीतर...

Four-hundred-and-forty-legged hope

Image
 Four-hundred-and -forty-legged hope  (with original Marathi poem)   Govind Vinayak 'Vindā' Karandikar   (1918 - 2010) English translation: Mukta 'Asraar' Dear friend, My hope stands not on two, but on four-hundred-and-forty feet. I'll tell you how: Socrates was tried by an Athenian court for inciting the youth and sentenced to death by poisoning (ask Plato how he downed that cup - let's not digress here) but that wasn't it. Two hundred-and-twenty out of the five hundred jurors had in fact found him not guilty. (I wish to meet them sometimes, but let's not digress here) Thus, dear friend, my hope stands not on Socrates' two feet, but on the four-hundred-and-forty feet of those two-hundred-and-twenty jurors. पाया   विंदा करंदीकर   मित्रा, माझा आशावाद दोन पायांवर उभा नसून चारशे चाळीस पायांवर उभा आहे. कसा ते ऐक:  तरुणांना भडकाविल्याच्या आरोपाखाली सोक्रेटिसवर अथेन्सच्या न्यायालयात खटला झाला  आणि त्याला विषाचा प्याला घेण्याची शिक्षा झाली  (ती...

संगीत

Image
  *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*   जगता जगता मनाचा पट किती नरमलाय! दिसामाजी दोन वेळा मेजावरून कपडा फिरावा तसा हजारो दिवस-रात्रींशी, देहाशी लाग-लागून तो थकलाय, विरलाय. आडपडदा राखणं आता शक्य नाही - गरजच उरली नाही. या खोलीत येणं, करकरत्या फळ्यांवर चालणं.. शिकणं किती सहज झालंय नै आज? शिकवण्यातदेखील आता अवघडलेपण नाही. हा आपला पहिला वर्ग, पहिला पाठ. ...कित्येक वर्षांपूर्वी, तरुणपणी जे शिकून गेलास ते शिकणं नव्हतं मुळी. 'संगीत' हे तुझ्याकरता कुणीतरी बनण्याचं साधन होतं, 'संगीताचा विद्यार्थी' बनून माझ्यापाशी आला होतास. त्यात तुला गती होतीच. शिकणं औपचारिक, मोहोर उमटवून घेण्यासाठी. ..वयात येताना तडकलेल्या आवाजाचं न्यून वाद्याच्या सहाय्यानं भरायचं होतं. पिढीजात चांभारकी, कळकट 'गावंढळ' आयुष्य दूर ढकलण्यासाठी सुरांचं बळ तुला हवं होतं. गांभिर्याचा आवेश होता. संगीताबद्दल गांभिर्य होतं, नाही असं नाही. माझे धुळीत थुंकल्यासारखे बाष्कळात बाष्कळ शब्ददेखील वेचून घेतले असतेस तू तेव्हा.  आणि मी? ..संगीतापासून एक दरवाजा...

कर्म हेच फळ

Image
जोवर कर्म हाच आनंद बनत नाही; कर्माच्या बाहेर कुठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे या भ्रमात जोवर तुम्ही रहाल, तोवर दुःखंच दुःखं तुमच्या वाट्याला येणार हे नक्की .   वास्तविक कर्मात, आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो; परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता , इथे मी जे केलं, त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ...कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला.   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून जाऊ देत नाही. मनात धरून ...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures . यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो.     ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकानं थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं! या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही; तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण त्या बापाचे बाप आम्ही होतो! स्वतःवर तर आमचा विश्वास नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट...