Posts

Showing posts with the label short story

गंधावर्त

Image
* 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या फेब्रुवारी २०२५ अंकात ही कथा प्रसिद्ध झाली होती. *     गंधावर्त     मुक्ता 'असरार'    © मुक्ता असनीकर    सांज होतेवेळी तुमची डॉर्मिट्री बव्हंशी रिकामी असायची, तेव्हा यायचे मी कधीकधी – तूही नसायचीस तेव्हा. तुझं व तुझ्या बंक पार्टनरचं सामायिक कपाट उघडायचे, एकामागून एक तुझे कॉस्मेटिक्स बाहेर काढायचे, हुंगून पहायचे, पुन्हा कप्प्यात ठेवून द्यायचे. आमच्या डॉर्मिट्रीसारखीच ही आणखी एक मोठ्ठी खोली: हवेशीर, ऐसपैस, बंकबेड्सने भरलेली. पण तुमच्याइथे उजेड बराच रेंगाळायचा. त्या-त्यावेळी हजर असलेल्या कुठल्याच मुलीनं तुझ्यापाशी चुगली केली नसावी. त्यांना वाटत असेल तुझ्या परवानगीनंच चाललीय ही शोधाशोध. मॉइश्चराइजर, दोन प्रकारची तेलं, शांपू, सनस्क्रीन, लिपबाम, काजळ, इम्पोर्टेड काहीतरी - परक्या शब्दांखाली बारीक अक्षरांत लिहिलेले इंग्रजी अर्थ कायम विसरून जायचे मी. कप्प्यात मागच्या बाजूला जादा साबणांची एक-दोन खोकी, औषधी मलमं...हं, टॅल्कम पावडर वापरत नाहीस. पण 'तो' गंध हवाय मला...कुठाय तो? प्रत्येक खोक्याचा, बाटलीचा, डबीचा मी अंतर्बाह्य वास...

ज्युलिआं

* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *       ज्युलिआं   मुक्ता 'असरार'   ती जागी झाली तेव्हा दुपार कलली होती. उन्हाचा उभा आयत खिडकीतून आत आला होता. छतापासून डागडुजीला आरंभ केल्याप्रमाणं जुनाट वॉलपेपर उजळवत हा पट्टा पलंगात उतरला होता. उन्हात माखलेल्या पावलाकडे, नखांच्या अस्फुट तकतकीकडे पहात ती जागीच पडून राहिली.    कॅबरेत गाऊ लागल्यापासून सकाळ होताना पाहणं दुरापास्त होतं, त्यावेळी ती गाढ झोपेत असे. मोठ्ठ्या पंपांतून रस्त्यांवर पाणी मारणारे स्वच्छता कर्मचारी, दुचाकी उडवत जाणारे पेपरवाले, गल्लीच्या तोंडाशी एखादा 'शुमान' लाँड्री ट्रक थांबल्यानं ट्रॅफिकला बसणारं बूच, त्यावरून होणारी बाचाबाची, चामडी दप्तरं एकमेकांवर उगारत धावणारी शाळकरी पोरं, हिवाळ्यात स्वच्छ ऊन पडल्यास 'काफे कोसार'बाहेर पत्ते कुटत बसणारे म्हातारे... तिच्या जाणिवेत या दृष्यांना अस्तित्व उरलं नव्हतं - तसं पाहता त्यामुळं काही बिघडत नव्हतं. सकाळ रोजच उगवत होती, दुपारही होत होती. दुपारभर आन्हिकं, घरगुती कामं, खरेदीबिरेदी उरकून संध्याकाळी ती कॅबरेत पहोचत असे. ही...