लाओ-त्सू न्यायप्रमुख होतो तेव्हा...
लाओ-त्सूच्या (ऊर्फ लाओझी / लाओ-त्से) शहाणीवेची ख्याती हळूहळू चीनभर पसरली, चीनच्या सम्राटाच्याही कानांवर गेली. आपली न्यायव्यवस्था या शहाण्या तत्त्वज्ञाच्या हाती असेल तर...
राजानं आपला मनोदय नम्रपणे लाओ-त्सूला कळवला: 'कृपया तुम्ही आपल्या साम्राज्याचे न्यायप्रमुख व्हाल का?'
लाओ-त्सूनं वारंवार सांगितलं: 'बाबा रे, तू चुकीच्या माणसाला विचारतो आहेस. हे पद भूषवण्यालायक व्यक्ती मी नव्हे.' पण सम्राटानं आपला विनवणीवजा आग्रह लावून धरला.
अखेर लाओ-त्सू म्हणाला, "ठीक आहे. मी तुझ्या विनंतीचा स्वीकार करतो. पुन्हा एकदा अगदी स्पष्ट सांगतो - माझं न्यायदान तुमच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही."
पहिला दिवस. एका अट्टल दरोडेखोराला न्यायसभेत आणलं गेलं. नगरातील महाधनाढ्य व्यक्तीच्या खजिन्यावर या चोरानं लंबा हात मारला होता. लाओ-त्सूनं संपूर्ण प्रकरण ऐकून घेऊन आपला निर्णय सुनावला: चोर व धनाढ्य व्यक्ती दोघांनाही समान काळासाठी तुरुंगवास!
"काय बोलताय काय तुम्ही! माझ्याकडे चोरी झाली, दरोडा पडला तर मलाच शिक्षा? मी का म्हणून कैदेत जावं, तेदेखील चोराइतक्याच काळाकरता? हा कुठला न्याय म्हणायचा!?" श्रीमंत व्यक्तीनं आकांत केला.
"इतकी वर्षं तुम्ही प्रचंड माया जमवलीत. त्याकरता काहींना हताशी धरून त्यांचं शोषण केलंत आणि अन्य कित्येकांना वंचित ठेवलंत, कित्येकांच्या तोंडी घास पडू दिला नाहीत. तुमचा हव्यास मात्र संपत नाही! एवढ्या संपत्तीची मुळी गरजच काय? संपत्ती पाहून मनात लालसा निर्माण होते. त्या लोभापोटी माणसं चोरीमारी करतात. हे चोर घडवण्यास एकप्रकारे तुम्ही जबाबदार आहात. पहिला गुन्हा तुम्ही केलात. ..खरंतर तुम्हाला दरोडेखोराहून जास्त शिक्षा व्हायला हवी," लाओ-त्सू शांतपणे म्हणाला.
"तुरुंगात धाडला जाण्यापूर्वी मी सम्राटमहोदयांची भेट घेणं पसंत करेन. न्यायदानाच्या नावाखाली तुम्ही जे चालवलंय ते घटनाबाह्य आहे, या राज्याच्या कायद्यात तुम्ही म्हणता तसं कुठेही लिहीलेलं नाही." श्रीमंत व्यक्ती कुरकुरला.
"तसं असेल तर तो त्या घटनेचा, त्या कायदेव्यवस्थेचा दोष आहे. त्याकरता मी जबाबदार नाही. तुम्हाला सम्राटाची भेट घ्यायची आहे, तुम्ही ती येनकेणप्रकारे घ्यालच. त्याच्याशी मला कर्तव्य नाही." - लाओ त्सू.
श्रीमंत व्यक्ती लगबगीनं दरबारात येऊन थडकला. "कुठल्या माणसाला आपण न्यायप्रमुख पदावर बसवलं आहे महाराज? अहो, तो आपल्याच मनाचा न्याय करतो. आज त्यानं मला, माझ्यासारख्या सुप्रतिष्ठित नागरिकाला तुरुंगवास सुनावला. उद्या तो कुणालाही, तुम्हालाही कैदेत पाठवायला कमी करणार नाही. कोण हा? याचा मनसुबा काय? मला हा फार धोकादायक माणूस वाटतो. तो जर पदावर राहिला तर आपलं काही खरं नाही, कुणाचंच काही खरं नाही!"
सम्राट काही बोलला नाही पण जे समजायचं ते समजला: 'या न्यायाने मी सर्वांत मोठा गुन्हेगार ठरेन आणि लाओ-त्सू मला तुरुंगात धाडायला कचरणार नाही.'
लाओ-त्सूला लागलीच पदमुक्त करण्यात आलं. "मी पूर्वीच इशारा दिला होता, तुम्ही ऐकलं नाहीत. माझा वेळ घेतलात. मी योग्य माणूस नाही म्हटलो ना मी. त्याचं असं आहे, तुमची समाजव्यवस्था, घटना, कायदा साफ चूक आहे. ही चुकीची व्यवस्था चालवण्याकरता चुकीची माणसंच हवीत."

Comments
Post a Comment