What is immortality? (with Marathi translation)

J. KRISHNAMURTI: I want to immortalise the me. I do it through books, writing a book, and say, famous book. Or I paint. ...Through works, through good acts, through building this or that, I immortalise myself.
ALLAN ANDERSON: This has very pernicious effects within the family, because we must have a son in order to -
K: carry on.
A: - immortalise the name in time.
K: Therefore the family becomes a danger. ...So, look what we have done, sir: the ancient Egyptians immortalised themselves, made their life immortal by thinking, carrying on. And the robbers come, and tear it all to pieces. Tutankhamen is merely a mask now, a golden mask with a mummy, and so on. ...Man has sought immortality through works, through every other way. What is immortality? - Not the book!
A: Oh no.
K: Not the painting which I have done, not, going to the moon and putting some idiotic flag up there. Not, living a righteous life or an unrighteous life. So, what is immortality? ...The cathedrals are beautiful, marvellous, in stone; an earthquake comes - gone. You carve out of marble a marvellous thing of Michelangelo, an earthquake, fire - destroyed. Some lunatic comes along with a hammer and breaks it up. So, it is in none of those. Right?
A: Right.
K: Because that is capable of being destroyed. Every statue becomes a dead thing, every poem, every painting. So, then one asks, what is immortality? Unless I find that out, death is a terror. ...The beauty in the church - not 'I built the church' - the beauty in the cathedral, the beauty in the poem, the beauty in the sculpture! The beauty, not the object of beauty.
A: The beauty itself.
K: - itself. That is immortal. And the mind cannot grasp it. 
Beauty is not in the field of thought, of the 'me'.
 
 


जे. कृष्णमूर्ती: माझा 'स्व', 'अहं' अमर व्हावा असं मला वाटतं. एखाद्या पुस्तकाद्वारे मी ते करू पहातो.
मी पुस्तक लिहीतो, त्याला लोकप्रियता मिळते. किंवा मी चित्रं काढतो. विधायक कार्य, कुठल्याशा प्रकल्पाची उभारणी, या माध्यमांतून मी स्वतःला अमर करू इच्छितो. 
अ‍ॅलन अँडरसन: कुटुंबात तर या वृत्तीचे घातक पडसाद उमटतात. आपण मूल जन्माला घालतो, ते याचसाठी... 
कृ: 'माझा' वंश चालू रहावा म्हणून. 
अँ: माझ्या घराण्याचं नाव काळपटलावर अमर व्हावं म्हणून.  
कृ: अशा परिस्थितीत कुटुंब हे मोठं संकट ठरतं. ...म्हणजे आपण काय करत आलो, पहा. प्राचीन ईजिप्ती लोकांनी अमर होण्याचा यत्न केला. 'अखेरच्या प्रवासा'चा विचार करून, तजवीज करून त्यांनी आपलं जीवन अविनाशी केलं. पुढे आक्रमणं झाली, लुटारू आले. त्यांनी या साऱ्याच्या चिंधड्या उडवल्या. 'तुतनखामेन' हा आज एक मुखवटा आहे फक्त, दुसरं-तिसरं काही नाही. एक जतन केलेलं प्रेत, आणि त्यावरील सोनेरी मुखवटा बस्स! 
जीवितकार्याद्वारे, येनकेणप्रकारे मानवानं अमर होण्याचा यत्न केला. मर्त्यत्वापलिकडे जाण्याची खटपट केली. ...अमरत्व म्हणजे काय? - ग्रंथांतली वचनं नव्हेत!  
अँ: निश्चितच नाही.
कृ: माझी चित्रकारी; चंद्रावर जाणं, तेथील भूमीवर एखादा फडतूस झेंडा गाडणं नव्हे. नीतिनियमांच्या चौकटीत जगणं नव्हे, वा अनीतिने जगणंदेखील नव्हे. मग अमरत्व म्हणजे काय? 
...भव्य कथिड्रल्स बांधली जातात. अद्भुतरम्य स्थापत्य असतं ते - सुबक, पाषाणातील. एक भूकंप होतो, कथिड्रल जमीनदोस्त. संपलं! संगमरवरातून एखादा मायकलअँजेलो अनुपम गोष्टी कोरून काढतो. धरणीकंप झाला, आग लागली - नष्ट! कुणी माथेफिरू हातोडा घेऊन येतो, मूर्ती भग्न करतो. संपलं सारं. या साऱ्यात अमरता नाहीच मुळी. तुमचं काय म्हणणं?  
अँ: अगदी खरंय.
कृ: कारण या सर्वच गोष्टी नष्ट होऊ शकतात. शिल्प, कविता, चित्रांचा प्राण कालांतराने विझून जातो. अमरता म्हणजे असतं तरी काय मग? हे उमगत नाही, तोवर सहाजिकच मला मृत्यूची दहशत वाटते.  
....चर्चमधील सौंदर्य - 'चर्च मी बांधलं' हा विचार नव्हे. कथिड्रलची भव्यता, काव्यातील रस, शिल्पाचं सौष्ठव. दस्तुरखुद्द सौंदर्य. सौंदर्यपूर्ण वस्तू नव्हेत! ...समजतंय मी काय म्हणतो ते?  
अँ: हो. साक्षात् सौंदर्यतत्त्व. 
कृ: साक्षात् सौंदर्य. ते चिरंतन असतं. त्याला मुठीत पकडता येणं केवळ असंभव! मनाच्या ग्रहणक्षमतेपलिकडे असतं ते. 
सौंदर्य ही विचाराच्या, 'अहं'च्या कक्षेबाहेरील गोष्ट आहे.

Comments