Posts

Showing posts from July, 2021

शब्द

शब्द ही एक जिवंत गोष्ट आहे. एक शरीर - लांबी, रुंदी, घनता, गती असणारा एक पदार्थ.  अलगद बोट बुडवून पहा; तळव्यात खुळखुळून पहा; जिभेच्या टोकावर त्याला तोलून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कदाचित. आनाइस निन च्या ते लक्षात आलं जेव्हा तिनं आपली पुस्तकं स्वतः छापली - टाईपच्या खिळ्यांनी ओंजळ भरली, शाईने कोपरं माखून घेतली, शर्टांच्या पाठींना घाम फोडला... शब्दाचा साक्षात्कार झाला तिला!   कुठल्याही जिवंत गोष्टीप्रमाणे शब्दांशीही आपलं दुतर्फी नातं असतं, एकतर्फी नव्हे. शब्द उच्चारताना, समजावून घेताना, त्याची किंमत करताना नेहेमीच इतर शब्द, प्रतिमा, ध्वनि, अनुभव, अपेक्षा, आठवणी वगैरे जोडून पहातो आपण त्याच्याशी, तुलना करतो... कधी स्वतःला जोडतो शब्दाशी थेट, कसल्याही मध्यस्थीशिवाय?   शब्द आपलं वास्तव आहेत, आपण त्यांचं वास्तव आहोत. ते आपल्या छायेत जगतात, आपण त्यांच्या छायेत जगतो - मरतोदेखील. इतर कोणत्याही नात्याप्रमाणे या नात्यात आपलं खरंखुरं प्रतिबिंब उमटतं. अस्तित्वावर बंधनं आपण लादून घेतो, स्वतःभवती सीमा आपण रेखतो, नि म्हणतो शब्द सीमित आहेत, त्यांचा आवाका मर्यादित आहे, त्यांची धाव अपुरी!...

चितमपल्लींचा तक्ता

Image

हॅट्स

Image
  हॅट्स मूळ इंग्रजी कविता: फ्रॅंक स्टुअर्ट फ्लिंट (१८८५ - १९६०) 'अदरवर्ल्ड: केडन्सेस' (१९१८) या कवितासंग्रहातून       ती कडक, करकरीत फेल्ट हॅट तू रुबाबात डोक्यावर ठेवतोस तेव्हा होणारा पोकळ, गोलसर आवाज..   प्रतिध्वनी दुमदुमतोय त्याचा   दोन हजार मैलांवर पसरलेल्या खंदकांत, हज्जारो बंदुकांच्या कंठांतून.   सहस्र सहस्र माणसं ठार झालीत नि कितीक सहस्र जखमाळलीत, पांगुळलीत, बुडून मेलीत - त्या आवाजामुळे.    कोलमडलेली, छिन्नविच्छिन्न शहरं, खेडी बेचिराख, धुळीस मिळालेली, नागवलेली वनस्थानं, ओरबाडून निघालेल्या झाडंवेली, नदीनाल्यांची झालीत गटारं; पोलादाच्या अवशेषांनी बुजबुजलेली   रक्तमांसाने बरबटलेली सडत्या प्रेतांच्या वासाने कुबलेली   सीमांमधली, सीमांपल्याडची ध्वस्त जमीन; भुकेने तडफडणारे देशच्या देश, स्त्रिया व लहानग्यांची कत्तल, प्रतिभेचा चोळामोळा, विद्रूपित, मुरगळलेली मनं.... साऱ्यासाऱ्याचा झालाय उकिरडा, झालीये नासाडी, निव्वळ नासाडी धरित्रीच्या फळाबहराची, वैभवाची  - तुझ्या आवाजाची ताबेदारी करताना. वांझोट्या, अविवेकी, मत्त सैतानी आवाजांच्या ...

Something I heard...

Millions of people live. Millions die.  Thousands search. How many of them find each other?