हॅट्स
हॅट्स
मूळ इंग्रजी कविता: फ्रॅंक स्टुअर्ट फ्लिंट (१८८५ - १९६०)
'अदरवर्ल्ड: केडन्सेस' (१९१८) या कवितासंग्रहातून
ती कडक, करकरीत फेल्ट हॅट तू रुबाबात डोक्यावर ठेवतोस तेव्हा
होणारा पोकळ, गोलसर आवाज..
प्रतिध्वनी दुमदुमतोय त्याचा
होणारा पोकळ, गोलसर आवाज..
प्रतिध्वनी दुमदुमतोय त्याचा
दोन हजार मैलांवर पसरलेल्या खंदकांत, हज्जारो बंदुकांच्या कंठांतून.
सहस्र सहस्र माणसं ठार झालीत
नि कितीक सहस्र जखमाळलीत, पांगुळलीत, बुडून मेलीत - त्या आवाजामुळे.

कोलमडलेली, छिन्नविच्छिन्न शहरं,
खेडी बेचिराख, धुळीस मिळालेली,
नागवलेली वनस्थानं, ओरबाडून निघालेल्या झाडंवेली,
नदीनाल्यांची झालीत गटारं;
पोलादाच्या अवशेषांनी बुजबुजलेली
रक्तमांसाने बरबटलेली
सडत्या प्रेतांच्या वासाने कुबलेली
सीमांमधली, सीमांपल्याडची ध्वस्त जमीन;
भुकेने तडफडणारे देशच्या देश, स्त्रिया व लहानग्यांची कत्तल,
प्रतिभेचा चोळामोळा, विद्रूपित, मुरगळलेली मनं....
साऱ्यासाऱ्याचा झालाय उकिरडा,
झालीये नासाडी, निव्वळ नासाडी धरित्रीच्या फळाबहराची, वैभवाची

- तुझ्या आवाजाची ताबेदारी करताना.
वांझोट्या, अविवेकी,
वांझोट्या, अविवेकी,
मत्त सैतानी आवाजांच्या पट्टीतला तुझ्या हॅटचा तो आवाज.
हे सन्माननीय गृहस्था,
प्रवासाचा हंगामी पास बाळगणाऱ्या,
फरसबंद पदपथावरून चालणाऱ्या,
अग्रगण्य लेखकाचा चाहता असलेल्या,
जीवनविमा धारण केलेल्या;
आग, घरफोडी, नोकरांचे अपघात - विम्याच्या कवचाआड हरतऱ्हेच्या हानीपासून संरक्षित असलेल्या,
चर्चचा मानद पालक (वॉर्डन) आणि त्यांच्याच पंखांखालचं लेकरू (वॉर्ड),
आपल्या राखीव, शिष्ट-संयत उपस्थितीने उपनगराची शोभा वाढवणाऱ्या
उच्चभ्रूतेच्या हे प्रिमरोझ१ फुला,
त्या ऐटबाज, घडीच्या फेल्ट हॅटखाली तू घराकडे जाताना दिसतोस
तेव्हा व्यापारदार तुला सलाम करतात.
वृक्ष मात्र तुझ्याशी आनंदाने अपरिचित असतात.

तू कवीचा उपहास केलास,
कारण तू पक्का व्यवहारी, दुनियादार माणूस आहेस.
तुझं घरच तुझ्या विचारांत तथ्य असल्याची साक्ष देतं, नै का?
त्या सडाफटिंग कवींची असतात का अशी घरं!?
..या घरापुढे आहे बगिचा, गवताचा गालिचा,
हिरवळीच्या मधोमध सुबक ताटवा फुलांचा,
त्याच्या केंद्रभागी गुलाबाची रोपं.
भिंतींजवळ आणखी गुलाब, खाजगी कुंपण काटेरी झुडपांचं,
आणि अर्थातच व्हर्जिनिया स्टॉक्स, डेल्फिनियम्स इत्यादी मौसमी फुलांची रेलचेल!
निव्वळ आगळेपणाच्या हौसेखातर वेडीवाकडी बसवलेली पायवाटेवरची फरसबंदी;
साधंसं तरीही आरामशीर पोर्च,
रस्त्यालगत एक मुख्य दार,

त्यावर पितळेचा चकचकीत नॉकर२, तितकाच चकचकीत लेटरबॉक्स,
कुसुम-पाखराच्या नक्षीने सजलेली काचेची रंगीत तावदानं,
आणि बाजूला इलेक्ट्रिक बेलची कळ.

पण तुझ्याकडे किल्ली आहे.
तुझा प्रवेश होतो थेट
गर्द रक्तवर्णी फारसकाम केलेल्या दिवाणखान्याच्या शांततेत,
जिथे पायपोस 'वेलकम्' म्हणतो,
जिथे स्टॅन्ड तत्परतेने स्वीकारतो
तुझा कोट, तुझी छत्री व ती कडक फेल्ट हॅट.
मग (मित्रमंडळींकडे आहे म्हणून -) बैठक-कक्ष, स्वतंत्र भोजनकक्ष व स्वयंपाकघर.

सर्वत्र स्वच्छता, सुसज्जा, सुव्यवस्था.
स्वयंपाकघर ऐसपैस असल्याने तू पत्नी व मुलासोबत तिथेच चहा-फराळ घेतोस
(एकच मूल - पक्का धोरणी, व्यवहारी आहेस!),
वरच्या मजल्यावर न्हाणीघर. तीन शय्यागृहं.
तुझ्या फर्निचरची मांडणी अविचलित राहिलेलीच बरी
मी तिला शब्दानेही धक्का लावणार नाही:
लंडनमधल्या शेकडो दुकानांचे दर्शनी भाग मिरवतात असला माल.
तुझ्या ग्रंथसंग्रहाबद्दल बोलायचं, तर तो आहे असंबद्ध, निरर्थक, भारंभार
तुझ्या चित्रसंग्रहाइतकाच.
पण तुझं सकळसौख्य सामावलं आहे याच ठिकाणी, आणि सुखात आहेस तू.
शनिवार-दुपारी, ग्रीष्मातील सांजवेळी
परसबागेत तुझी फेरी ठरलेली,
तिन्ही बाजूच्या समांतर बागांपासून तिला कुंपणाने राखलेली,
बागकामाच्या अवजारांशी उगा खुडबुडतोस नि खुषालून जातोस तू.

हरतऱ्हेच्या संभाव्य आपत्तीविरुद्ध सुरक्षा लाभलेल्या हे गृहस्था;
साठोत्तर निवृत्तीवेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या,
उबदार गृहजीवनात रमलेल्या हे आरामकंदा,
हे गुटगुटीत, जातिवंत फुला,
तू टर उडवलीस कवीची, त्या अव्यवहारी, स्वप्नाळू इसमाची;
जमाखर्च, ताळेबंद, लेखाविधि इतकाच तुझ्या आयुष्याचा परीघ;
तुझा संतोषजनक गणिती वकूब, तुझं चक्रवाढ व्याज,
तुझ्या व्यवसायवृद्धीची घोडदौड आभाळमातीपलीकडे,
ढुंकून पाहिलं नाहीस तू हलाखीत पिचणाऱ्या बांधवांकडे,
फारतर उदारमतवादी वृत्तपत्रात डुबकून सद्सद्विवेकाची पापं धुतलीस
...मुंगी, ती पहा मुंगी! कढई तापली, नाही तिला ठाऊक, आत रटरटतंय पाणी!

मात्र
जेव्हा तुझी घटका भरत आली
तुझ्या उदासीनतेबद्दल, तुझ्या कणाहीन जाणीवशून्यतेबद्दल शिक्षा भोगण्याची वेळ झाली
वातावरणाचा दाब व मापकाच्या सदुसष्टाव्या, सर्वोच्च सेंटिमीटरपर्यंत चढलेला पारा
यांनी साधली जेव्हा अचूक समपातळी;
जेव्हा पाण्याने गाठला सेंटिग्रेडचा बरोब्बर शंभरावा बिंदू,
तेव्हा
तू विचार केलास (खरं म्हणजे तू धास्तावलास):
'ही वेळ आहे
"सामुदायिक प्रतिष्ठा" वगैरे जागवण्याची,
थोडा देशाभिमान-बिमान दाखवण्याची' -
तुझ्यासारख्या इतरांनाही त्या पूज्य भावनेचा साक्षात्कार झाला,
मग प्रतिष्ठेला पावित्र्याचा अभिषेक करण्यासाठी बळी घेतलेत तुम्ही

अन् उकळत्या पाण्याचा वर्षाव झाला आमच्यावर.
..मुंग्या! मुंग्या! सैरावरा मुंग्या!
..मुंग्या! मुंग्या! सैरावरा मुंग्या!
मित्रा, तू मारला गेला नाहीस,
दैवदयेने तुझ्या डोक्यावर निदान बोलर हॅट -
अवकळेने ग्रासलेलं युद्धवीराचं शिरस्त्राण,
प्रतीक बेडौलपणाचं, सौंदर्यद्वेषाचं,
विशिष्ट ओळख तुमच्या समधर्मितेची, निष्पाप सभ्यतेची -
ती बोलर हॅट, निदान बोलर हॅट शाबूत आहे तुझ्या डोक्यावर.

काढ ती हॅट आतातरी; विरळ केस वाढू देत जरा.
उघड डोळे, पहा तुझ्या बांधवांकडे, खुपू देत तुलाही त्यांच्या व्यथा.
जरा घातक हो, कराल हो;
विषारी उच्छवासांतून आपणा सर्वांना डसणाऱ्या
त्या तत्तवजर्जर, सिद्धांतजड श्वापदाला३
तुझ्या समजबुद्धीच्या दीप्ततेजाने भयगळित होऊ दे,
आपल्या भक्ष्यवत शरीरांपासून झर्रकन मागे हटू दे,
लोळण घेऊ दे तुझ्यापुढे,
आणि थरकापत, तडफडत, तहानभुकेने विव्हळत प्राण ओकू दे.

तळटीपा:
१. युरोपमधे वसंतात सर्वप्रथम बहरणारा पुष्पप्रकार.
२. दरवाजा ठोठावण्यासाठी त्यावर बसवलेले धातूचे जाड कडे.
३. 'metaphysical beast' - जीवनाकडे, वास्तवाकडे, अधिभौतिकीकडे बुरसट, कुतार्किक, अलवचिक आणि बथ्थड सैद्धांतिक नजरेतून पाहणारं मानवी मनाचं एक अंग, हा मला लागलेला त्याचा अर्थ.

Chan
ReplyDelete