प्रेमाची झुळूक
प्रेमाचं नातं अतिशय तरल, नाजुक असतं - क्षणोक्षणी बदलणारं, अनिश्चित, अतर्क्य. उद्या काय घडेल, पुढल्या क्षणी काय घडेल कोणी सांगावं! मनात भय दाटतं. मग अनिश्चिततेच्या भीतीपोटी, अज्ञाताच्या भीतीपोटी प्रेमीजन आपल्या नात्याचा घात करतात. विवाहबंधनात अडकतात. माणसं लग्न करतात. त्याद्वारे बदलांना लगाम घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रेमाचे बंध दृढ करायचे असतात. ‘प्रेम’...मोठी अजब चीज आहे. ज्याक्षणी तुम्ही त्याला दृढ करता, स्थैर्य देता तत्क्षणी ते असत नाही, उरत नाही; लुप्त होऊन जातं. प्रेम म्हणजे वासंतिक झुळूक! ती येते; आपल्या मदानं, गंधानं सारा आसमंत दरवळून टाकते, नि आली तशी निघून जाते. येते तेव्हा वाटतं, ही चिरकाल अशीच वहात राहील. ही भावना इतकी प्रबळ असते, की तुम्हाला तीबद्दल कणाचाही संदेह वाटत नाही. तीव्र निःशंकतेच्या भरात हरतऱ्हेच्या आणाभाका घेऊन मोकळे! हा केवळ वसंतवारा आहे, याचं भान नसतं तुम्हाला, तुमच्या प्रेमिकाला. वाऱ्याची झुळूक यायची तेव्हा येणार, जायची तेव्हा जाणार. तिचं येणं-जाणं आपल्या हातात नसतं. तिला धरून ठेवता येत नाही. उघड्या तळव्याला तिचा मंद गारवा जाणवतो, सुखावतो; पण मूठ झ...