बोधिधर्म आणि सम्राट वू
इसविसनाच्या सहाव्या शतकात बोधिधर्म नावाचा भिक्षु तीन वर्षं खडतर प्रवास करून चीन देशी पहोचला. त्याच्या आगमनाच्या शंभर-दोनशे वर्षांआधीपासून चीनमध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित होत गेला होता. मात्र बुद्धाची शिकवण आचरणात आणण्याच्या नावाखाली चाललेले प्रकार पाहून बोधिधर्माला आत्यंतिक खेद वाटला. त्यानं ज्या तत्त्वांचा चीन देशात उच्चार केला त्यातून बौद्ध धर्माला नवी शाखा फुटली - चिनी भाषेतील 'चान', जपानीतील 'झेन', कोरिअनमधील 'सॉन' व व्हिएतनामी भाषेतील 'त्छ्यान' ही सारी 'ध्यान' या संस्कृत शब्दाची रूपं. बोधिधर्माच्या आगमनाची वार्ता कळताच 'सम्राट वू'नं त्याला आपल्या भेटीस बोलावून घेण्याची खटपट चालवली. दक्षिण चीनमधे ल्यांग घराण्याची सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सम्राट वू ची त्याकाळी बौद्ध धर्माचा अनुयायी व आश्रयदाता म्हणून मोठी ख्याती होती. धर्माच्या शिकवणीनं प्रभावित झालेल्या वू नं राज्याच्या कायद्यांत अनेक बदल केले. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली गेली. सणासुदीला प्राण्यांचा बळी घालण्यावर बंदी घातली गेली. जागोजागी बौद्ध मंदिरं उभारण्यात आली. बौद्ध मठां