शुनऱ्यू सुझुकी रोशींच्या बोलण्यातून...
व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा विभागणीपलिकडे गेल्यावर सर्वच गोष्टींच्या एकत्वाचा (oneness) आपल्याला बोध होतो - व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठता यांचं एकत्व. बाह्य व आंतरिक विश्वाचं एकत्व.
उदाहरणार्थ, ध्वनि म्हणजे काय?
ध्वनि व कोलाहल यांमधे फरक करतो आपण. ध्वनि किंवा स्वर अधिक खरा वाटतो, जवळचा वाटतो. साधनेतून, म्हणजेच आत्म-भानातून येतो तो ध्वनि, स्वर. कोलाहल, गोंगाट हा वस्तुनिष्ठ वाटतो, बाहेरून येतोय असं वाटतं. त्याचा त्रास होतो, त्यामुळे आपण विचलित होतो.
परंतु ध्वनि, शब्द, आवाज हा वस्तुनिष्ठ असतो व आत्मनिष्ठदेखील असतो. बौद्ध आकलनानुसार गोंगाट, कोलाहल वा कर्कशता हासुद्धा आपण निर्माण केलेला ध्वनि असतो.
"तिथे झाडावर पक्षी गातोय" असं भले आपण म्हणू, मात्र त्याचा स्वर कानी पडल्याक्षणी, त्याच्या अस्तित्वाची जाणीव होताक्षणी आपणच पक्षी होऊन गेलेलो असतो. पक्षी 'इथे', मनात अवतरलेला असतो; मन पक्षी होऊन गात असतं, चिवचिवत असतं.

वाचत बसलेले असताना 'ब्लू जे' पक्ष्याचा आवाज ऐकू येतो. आपण म्हणतो, "हा 'ब्लू जे'चा आवाज...आज जरा विचित्र ओरडतोय नै..." विचार चालू होताच आवाजाचं रुपांतर गोंगाटात होतं. विचलित झालो नाही तर 'ब्लू जे' थेट आपल्या हृदयात येऊन बसेल. आपण 'ब्लू जे' होऊन जाऊ, नि 'ब्लू जे' वाचन करू लागेल!
'घराच्या छपरावर 'ब्लू जे' गातोय' हे झालं अस्तित्वाचं प्रारंभिक, रूढ आकलन. साधनेच्या (practice), आत्म-भानाच्या (self-awareness) कमतरतेमुळे आपण अशारितीने जगाकडे पहातो.
'ज़ाज़ेन' करत जाऊ तसतसे आपण सगळ्या गोष्टी - काही का असेना - आत्मीयतेने स्वीकारू लागतो.

बुद्धत्वप्राप्ती (enlightenment) झाली नाही तरी आपण प्रबुद्ध (enlightened) असतो.
...एखादी गोष्ट अस्तित्वात आहे याचा अर्थ तिच्या असण्यामागे काहीतरी प्रयोजन असतं. तिच्या असण्याला या न त्या अर्थाने काहीतरी अर्थ असतो - कुठलं कारण? कसला अर्थ? मला माहित नाही! कुणालाच माहित नसलं, तरी काहीतरी कारण असणार एवढं नक्की. प्रत्येक अन् प्रत्येक वस्तुचा, प्रत्येक अस्तित्वाचा काहीएक अंगभूत गुण असतो, सामर्थ्य असतं.
फार विलक्षण आहे... कोणत्याही दोन वस्तु एकसारख्या नसतात, प्रत्येक रूप-रचना अद्वितीय असते. तुलनेला मुळी आधारच नाही. प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र मूल्य. ...तौलनिक मूल्य नसतं हे, विनिमयमूल्यदेखील नसतं - त्याहून व्यापक, विशाल काहीतरी. प्रत्येक गोष्ट उर्वरित जगाशी संबंधित असल्यानं परिपूर्ण, परममूल्य असतं हे.
Comments
Post a Comment