Beauty - Passion - Sorrow (with Marathi translation)

...So there is all this sorrow in the world. And there is also the personal sorrow. And without really understanding it very very deeply, without resolving it, passion won't come out of sorrow. And without passion, how can you see beauty? You can intellectually appreciate a painting, a poem or a statue but you need this great sense of inward bursting of passion, exploding of passion. That in itself creates the sensitivity which can see beauty. It is, I think, rather important to understand sorrow. I think they are related - beauty, passion, sorrow.

But man has never stayed with a thing. There are one and a thousand escapes - whiskey, drugs, soulless sex, going off to attend the Mass, and so on, so on. Man has always sought comfort in a belief, in an action, in identification with something greater than himself, and so on, so on. He has never said, 'Look, I must see what this is. I must penetrate it, and not delegate it to someone else. I must go into it, I must face it, I must look at it, I must know what it is'.
When the mind doesn't escape from sorrow - either personal or the universal sorrow of man - if you don't escape it, if you don't rationalise it, if you don't try to go beyond it, if you are not frightened of it, then you remain with it.

Any movement from 'what is', away from 'what is', is a dissipation of energy. It prevents you from actually understanding 'what is'. 
...It is truth that liberates, not your effort to be free.
 
- J. Krishnamurti




सौंदर्य - उत्कटता - दुःख
 
...तर जगात दुःख भरून आहे. व्यक्तिगत जीवनातदेखील दुःख आहे. या दुःखाचा तळ गाठल्याखेरीज, अत्यंत खोलवर शिरून ते समजावून घेतल्याखेरीज, त्याची उकल केल्याखेरीज त्यातून उत्कट आवेग झरणार नाही, नि उत्कटतेविना सौंदर्य येणार कुठून?
एखाद्या चित्राचा, कवितेचा, शिल्पाचा तुम्ही बौद्धिकदृष्ट्या आस्वाद घ्याल भले, पण तुमच्या अंतरंगात आवेग उसळला पाहिजे, बांध फुटला पाहिजे, उत्कटतेचा उद्रेक झाला पाहिजे. त्यातूनच संवेदनक्षमता येते, नि संवेदनक्षमता असेल तरच सच्ची सौंदर्यानुभूती येते.
तेव्हा मला वाटतं दुःखाचं, क्लेशाचं आकलन होणं भारी महत्त्वाचं आहे. सौंदर्य, उत्कटता, दुःख - तिन्ही माझ्यामते परस्परसंबंधित आहेत. ..पण माणूस कुठल्याच गोष्टीसह जगत नाही कधी. शेकडो पळवाटा शोधून काढल्यात आपण - दारू, अंमली पदार्थ, बेदरकार लैंगिक क्रिया, धार्मिक विधी इत्यादी. ...माणूस एखाद्या धारणेचा वा कृतीचा आसरा घेईल; स्वतःपेक्षा उदात्त भासणाऱ्या गोष्टींशी एकरूप होऊ पाहील, हजार खटपटी-लटपटी करेल... मात्र 'ही काय भानगड आहे ते बघितलं पाहिजे,' असं म्हणत नाही तो. 
अन्य कोणाच्याही गळ्यात न मारता मी स्वतः त्यात घुसलं पाहिजे; त्याला भिडलं पाहिजे; दुःखाच्या नजरेला नजर दिली पाहिजे. दुःख म्हणजे नेमकं काय, हे जाणलं पाहिजे.

मन जेव्हा दुःखापासून, वेदनेपासून पळ काढत नाही - व्यक्तिगत असो वा जगभरातील मानवाचं दुःख असो - जर आपण पळ काढला नाही, समर्थन केलं नाही; दुःखमुक्त होण्यासाठी, त्यापलिकडे जाण्यासाठी धडपडलो नाही; दुःखाला घाबरलो नाही, तर आपण त्याची सोबत करतो, त्यासह जगतो. ...'जे आहे' त्याभवती केली जाणारी तडफड, 'जे आहे' त्यापासून दूर जाण्यासाठी चालणारी समस्त वळवळ हा ऊर्जेचा अपव्यय असतो. ही वळवळ, ही तडफड आपल्याला 'जे आहे' त्याचं यथार्थ आकलन होऊ देत नाही.
 
...सत्य जाणल्याने मुक्त होतो आपण - मुक्त होण्याच्या आपल्या अट्टहासातून नव्हे.
 
-  जे. कृष्णमूर्ती

Comments