Do I ever see? Do I ever listen? (with Marathi translation)

What does it mean to see, to listen, and to learn? 
I think the three are related: listening, learning and seeing.

Do we actually see, or do we see through a screen, darkly? - A screen of our prejudices, of our idiosyncrasies, experiences, our wishes, pleasures, fears, and obviously the images we maintain about the world and about ourselves. ...Screen after screen between us and the object of perception. So it may be that seeing never takes place at all.
Now is it possible for the mind not to have these images, conclusions, beliefs, prejudices, fears and just to look? I think this becomes very important because when you see - when you really see - you can't help but act.

Do I ever listen? - as a wife, a husband, or a girl or a boy, do I actually hear the other person?
Is it that I hear her/him through the image I have built about her or him? Again, through the screen of irritations, annoyance, domination... you know, the dreadful things that come up in a relationship. Do I ever hear directly what you say without twisting it, changing it?

...Attention means no border. The moment I have a border I begin to fight you - agreement, disagreement, comparison etc.
The moment attention has a frontier, then concepts, beliefs, assumptions arise.
But if I listen to you completely, without a single interference of thought, or ideation, or mentation - if I just listen -  a miracle has taken place, which is: total attention absolves my mind from all statements, and therefore the mind is extraordinarily free to act.
When I give my total attention, it doesn't matter what you say or don't say; whether it is true or false. What matters is is my act of listening, looking!
 
 

 
कृष्णमूर्ती: मला सांगा, बघणं म्हणजे काय? ऐकणं म्हणजे काय? शिकणं म्हणजे काय? 
...तिन्ही परस्परसंबंधित आहेत असं मला वाटतं: शिकणं, ऐकणं व पाहणं. 
 
आपण प्रत्यक्षात बघतो, की झिरझिरीत पडद्याआडून, अंधुक-अंधुक बघतो? - आपल्या पूर्वग्रहांचा, स्वभावाचा पडदा; अनुभवांचा, इच्छांचा, सुखांचा, भीतींचा पडदा...शिवाय जगाबाबत व स्वतःबाबत आपण बाळगलेल्या प्रतिमा....पाहिली, संवेदली जाणारी वस्तु व आपण यांदरम्यान पडद्यावर पडदे साचत रहातात. बघणं मुळी घडतच नाही कदाचित!! ...प्रतिमा, निष्कर्ष, समजुतींची अस्तरं; आठवणी, पूर्वग्रह, भीतीचे पडदे बाजूला सारून लख्ख बघणं शक्य होईल का?
माझ्यामते हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपण जेव्हा खरोखर पहातो - एखादी गोष्ट जेव्हा साक्षात् पाहिली जाते, तेव्हा कृती घडतेच. कृतीविना गत्यंतर नसतं. 
 
...खऱ्या अर्थाने काही ऐकतो का हो मी कधी? वैवाहिक जीवनात पतीचं, पत्नीचं म्हणणं; मित्राचं वा मैत्रिणीचं बोलणं खरंच शिरतं कधी माझ्या कानांत? की त्याच्या अथवा तिच्याबद्दल निर्माण केलेल्या प्रतिमेचं बोलणं ऐकू येत असतं मला?
चिडचिड, वैतागाचा पडदा, वर्चस्व-भावना...नातेसंबंधांत उद्भवणाऱ्या भयंकर गोष्टी - ठावूक आहे तुम्हाला सारं. तुमचं बोलण्याचा; समोरील व्यक्तीच्या बोलण्याचा विपर्यास न करता; ते कोणत्याही प्रकारे रूपांतरित न करता, न मोडता, न वाकवता थेट ऐकतो का मी कधी?
 
..अवधान म्हणजे सीमा-रहितता. अवधानाला सीमा घालून घेताक्षणी मी तुमच्याशी भांडू लागतो; सहमती-असहमती दर्शवू लागतो. अवधानावर मर्यादा पडताक्षणी कल्पना, संकल्पना, धारणा, मनोग्रह निर्माण होऊ लागतात. पण मी जर तुमचं बोलणं आरपार ऐकून घेतलं; विचार, कल्पनानिर्मिती, मनोव्यापार यांची लुडबुड मुळीच होऊ न देता नुसतं ऐकून घेतलं, तर किमया घडते - समग्र अवधान मला, मनाला 
साऱ्या विधानांतून मुक्त करतं. या क्षणी माझं मन कृती करण्यास विलक्षणरित्या मोकळं असतं.
सकळ अवधान देऊन मी समोरच्याचं बोलणं ऐकतो, तेव्हा ती व्यक्ती काय म्हणाली, काय म्हणाली नाही; ती सत्य बोलतेय, की असत्य बोलतेय याने फरकच पडत नाही! मी जीव ओतून ऐकतोय ना, बघतोय ना? मग झालं तर. ते महत्त्वाचं.

Comments