बाह्य प्रोत्साहनाची आस (in Marathi and English)
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. *
(दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून)
R.M.
म्हणाला: "मला जग समजून घ्यावंसं वाटतं, त्याचबरोबर जगानंही मला समजून
घ्यावं असं वाटतं. मी कलावंत आहे, चित्रकार आहे. मी सर्जन करतो. माझं
सर्जन, माझ्या निर्मितीला दाद मिळावी असं मला वाटतं." वृत्तपत्रादी
माध्यमांनी, लोकांनी आपल्यावर सतत टीका करू नये, प्रोत्साहनपर चार शब्दही
उद्गारावे. कलावंत निव्वळ स्वतःसाठी जगत नाही, तो इतरांसाठीही जगतो...असं
बरंच काही सांगत गेला R.M.
'जगाला समजून घ्यावंसं मला वाटतं, पण त्याचबरोबर जगानंही मला समजून घ्यायला हवं' हाच त्याच्या बोलण्याचा गोषवारा होता.
आम्ही
आणखी काही वेळ बोलत राहिलो. तो मला आपल्या जीवनाविषयी, अडी-अडचणींविषयी,
संदिग्धतांविषयी सांगत होता. जगाला समजून घेण्याची सहजप्रेरणा व जगानं
आपल्याला समजून घ्यावं ही इच्छा, या दोहोंवर R.M.चा समान भर होता -
ही घोडचूक असते, याकडे मी लागलीच त्याचं लक्ष वेधलं. कारण आपण जगाला समजून
घेणं सर्जनात्म असतं, मात्र जगानं आपल्याला समजून घेणं निव्वळ तुष्टीकारक
असतं.
निर्मितीचे
क्षण हे कधीकधी बोधाचे क्षण ठरतात - नितांत महत्त्वाचा असतो हा बोध. मात्र
असे क्षण दुरापास्त असले, त्यांची भीषण टंचाई असली म्हणजे विचारांचा
मोर्चा परिस्थितिक उत्तेजनाकडे वळतो.
इतरांकडून, बाह्य जगाकडून मिळणाऱ्या उत्तेजनाची, समाधानाची जेवढी आस धरावी तेवढे स्फूर्तीचे, उन्मेषाचे धुंद क्षण विरळे होत जातात.
जनसंपर्क,
मनोरंजनाची साधनं, नशा वा तत्सम गोष्टींत बुडून जाऊन स्वतःला विसरण्याची
आपण जितकी धडपड करू, जितके व्यग्र होऊ तितका निर्मितीचा, बोधाचा तो भेदक
क्षण बोथट होत जातो. हवापालट, देशाटनाद्वारे चित्तरंजन करून त्या क्षणात
प्राण फुंकण्याचा अट्टहास करू नये. असल्या उपायांनी आपल्यात तात्पुरतं, उथळ
चैतन्य संचारतं इतकंच.
जेव्हा
हरतऱ्हेचे आंतरिक व बाह्य विक्षेप आकळून घेऊ, त्यांपलिकडे जाऊ तेव्हाच
आपल्याला अक्षत, अन्यून वास्तवाचा साक्षात्कार होतो; सर्जनोल्लासात आपण चूर
होतो.
असृष्ट (uncreated) हेच नित्यनूतन, चिरंजीवि असतं.
(From J. Krishnamurti's journal entries during the Wold War II years)
‘I want to understand, but also I want to be understood’ was the import of his whole conversation.
We talked for a while; he was telling me of his life, troubles, and uncertainties; and presently I pointed out that to lay equal emphasis, as he was doing, on understanding and wanting to be understood was a grave mistake, for the one was creative and the other merely satisfying.
The one, the most important, comes in moments of creation, and when those moments are few and far between, then thought turns to environmental encouragement. The more it seeks encouragement and satisfaction from the outside, the rarer becomes the ecstatic moments of creation.
The more we are distracted by people, by amusement, by drink, by the many means of inducing self-forgetfulness, the weaker grows the concentrated creative moment in which there is understanding. This moment is not to be revived through the distraction of change of country, scene, or environment, which may very temporarily and superficially exhilarate. Only when all distractions, inner and outer, are comprehended and so transcended is there the undiminishing reality, the ecstasy of creation.
...The uncreated is ever new, ever living.

Comments
Post a Comment