Posts

Showing posts from April, 2020

The difference

The 'world' is out of question, out of danger. It has known a great deal. Above all to spin, to adorn itself with passage of things adorning, with itself, each passing thing. It feeds on much we love and loath, much, in other words, we don't know : 'good' and 'foul' and 'fast' and 'more' are holes in our begging-bowl. We were in danger, we shall be guided by self-surity An eyed man doubts not his sight Anyone breathing brags himself alive Shielded in ambition, he is ready to miss The ethereal arrow. Would you, say, with goods galore, kin more than many, reckon yourself buried already? Would I; quarrying outcome, fondling praise or pearls of concord, suspect myself lost? 'Our' world is in danger - heartless doings, countless, one atop another in collective effort to fill bottomless pits to tuck the abysses neat and fringe bare existence with meaning ankles to feet! In the world voids brim with ghostly stars, heavenly waters; are ramme...

कोरोना-साथीमुळे वटवाघुळांवर चिडण्याआधी हे वाचा!

Image
कोरोना-साथीचं खापर वटवाघूळांवर फोडणं ही चूक पीटर अॅलागोना  |  'दि कॉन्व्हर्सेशन ',  मार्च २४, २०२० नाइमे ह् नाईमी (Naeemeh Naeemei) या इराणी चित्रकर्तीच्या ' ड्रीम्स बिफोर एक्स्टिंक्शन '   चित्रमालेतील वटवाघुळं कोविड-१९ कोरोना विषाणू उत्पत्ती  संभाव्यतः वटवाघुळांमधे झाल्याचं निदर्शनास आणणाऱ्या जिनोमिक (जिनोमिक्स = गुणसूत्र-संचाचं विज्ञान) संशोधनाला  माध्यमांतून प्रसिद्धी मिळाली आहे. एक मोठीच चिंता डोकं वर काढतेय - घाबरलेली जनता व गैरमाहिती मिळालेले अजाण अधिकारी रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या भरात या अद्भुत जीवांचा संहार करतील असा धोका निर्माण झाला आहे. ...जरा लक्षात घ्या - पूर्वीदेखील असले उपाय निष्फळ ठरले आहेत. वटवाघूळ हा प्राणी आपली कशी मोलाची मदत करतो, या प्राण्याला संरक्षण मिळणं किती अत्यावश्यक आहे, ते धोक्यात आलेल्या प्रजाती व जीवशास्त्रीय वैविध्यावर लक्ष केंद्रित करणारा पर्यावरणीय इतिहासकार या नात्यानं मी जाणतो. कोरोना विषाणूच्या फैलावाचं खापर वटवाघळांवर फोडण्याऐवजी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं....

कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे

कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे निक पॅटन वॉल्श, वास्को कोटोविओ   |  सी.एन.एन. , मार्च २०, २०२०  वटवाघूळ - अलिप्त, निशाचर, दाटी करून राहणारा प्राणी. वटवाघळाला कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत मानलं गेलं आहे. तथापि आपल्या दैनंदिन आयुष्यात उलथापालथ घडवणाऱ्या या रोगाचा प्रसार होण्यास वटवाघूळ जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत यावर काही वैज्ञानिकांचं एकमत आहे. प्राणिशास्त्रज्ञ व रोग-विशेषज्ञांनी सी.एन.एन.ला दिलेल्या माहितीनुसार मानवी वर्तणुकीतील बदल - मानव करीत असलेला नैसर्गिक अधिवासांचा विनाश; तसंच त्याचं प्रचंड संख्येने, जलदगतीने पृथ्वीवर संचार करणं - यामुळे आतापावेतो निसर्गात कुलूपबंद असणारे विकार मानवामधे वेगाने प्रवेश करत आहेत. कोरोना विषाणूची उत्पत्ती मुळात कशी झाली याचं खात्रीशीर उत्तर वैज्ञानिकांना अद्याप गवसलेलं नाही. संशयित प्रजातीतील जिवंत विषाणूचं पृथक्करण करता आल्यास त्याचा मूलस्रोत सिद्ध करता येईल - हे फार जिकिरीचं काम आहे. परंतु कोविड-१९ रोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूशी कमालीचं साधर्म्य असलेले विषाणू चिनी नालाकृति वटवाघुळांमध्ये (horsesho...
आपला गोंगाट थांबलाय. आता विविध पक्षी, प्राणी, कीटक घराच्या आसपास आढळू लागलेत. एकेकाळी आपण त्यांच्यासोबत राहत होतो, पुन्हा राहू शकतो, आपण पुन्हा मित्र होऊ शकतो. ज्याला स्वतःला बदलायचं आहे त्याच्याकरता प्रत्येक क्षण ही एक संधी असते. आपण या मित्रांकडे पहावं, त्यांचं निरीक्षण करावं, त्यांची माहिती घ्यावी. ते आपल्यासाठी काय करतात, आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे समजून घ्यावं. जे आनावश्यक आहे ते (आपल्याला अत्यावश्यक वाटत असलं तरी) आपल्याकडून काढून घेतलं जातंय, आपण जितका प्रतिकार करू तितक्या त्वेषाने हिसकावून घेतलं जातंय कारण आपल्याला समजून घेण्याची इच्छा नाही. जे आवश्यक आहे ते आपल्यापाशी असू दिलं जातंय. समतोल साधण्याचा प्रयत्न होतोय. भवतालाकडे, हिरवाईच्या असंख्य छटांकडे, झुलणाऱ्या कळ्यांकडे, चिमुकल्या घरट्यांकडे, आकाश थोडंफार साफ झाल्यामुळे दिसू लागलेल्या ताऱ्यांकडे आपलं लक्ष जातंय? हे शिक्षण आहे, हे जीवनवैभव आहे, ते आपल्याकरतादेखील आहे!  आपण तितक्याच हावरेपणाने फुलं तोडतोय, वाटेत येणाऱ्या फांद्या छाटतोय; सतत कानांत ओतण्यात येणाऱ्या बाळबोध सूचनांवर, माहितीवर समाधान म...

आर्थिक मंदी आणि निसर्ग

आर्थिक मंदी आणि निसर्ग दिलीप कुलकर्णी   स्रोतः 'गतिमान संतुलन ' (पर्यावरणाशी कृतिशील नातं सांगणारं मासिक), डिसेंबर २०१९ "विकास" या शब्दाची सध्याची व्याख्या 'निरंतर होत राहणारी आर्थिक वाढ' अशी आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा ह्या आर्थिक वाढीची गती मंदावते तेव्हा सरकारं एकदम चिंताग्रस्त होतात. २००८ सालच्या अमेरिकेतील मंदीनं जगातल्या बऱ्याच भागात आर्थिक मंदीची लाट पसरली, जीतून ते देश दशकभरानंतरही बाहेर आलेले नाहीत. भारताला मात्र गेल्या वर्षीपर्यंत ह्या मंदीची झळ फारशी बसलेली नव्हती. किंबहुना भारताला एक 'द्रष्टा, कणखर, झुंजार पंतप्रधान' लाभला असताना मंदी येणं शक्यच नाही; उलट साऱ्या जगाला वाकुल्या दाखवत भरताची अर्थव्यवस्था भरधाव सुटणार याविषयी आपल्याला किंचितही शंका नव्हती. तथापि, गेल्या वेळेपेक्षा नेत्रदीपक पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका जिंकूनही पंतप्रधानांना मंदी थोपवता येत नाही हे वास्तव आहे. मात्र ते मान्य करण्याची ना त्यांची तयारी आहे, ना अर्थमंत्र्यांची. बांधकाम, वाहनं यांसारख्या उद्योगांतील मंदीमुळे त्यांवर अवलंबून असलेल्या इतर उद्योगांतही म...

त्र्यूफोची नजर पाहताना... ०२

Image
 *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*  त्रूफोची नजर पाहताना... ०१    त्रूफोची नजर पाहताना... ०३  पालक व पाल्यांच्या दिसण्यातली साधर्म्यं-वैधर्म्यं मोठी करमणूक असते. आइस्क्रीमचे एकावर एक स्कूप केलेले फ्लेवर्स वेगळे दिसावेत तशी काही मुलांमध्ये आईबाबांची भिन्न रूपवैशिष्ट्यं दाखवता येतात. फिल्टर कॉफीतली कॉफी दुधात मिसळावी तसा काही मुलांमध्ये या वैशिष्ट्यांचा मेलाँज झालेला आढळतो. तर फुलावरून फळ ओळखता येऊ नये तशी कित्येक मुलं विशिष्ट जोडप्याची अपत्यं आहेत हे तोंडावळ्यावरून, शरीरयष्टीवरून ओळखता येत नाही. आंत्वान दुआनेल  (Antoine Doinel)  फ्राँस्वा त्र्यूफोचा बाप आहे की त्र्यूफो आंत्वानचा? ते बाप-लेक आहेत की भाऊ-भाऊ? की केवळ दोस्त? "...तो माझ्यासारखा आहे पण तो मी नव्हे, तो ज्याँ पिएर लेओ  (-आंत्वानचं पात्र साकारणारा अभिनेता) सारखा आहे पण तो तो नव्हे." - त्र्यूफो क्लासिक फिल्म्स पाहणाऱ्यांना 'कॅत्रं साँ कू ' (फोर हंड्रेड ब्लोज) ही 'लाद्री दि बिचिक्लेत्ते ' (बायसिकल थीव्ह्ज) च्या कुळीतली फिल्म ...