दहा निघाले की एखादा पहोचतो!
काही शतकांपूर्वीची गोष्ट.
तिबेटमधील एका मोठ्या बौद्ध आश्रमानं सीमावर्ती भागातील एका छोट्या आश्रमाच्या उभारणीस हातभार लावला. बांधकाम पूर्ण झालं. आता तेथील प्रमुखपद सांभाळण्याकरता योग्य भिक्षु पाठवणं तेवढं बाकी होतं. मोठ्या आश्रमाच्या प्रमुखानं दहा भिक्षुंची निवड केली, त्यांना नव्या आश्रमाच्या दिशेनं पाठवलं.
सर्वांना प्रश्न पडला: 'गुरुपद ग्रहण करण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असताना दहाजणांना का बरं धाडण्यात आलं? तिकडूनही प्रश्न आला: 'एकाचीच गरज असताना दहाजण कशाला? त्यांतील योग्य कोण ते आम्ही कसं ओळखावं?'
"जरा धीर धरा. पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल," इकडचे गुरु म्हणाले.
दोन्ही आश्रमांमध्ये पुष्कळ अंतर होतं. मार्ग खडतर, पहाडी होता - पायी प्रवास. साधारण तीन आठवड्यानंतर तिकडून निरोप आला: 'तुम्ही जे दहा भिक्षु पाठवले होते त्यातील एकच सुखरूप पहोचला आहे.'
तेव्हा गुरु म्हणाले, "पाहिलंत? दहा पाठवले की एखादा पहोचतो !"
मागाहून सर्वांना पूर्ण कथा समजली:
दहा भिक्षुंच्या गटाला प्रवासात पहिलं गाव लागलं तेव्हा गावच्या वेशीपाशीच एका गावकऱ्यानं सर्वांत पुढे चालणाऱ्या भिक्षुचे पाय धरले. "माझ्या पोरीच लग्न जुळत नाही. ज्योतिषानं सांगितलं आज सकाळी जो पहिला मनुष्य गावच्या वेशीतून आत येईल त्याच्याशी तिचा विवाह करून द्या. पहिल्यानं नकार दिला तर दुसऱ्याला विचारा, नाहीतर तिसऱ्याला विचारा. त्यांचा संसार सुखाचा होईल. ..पैसाअडका आहे, मुलगी रुपानं उजवी आहे, एकुलती एक आहे, कृपा करून तिला पदरात घ्या!"
पहिल्याच भिक्षुनं या प्रस्तावास होकार दिला. तो इतरांना म्हणाला, "मी संसार करावा अशीच ईश्वरी योजना दिसते, तेव्हा मी काही येत नाही तुमच्याबरोबर."
दुसरं गाव लागलं. तेथील मंदिरप्रमुखाचं निधन झालं होतं, नवा प्रमुख कोण होईल या पेचात सारे होते. गटातील एक भिक्षु तिथं रुजू झाला.
अशारितीने एक-एक भिक्षु गळत गेला.
अखेर दोघेच उरले. संध्याकाळची वेळ होती. विश्रांतीकरता दोघेजण वाटेवरल्या गावात थांबले. दोन बौद्ध भिक्षुंना पाहून एक इसम तिथे आला, बुुद्धाची निंदा करू लागला. "तो बुद्ध आणि त्याची बडबड म्हणजे शुद्ध बकवास आहे, त्यात काही तथ्य नाही..."
यावर एक भिक्षु दुसऱ्याला म्हणाला, "तू हो पुढे. जोवर मी या माणसाचं मनःपरिवर्तन करत नाही, त्याला बौद्धमार्गाकडे वळवत नाही तोवर माझा मुक्काम इथंच राहील."
...आणि एकमेव भिक्षु नव्या आश्रमात पहोचला.
या घटनेवरून तिबेटमध्ये म्हण रूढ झाली: 'दहा निघाले की एखादा पहोचतो!'

Comments
Post a Comment