Posts

Showing posts with the label anecdote

दीना!

Image
मास्टर दीनानाथ मंगेशकरांबद्दल काही लेख वाचनात आले. भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा अभ्यास नाही, तितकीशी ओढही नाही. मात्र का कोण जाणे, संगीत-नाट्य क्षेत्रातील मंडळींनी या कलाकाराबद्दल वर्णलेल्या काही आठवणी इतरांशी वाटून घेण्याची इच्छा होतेय:     संगीतातील रुचिपूर्ण, उत्तम काहीही शिकण्याबद्दल मास्टर मुक्तग्राही होते. विद्वान लोकांकडून त्यांनी चिजांचा मोठा संग्रह केला. उत्तरेकडील, थोडे दक्षिणेकडील गायकीचे ढंग आत्मसात केले. ...गोव्यातील मडकइ ते वाफर या तासा-दीड तासाच्या पायी प्रवासात विलक्षण बुद्धिमत्तेच्या मास्टरांनी आपले गुरू बाबा माशेलकर यांजकडून अकरा चिजा शिकून घेतल्या, असा प्रसंग ऐकीवात आहे!  फार फार आत्मीयतेनं त्यांनी हे भांडार मिळवलं, व मुक्तहस्ते शिष्यांना देऊ केलं. मास्टरांची शिकवण्याची ठराविक पद्धत नव्हती. मनात येईल तसे, हिशोबीपणा न करता शिकवत. प्रभाकर जठारांना भरभरून बंदिशी देतेेवेळी ते म्हणाले: "एकच राग सहा-सहा महिने शिकवायचा माझा स्वभाव नाही. शे-दोनशे बंदिशी गळ्यातून गेल्या म्हणजे तुझा आवाज आपोआप निकोप होईल. एकदा शिकवून झाल्यानंतर गाणं हे ज्याच्या-त...

शब्द मोठे की सूर?

Image
  वोल्फगाङ्ग आमाडेउस मोत्सार्टची ( Mozart ) प्रतिभा आपल्याला मोहून टाकते, भारून टाकते. त्यानं ज्यांसोबत  काम केलं ते लिब्रेटिस्ट्स (ओपेरालेखक - संहिता, गद्य/पद् य लिहिणारे) देखील आपल्या कामात तोडीस तोड होते बरं. कुठेसा वाचलेला हा प्रसंग अगदी ठळकपणे लक्षात राहिलाय. विस्मरण्यापूर्वी सांगते:   'सूर सर्वश्रेष्ठ, सुरांचं महात्म्य निर्विवाद आहे' असं मोत्सार्टचं पालुपद चालू असायचं. एका लिब्रेटिस्टनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "अरे, सूर आणि शब्द परस्परपूरक नसतात का? दोहोंपैकी एक जरी नसेल तर ओपेरा उभाच राहणार नाही."    पण मोत्सार्टचं आपलं तेच.   तेव्हा लिब्रेटिस्ट म्हणाला, "ठीक आहे. यापुढे रद्दी कागद, वाणसामानाच्या याद्या वगैरेंतल्या शब्दांना संगीत दे, तेच गाऊन घे रंगमंचावर. फक्त सूरच श्रेष्ठ असतील, तर त्यांच्या मखरात वाट्टेल ते शब्द बसवा, खपतीलच की. शिवाय माझ्यासारख्या लेखकबिखकांच्या मानधनावर खर्च होणारे पैसे वाचतील." तेव्हा कुठे मोत्सार्टच्या डोक्यात प्रकाश पडला!