बाह्य प्रोत्साहनाची आस (in Marathi and English)
* ईमेल-खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुन्हा प्रसिद्ध करतेय. * (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून) R.M. म्हणाला: "मला जग समजून घ्यावंसं वाटतं, त्याचबरोबर जगानंही मला समजून घ्यावं असं वाटतं. मी कलावंत आहे, चित्रकार आहे. मी सर्जन करतो. माझं सर्जन, माझ्या निर्मितीला दाद मिळावी असं मला वाटतं." वृत्तपत्रादी माध्यमांनी, लोकांनी आपल्यावर सतत टीका करू नये, प्रोत्साहनपर चार शब्दही उद्गारावे. कलावंत निव्वळ स्वतःसाठी जगत नाही, तो इतरांसाठीही जगतो...असं बरंच काही सांगत गेला R.M. 'जगाला समजून घ्यावंसं मला वाटतं, पण त्याचबरोबर जगानंही मला समजून घ्यायला हवं' हाच त्याच्या बोलण्याचा गोषवारा होता. आम्ही आणखी काही वेळ बोलत राहिलो. तो मला आपल्या जीवनाविषयी, अडी-अडचणींविषयी, संदिग्धतांविषयी सांगत होता. जगाला समजून घेण्याची सहजप्रेरणा व जगानं आपल्याला समजून घ्यावं ही इच्छा, या दोहोंवर R.M. चा समान भर होता - ही घोडचूक असते, याकडे मी लागलीच त्याचं लक्ष वेधलं. कारण आपण जगाला समजून घेणं सर्जनात्म असतं, मात्र जगानं आपल्याला समजून घेण...