Posts

Showing posts from September, 2025

‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’: बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!

Image
‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ :   बाजारात उभं राहून दिला त्यांनी बाजार पेटवून!   मुक्ता 'असरार'   सगळीकडे बाजार भरू लागलाय, सगळे बाजारात भरती होताहेत. तनाच्या, मनाच्या, धनाच्या, धर्माच्या, विधिनिषेधांच्या, सभ्य-असभ्यतेच्या...मिळेल त्या रंध्रांत घुसून बाजार पिसाटतोय. एकमेकांच्या काना-डोळ्या-नसांत बाजार ओतून फसफसवतो आम्हीच आम्हाला, नि जिवात जीव आणतो पुन्हा बाजारचं प्रतिविष पाजून. बाजारू नख्यांनी आमची आम्हीच बोचकारून काढली नसतील अशी गात्रं उरली नाहीत, नि ज्यांत बाजार-जंतू वळवळत नसतील अशा जखमाही उरल्या नाहीत. कपाळमोक्ष करून घ्यावा म्हटलं तर बाजाराची उशी आडवी येते, नैराश्यावर इलाज करायला सांगते.   आकाश-पाताळ बाजार होताहेत, आत्मे चोंदताहेत, एकमेकाच्या मेंदूचे वडे तळून खाण्यात कुणालाच आता संकोच वाटत नाही. पण यावर तिळाएवढा जरी आक्षेप असेल आपल्याला, तर? - प्रयोग करून बघावा लागतो. वीजेच्या उरात वीज खुपसावी लागते, पूर गिळून टाकणारा महापूर आणावा लागतो - बाजारात उभं राहूनच बाजार पेटवून द्यावा लागतो!    ‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ हे नामदेव ढसाळांच्या मोजक्या कविता गात, ...