Posts

Showing posts from December, 2025

सोनसळ

Image
जपानच्या राजानं एका झेन गुरुंकडून बागकामाचे धडे घेतले. तीन वर्षं उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, "शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हातरी मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचंं, कौशल्याचं परीक्षण करेन."  त्यांनी राजाचा निरोप घेतला.   राजा आपल्या शाही बागेची अधिकच निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं! बगिचा नेहेमी साफसूफ, नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा बागेवर मेहनत घेत राहिला, त्या दिवसाची वाट पहात राहिला. अखेर एके दिवशी झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुुरु शांतपणे बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत राहिला. गुरुंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतेय असं त्याला वाटू लागलं. 'आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण?'    न रहावून राजानं मौनभंग केला: "काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का आमचं?"   "बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं ...

एक चिनी शेतकरी

Image
कोण्या एके काळी चीन देशात एक शेतकरी होता. एकदा त्याच्या तबेल्यातील एक घोडा पळून गेला. बातमी पसरताच त्या संध्याकाळी काही गावकरी शेतकऱ्याच्या घरी जमले. "च्च च्च च्च... तुझा घोडा पळाला ना.. फार वाईट झालं." शेतकरी म्हणाला, "हो, कदाचित."   दुसरे दिवशी घोडा परत आला. त्यानं आपल्याबरोबर आपले सात रानटी भाईबंद आणले.  तिन्हीसांजेला गावकरी मंडळी नेहेमीप्रमाणे शेतकऱ्याच्या ओसरीवर जमली. "काय शिकंदर नशीब आहे! सात घोडे आयते घावले की तुला! झ्याक झालं." शेतकरी म्हणाला, "हो, बहुतेक."   तिसरा दिवस उजाडताच शेतकऱ्याच्या मुलाने रानटी घोड्यांना माणसाळवण्याचं काम हाती घेतलं. पैकी एका घोड्यावर स्वार होऊन रपेट करू लागला. घोड्यानं मुलाला आपल्या पाठीवरून उडवून लावलं. मुलाचा पाय मोडला.  शिळोप्याच्या गप्पा करताना मंडळी हळहळली. "बाप रे! नसती पीडा झाली च्यामायला त्या घोड्यांपायी, काय हो?" "हो, बहुधा," शेतकरी म्हणाला.   दरम्यान त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती पालटत होती. पुढल्या दिवशी रंगरूट (recruitment) अधिकारी गावात आले. सर्व धडधाडकट पुरुषांना सक्...