Posts

Showing posts from August, 2020
Image
No, that's not how Mr. Salamander would sleep. He'd lay flat as a pat.  He won't get up to pee, nor sip water afterwards.   A pure quake - sweat gathering on dorsal palms - an awful jolt - nothing. A man lays dying; or, fast asleep. Please don't ask me any further. I have to cross worlds for language and grammar in this dead of the night.   Where am I brought?  Dreadful snorting, chomping, howling, empty gurgling: Guards pacing at the gates of Hell? Pigs and wolves wearing armour? It's the man and wife snoring.  You've thoroughly lost your voice like the contents of Mr. Salamander's toolbox or better, his voice-box.   Eyes, eyes, how you hurt me, yellow and glum! Who will dunk you back into sleep?     Picture Credits: Not me

आन्द्रेइ् तार्कोव्स्की तरुणांना उद्देशून...

Image
      आन्द्रेइ् तार्कोव्स्की: थोर रशियन सिनेदिग्दर्शक. दोनातेल्ला बायिल्वो या इटालियन दिग्दर्शिकेनं १९८४ साली त्याच्यावर 'उन पोएता नेल चिनेमा: आन्द्रेइ् तार्कोव्स्की' (Andrei Tarkovsky: A Poet In the Cinema) नामक माहितीपट चित्रित केला. माहितीपटात एके ठिकाणी "तरुण पिढीला काय सांगशील?" असा प्रश्न विचारला जातो. झाडाच्या बुंध्यावर सरड्यासारखा भासणारा तार्कोव्स्की म्हणतो:  "एकांतावर प्रेम करायला शिका. स्वतःसोबत एकांतात आणखी वेळ घालवा. तरुणाईबाबतची एक समस्या म्हणजे एकटेपण जाणवू नये म्हणून ही मंडळी धिंगाणा घालतात, कर्कश आक्रमकतेने वागतात, दांडगाई करतात. दुर्दैवी आहे ते. माणसानं लहान वयापासूनच आपापलं रहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर स्वतःचा कंटाळा न येणं. स्वतःशी रमता न येणं, स्वतःपासून पळ काढावासा वाटणं हे फार भयंकर लक्षण आहे...रोगच आहे म्हणा ना." https://www.youtube.com/watch?v=bEpkrrmXTAE

शब्द मोठे की सूर? - मोत्सार्ट व लिब्रेटिस्ट

Image
  वोल्फगाङ्ग आमाडेउस मोत्सार्टची प्रतिभा आपल्याला मोहून टाकते, भारून टाकते. त्यानं ज्यांसोबत  काम केलं ते लिब्रेटिस्ट्स (ओपेराची संहिता, गद्य/पद् य लिहिणारे - ओपेराकार) देखील आपल्या कामात तोडीस तोड होते बरं.  कधीसा, कुठेसा वाचलेला हा प्रसंग अगदी ठळकपणे लक्षात राहिला आहे. विस्मरण्यापूर्वी सांगते: 'सूर सर्वश्रेष्ठ, सुरांचं महात्म्य निर्विवाद आहे' वगैरे मोत्सार्टचं पालुपद चालू असायचं. एका लिब्रेटिस्टनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, "अरे, सूर आणि शब्द परस्परपूरक नसतात का? दोहोंपैकी एक जरी नसेल तर ओपेरा उभाच राहणार नाही." तरीही मोत्सार्टचं आपलं तेच.  तेव्हा लिब्रेटिस्ट म्हणाला, "ठीक आहे. असं असेल तर माझ्यापाशी एक फक्कड कल्पना आहे. यापुढे रद्दी-पुस्तकं,  टाकाऊ कागदपत्रं, वाणसामानाच्या याद्यांतल्या शब्दांनाच संगीत दे, नि तेच गाऊन घे रंगमंचावर. केवळ सूर श्रेष्ठ असतील तर त्यांच्या मखरात वाट्टेल ते शब्द बसवले तरी खपतील. शिवाय माझ्यासारख्या लेखकबिखकांच्या मानधनावर खर्च होणारे पैसे वाचतील." तेव्हा कुठे मोत्सार्टची बत्ती पेटली!

सोनसळ

Image
 जपानच्या राजानं एका झेन गुरुंकडून बागकामाचे धडे घेतले. तीन वर्षं उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, "शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हातरी मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचंं, कौशल्याचं परीक्षण करेन."  त्यांनी राजाचा निरोप घेतला. राजा आपल्या शाही बागेची अधिकच निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं! बगिचा नेहेमी साफसूफ, नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा बागेवर मेहनत घेत राहिला, त्या दिवसाची वाट पहात राहिला. अखेर एके दिवशी झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुुरु शांतपणे बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत राहिला. गुरुंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतेय असं त्याला वाटू लागलं. 'आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण?'   न रहावून राजानं मौनभंग केला: "काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का आमचं?" "बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं कुठायत? त्यांचा स...

शान्ता ज. शेळके यांनी सांगितलेला एक प्रसंग

बालपणीचा एक प्रसंग शान्ताबाईंनी आपल्या ललितलेखात वर्णिलेला आहे: एकदा नात्यातल्या, की ओळखीतल्या एक बाई घरी आल्या. शान्तेची आई व त्या बाईंच्या गप्पा चालल्या. आईच्या गळ्यात नव्यानंच घडवलेली टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ होती. बाईंचं लक्ष चटकन् माळेकडे गेलं. "..नवीन घडवलीत वाटतं मोहनमाळ." "हो. नवीच आहे." "मणी टप्पोरे आहेत की. लाखेचे असतील. एवढे मोठे मणी शुद्ध सोन्याचे कसे असणार!" आई काहीच बोलली नाही. नुसती हसली. यामुळे त्या बाईंना कसलंसं अगम्य समाधान वाटलं असावं. त्यांच्या मुद्रेवर ते स्पष्ट झळकत होतं. चहा-खाणं झाल्यानंतर बाई आपल्या घरी निघून गेल्या. लहानग्या शान्तीनं प्रश्न केला: "आई, लाखेचे मणी म्हणजे काय गं?" "अगं, लाख नावाचा एक पदार्थ असतो. सोनं परवडत नसेल तर या लाखेचे मणी बनवतात आणि वरून सोन्याचा पातळ पत्रा चढवतात फक्त."  "तुझ्या माळेचले मणी लाखेचे आहेत??" मोहनमाळेकडं संशयानं पहात शान्तेनं विचारलं. एखादी वस्तू आपल्याला वाटली तितक्या मोलाची नाही या भावनेनं तिचा हिरमोड झाला होता. शान्तेचा उतरू लागलेला चेहरा पाहून आईला हसू कोसळलं. ...

A short note to myself

The question whether I can teach (anything) is linked intimately with whether I can learn. Have you the energy, the curiosity, the patience, the humility? There's no teacher, really. Anyone who takes up the task/title of a teacher has only to nurture the atmosphere of learning, to oil the wick of awareness in oneself and in the student.