आन्द्रेइ् तार्कोव्स्की तरुणांना उद्देशून...
आन्द्रेइ् तार्कोव्स्की: थोर रशियन सिनेदिग्दर्शक.
दोनातेल्ला बायिल्वो या इटालियन दिग्दर्शिकेनं १९८४ साली त्याच्यावर 'उन पोएता नेल चिनेमा: आन्द्रेइ् तार्कोव्स्की' (Andrei Tarkovsky: A Poet In the Cinema) नामक माहितीपट चित्रित केला.
माहितीपटात एके ठिकाणी "तरुण पिढीला काय सांगशील?" असा प्रश्न विचारला जातो.
झाडाच्या बुंध्यावर सरड्यासारखा भासणारा तार्कोव्स्की म्हणतो:
"एकांतावर प्रेम करायला शिका. स्वतःसोबत एकांतात आणखी वेळ घालवा. तरुणाईबाबतची एक समस्या म्हणजे एकटेपण जाणवू नये म्हणून ही मंडळी धिंगाणा घालतात, कर्कश आक्रमकतेने वागतात, दांडगाई करतात. दुर्दैवी आहे ते. माणसानं लहान वयापासूनच आपापलं रहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर स्वतःचा कंटाळा न येणं.
स्वतःशी रमता न येणं, स्वतःपासून पळ काढावासा वाटणं हे फार भयंकर लक्षण आहे...रोगच आहे म्हणा ना."
Comments
Post a Comment