बालकाला प्रेम म्हणजे काय ते सांगण्याची गरज नसते, पण पालकांना ते ठावूक नसतं
आईबाप आपल्या मुलांना म्हणतात, 'आमचं तुमच्यावर प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे.' ते केवळ वात्सल्याचा आव आणू शकतात, प्रेम-जिव्हाळ्याबद्दल बाष्कळ बडबड करू शकतात. त्यांचं वास्तविक आचरण अतिशय रूक्ष, प्रेमहीन असतं. ते अपत्याशी तुसडेपणानं वागतात; त्यांच्या वागण्यात आदराचा लवलेश नसतो. कोणाही पालकाच्या मनात अपत्याबद्दल निखळ आदर नसतो. अपत्याबद्दल कसला आदर बाळगायचा? लहान मूल ही आपल्या लेखी व्यक्ती नसतेच, ती एक मालमत्ता असते. मुख्य म्हणजे ती एक अडचण असते, डोक्याला ताप असतो. चिडीचूप बसेल तो शहाणा मुलगा / शहाणी मुलगी. आई-वडिलांच्या कामात, दिनक्रमात लुडबुड करत नसेल तर ते फार गुणाचं लेकरू! पण या साऱ्यात आदर, प्रेम मुळी नसतंच. पालक नावाची ही माणसं तऱ्हतऱ्हेचे पूर्वग्रह, बुरसटलेले विश्वास मुलांच्या मेंदूत कोंबतात. पिढ्यानपिढ्या मानवप्राणी जो अर्थशून्य कचरा वाहून नेत आहे तेच ओझं पालक आपल्या मुलांच्या पाठीवर लादतात. मूर्खता अव्याहत चालू रहाते... पर्वतप्राय होत जाते. आणि तरी बहुतांश पालक 'आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो' या गोड गैरसमजात वावरतात. पालकांच्या ऱ्हदयात खरोखर प्रेम असेल तर मुलांनी आप...