-
*कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*
जगता जगता मनाचा पट किती नरमलाय! दिसामाजी दोन वेळा मेजावरून कपडा फिरावा तसा हजारो दिवस-रात्रींशी, देहाशी लाग-लागून तो थकलाय, विरलाय. आडपडदा राखणं आता शक्य नाही - गरजच उरली नाही. या खोलीत येणं, करकरत्या फळ्यांवर चालणं.. शिकणं किती सहज झालंय नै आज? शिकवण्यातदेखील आता अवघडलेपण नाही.
हा आपला पहिला वर्ग, पहिला पाठ. ...कित्येक वर्षांपूर्वी, तरुणपणी जे शिकून गेलास ते शिकणं नव्हतं मुळी. 'संगीत' हे तुझ्याकरता कुणीतरी बनण्याचं साधन होतं, 'संगीताचा विद्यार्थी' बनून माझ्यापाशी आला होतास. त्यात तुला गती होतीच. शिकणं औपचारिक, मोहोर उमटवून घेण्यासाठी. ..वयात येताना तडकलेल्या आवाजाचं न्यून वाद्याच्या सहाय्यानं भरायचं होतं. पिढीजात चांभारकी, कळकट 'गावंढळ' आयुष्य दूर ढकलण्यासाठी सुरांचं बळ तुला हवं होतं. गांभिर्याचा आवेश होता. संगीताबद्दल गांभिर्य होतं, नाही असं नाही. माझे धुळीत थुंकल्यासारखे बाष्कळात बाष्कळ शब्ददेखील वेचून घेतले असतेस तू तेव्हा.

आणि मी? ..संगीतापासून एक दरवाजा निर्माण केला होता - दरवाजा कसला, सबंध खोलीच! माणसांकरता मी ती उघडत होतो म्हणण्यापेक्षा लावून घेत होतो. पण दरवाजा 'तिला' रोखू शकला नाही - खुणावत राहिला. ..दरवाजा नवनव्या दुःखांनाही थोपवू शकला नाही.
शून्यता दूर करण्याचे, संगीतानंदेखील ती पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न फोल ठरलेत - आता तू धडपड थांबवली आहेस. शांतता, एकाकीपण, खंत, उसासे, सावल्या - आठवणींच्या सावल्या... सारंकाही पुरून उरणार आहे. क्लांत मन, गारठलेली, श्रांत गात्रं - सारं आहे तसं घेऊन आला आहेस. अन् मी म्हातारा मृत्यूची वाट पाहत बसून आहे. अनमानाचे उरलेसुरले धागेदेखील आता गळून पडावेत.
"तर, मी म्हणत होतो... ओह! जे शब्दांत सांगताच येत नाही, शब्दांतून जे ओसंडतं ते संगीतातून पाझरतं. म्हणूनच संगीत पूर्णतः मानवी नसतं - त्याला पुरतं माणसाळवता येत नाही. ...संगीत ही राजाची, उमरावांची मिरास नव्हे, इतकं तरी आता तुझ्या लक्षात आलंय ना?"

"- ते देवासाठी असतं, हे माझ्या लक्षात आलंय."
"छे! देव बोलतो की."
" ... ते कानांसाठी असतं का?"
"जे सांगता येत नाही, बोलून दाखवता येत नाही ते कानांसाठी कसं असेल?"
"ऐश्वर्यप्राप्तीसाठी?"
"अंहं."
"कीर्ति मिळवण्यासाठी?"
"--"
"शांतता हे तर संगीताचं उद्देश्य नव्हे?"
"- शांतता ध्वनिच्या विपरीत असते."
"..अन्य संगीतकारांसाठी?"
"छे."
"...प्रेमासाठी?"
"नाही."
"प्रेमयातनांसाठी?"
"अंहं."
"...परित्याग..?"
"नाही. असलं काही नाही."
"कुणा अदृष्टाकरता वाढून ठेवलेला वेफर..?"
"वेफरचा काय संबंध? वेफर म्हणजे तरी काय - त्याला रंगरूप असतं, चव असते, वास असतो. छे, असलं काहीही नाही."
"मग.. मला माहित नाही. ...माहित नाही. ......मला वाटतं.. वाटतं एक पेला मृताखातर भरून ठेवावा.."
"- ह्म. तापलायस तू."
"..जिथे शब्द आटून गेलेत; शब्दांनी ज्यांना टाकलंय अशांकरता दोन घोट घेण्याची सोय.. ....लहानग्यांच्या सावल्यांकरता. चांभारी ठाकठोकीच्या नावानं. जन्मापूर्वीच्या प्राणहीन, काळोख्या अवस्थांसाठी.."
निस्तब्धता. जी शब्दांत मावत नाही, व्यक्त करताच येत नाही..
'आपण कोणी नाही. आपल्याला काहीच उमगलं नाही', हे तुला पुरतं उमगलंय.
तुझा शिक्षक होतो, याचा अभिमान आहे मला.
Comments
Post a Comment