बालकाला प्रेम म्हणजे काय ते सांगण्याची गरज नसते, पण पालकांना ते ठावूक नसतं
आईबाप आपल्या मुलांना म्हणतात, 'आमचं तुमच्यावर प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे.'
ते केवळ वात्सल्याचा आव आणू शकतात, प्रेम-जिव्हाळ्याबद्दल बाष्कळ बडबड करू शकतात. त्यांचं वास्तविक आचरण अतिशय रूक्ष, प्रेमहीन असतं. ते अपत्याशी तुसडेपणानं वागतात; त्यांच्या वागण्यात आदराचा लवलेश नसतो. कोणाही पालकाच्या मनात अपत्याबद्दल निखळ आदर नसतो. अपत्याबद्दल कसला आदर बाळगायचा? लहान मूल ही आपल्या लेखी व्यक्ती नसतेच, ती एक मालमत्ता असते. मुख्य म्हणजे ती एक अडचण असते, डोक्याला ताप असतो. चिडीचूप बसेल तो शहाणा मुलगा / शहाणी मुलगी. आई-वडिलांच्या कामात, दिनक्रमात लुडबुड करत नसेल तर ते फार गुणाचं लेकरू! पण या साऱ्यात आदर, प्रेम मुळी नसतंच.
पालक नावाची ही माणसं तऱ्हतऱ्हेचे पूर्वग्रह, बुरसटलेले विश्वास मुलांच्या मेंदूत कोंबतात. पिढ्यानपिढ्या मानवप्राणी जो अर्थशून्य कचरा वाहून नेत आहे तेच ओझं पालक आपल्या मुलांच्या पाठीवर लादतात.
मूर्खता अव्याहत चालू रहाते... पर्वतप्राय होत जाते.
आणि तरी बहुतांश पालक 'आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो' या गोड गैरसमजात वावरतात. पालकांच्या ऱ्हदयात खरोखर प्रेम असेल तर मुलांनी आपलं ऐकावं, आपल्या आज्ञेत रहावं, येनकेणप्रकारे आपली 'कार्बन कॉपी' व्हावं असा आग्रह ते धरणार नाहीत - पालक दुःखी असतात, रडतोंडे असतात हो, बाकी काही नाही!
कसा असतो त्यांचा जीवनानुभव? हं? निव्वळ क्लेश, कष्ट - जीवनमांगल्यात चिंब नाहता न आल्याने जगणं म्हणजे जणू शाप होऊन गेलेला असतो. आणि तरी मुलांनी आपल्यासारखं व्हावं अशी त्यांची आकांक्षा असते!?

* * *
सामान्यतः मुलानं काही मागितलं, काही विचारलं की त्याचं म्हणणं पूर्ण होण्यापूर्वी, ते काय विचारतंय हे ऐकूनही न घेता आई / वडील 'नाही' म्हणून टाकतात. 'नाही' हा अधिकारदर्शक शब्द आहे, बडग्यासारखा उगारता येतो. 'हो' अधिकारदर्शक नाही. आई, वडील.. अधिकारधारी कोणाही व्यक्तीच्या तोंडून होकार क्वचितच ऐकू येतो.
शंभरपैकी नव्व्याण्णव प्रसंगी त्या नकारामागे, 'नाही' म्हणण्यामागे आपलं वर्चस्व, आपला अधिकार मिरवण्याखेरीज अन्य कुठलाच हेतू नसतो. प्रत्येकजण काही पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही, कोट्यावधी लोकांवर सत्ता गाजवू शकत नाही. पण कोणीही उठून विवाह करू शकतो, पती होऊ शकतो, पत्नीवर अधिकार गाजवू शकतो. कोणीही स्त्री, कोणीही पत्नी 'आई' होऊ शकते, अपत्यावर अधिकार गाजवू शकते. कोणाही मुलाला टेडी-बेअर मिळू शकतो.. मूल त्या खेळण्याला लाथेने उडवतं, त्याला ठोसे मारतं, सर्वशक्तिनिशी थपडा मारतं - त्या थपडा खरं म्हणजे आई-वडिलांना उद्देशून असतात....बिच्चारा टेडी-बेअर कोणावर अधिकार गाजवणार!

प्रश्न: मुलांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता; आमचे विचार, आमच्या कल्पना त्यांच्यावर न लादता त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेनिशी वाढावं याकरता आम्ही कशाप्रकारे सहाय्य करू शकू?
ओशो: 'मदत करणं', 'सहाय्य करणं' या दृष्टीने विचार करता तिथेच तुम्ही चुकता, कारण विचाराअंती काहीही केलंत, तरी त्यातून तुम्ही मुलांकरता एक विशिष्ट कार्यक्रम आखता, चौकट आखता. तुमच्या पालकांनी तुमच्याकरता आखलेल्या चौकटीहून ती भिन्न असेल कदाचित, पण या न त्या रितीने तुम्ही मुलांना संस्कारितच करता.
माझ्यामते पालकांचं काम आहे मुलांना वाढू देणं - तुम्ही वाढू दिलंत, अथवा दिलं नाहीत, तरी ती वाढतीलच. तुमचं काम आहे आधार देणं, पोषण करणं, जे काही वाढतंय त्याला हातभार लावणं. दिशा देऊ नका, आदर्श उभे करू नका. योग्य काय-अयोग्य काय याचे पाठ पढवू नका: त्यांना स्वानुभवातून शोधू देत.
"मुक्त व्हा, आमच्या आज्ञा झेलत बसू नका. स्वतःचा विवेक, स्वतःची प्रज्ञा वापरा. भरकटलात, हरवलात तरी चालेल, गुलाम राहून सतत नाकासमोर चालण्यापेक्षा ते फार बरं असतं. चुका करणं, चुकांमधून शिकणं हे सतत इतरांचं अनुसरण करून बरोबर ठरण्यापेक्षा उत्तम, अन्यथा तुम्ही इतरांच्या मागे जाण्याव्यतिरिक्त काहीच शिकत नाही. अनुसरण म्हणजे विष, केवळ विष." - मुलांना हे सांगायचं, तर पालकांच्या अंगी प्रचंड धैर्य हवं, प्रेम हवं.
अंतःकरणात प्रेम असेल ना, तर सारं अगदी सहज घडून येतं.
प्रत्येक मूल जन्मतः प्रेमस्वरूप असतं. प्रेम म्हणजे काय हे त्याला निखालस ठावूक असतं. लहान मुलाला प्रेम म्हणजे काय ते सांगण्याची आवश्यकताच नसते. पण आई-वडिलांना प्रेम ठावूक नसतं. आणि दुर्दैवाने स्वतः पालक होण्याची वेळ येईपर्यंत ते मूलदेखील प्रेम करण्याची क्षमता गमावून बसतं.
निसर्गतः प्रत्येक मूल प्रेमानं ओथंबलेलं असतं, त्याच्या ठायी प्रेमाचा पूर असतो. मूल ही चीजच प्रेममयी असते. पण पालक प्रेम करू शकत नाहीत. त्यांचे व्यक्तिगत विकार आडवे येतात: त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रेम लाभलेलं नसतं. ..आईचं आपल्या पतीवर प्रेम नसतं, बापाचं आपल्या पत्नीवर प्रेम नसतं. प्रेमाचा मागमूस नसतो. त्याऐवजी वर्चस्व गाजवणे, हक्क गाजवणे, मत्सर यांसारख्या नासक्या गोष्टींनी नात्याचा समस्त अवकाश व्यापलेला असतो.

तेव्हा प्रेम करत असाल, प्रेम देऊ-घेऊ शकत असाल तर फार सोपं असतं सारं.
'कसं करू' हा प्रश्न विचारू नका. 'कसं' हा प्रश्न म्हणजे तंत्राचा, फॉर्म्युल्याचा शोध - आणि प्रेमाचं कुठलंही तंत्र नसतं.
'मुलं आपल्याला न रुचणारी वाट चोखाळतील' ही पालकांच्या मनातली धास्ती मी समजू शकतो. पण तो सर्वस्वी तुमचा प्रॉब्लेम आहे! मुलं काही तुमच्या आवडी-निवडी जपण्यासाठी जन्माला येत नाहीत. त्यांच्या पुढ्यात त्यांचं स्वतःचं आयुष्य आहे. ते ती आपल्या परीने जगतात या गोष्टीचा तुम्हाला आनंद व्हावा. मग ते कसंही असो. कदाचित ते गाणा-बजावणाऱ्याचं भणंग जीवन असेल..
तुमची अपत्यं दुःखी-कष्टी व्हावीत असं तुम्हाला खचितच वाटत नाही. आपला पाल्य सुखी व्हावा, त्याचं भलं व्हावं अशीच तुमची इच्छा असते, पण त्या इच्छेचं स्वरूप अत्यंत चुकीचं असतं, लक्षात घ्या. मुलं डॉक्टर झाली, इंजीनियर, वकील, अकाउंटंट झाली, बडी अधिकारी झाली म्हणजे ती सुखी-समाधानी होतील असं तुम्हाला वाटतं - तसं नसतं, तुम्हाला समजत नाहीय! माणूस जे होण्याकरता आला आहे ते झाला तरच तो सुखी होऊ शकतो. त्याच्या अंतरात, पिंडात जे बीज असेल त्यानुसारच तो वाढतो, बहरतो.

- रजनीश (ओशो )
Comments
Post a Comment