मृत्यूशय्येवर... (नाटुकले)
* * हे भाषांतर माझे नाही * * मृत्यूशय्येवर... मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक (एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. कुटुंबातील सारेजण त्याच्या शय्येभवती जमलेत. त्याच्या पायांच्या दिशेला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळते आहे.) शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठे आहेस तू? मेरी : मी इथेच आहे तुझ्यापाशी. शेतकरी : एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं? एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे. (अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या सगळ्या माणसांना - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - हाका मारून तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.) शेतकरी : सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?! मेरी (त्याला झोपवत): असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही? शेतकरी : छे ,छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर. मेरी : ठीक आहे. चला, सगळे आपापल्या कामाला जा. (सगळे निघून जातात. फक्त मेरी उरते.) शेतकरी : आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला ...