म्हातारचळ (नाटुकले)
* * हे भाषांतर माझे नाही. * *
म्हातारचळ
मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर (Friedrich Karl Waechter)
(म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)
म्हातारा: म्हातारचळ झिंदाबाद!
सर्व म्हातारे (पेला उंचावत): झिंदाबाद! झिंदाबाद!
(सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात. पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)
Comments
Post a Comment