नातेसंबंधांत प्रतिमा-निर्मिती
आपले परस्परसंबंध - कितीही दूरचे वा निकटचे असोत - या संबंधित्वाचा पुरा अर्थ उमगायचा, तर मेंदू प्रतिमा-निर्मिती का करतो हे समजावून घ्यायला हवं, यावर चिंतन व्हायला हवं.
आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मनात प्रतिमा, दृढचित्रं का बाळगतो? स्विस, ब्रिटिश, फ्रेंच इ. म्हणून जर तुमची एक प्रतिमा असेल - या प्रतिमांमुळे आपलं मानवतेबद्दलचं अवलोकन दूषित होतंच, शिवाय त्या माणसा-माणसात फूट पाडतात, नाही का? आणि जिथे विभक्तता, भेदाभेद असेल तिथे संघर्ष उद्भवणारच.
प्रतिमा निर्माणच न करणं मुळी शक्य आहे का? - येतंय लक्षात? घडल्या घटनांची नोंद न ठेवणं - प्रसंग आनंदाचा असो, दुःखाचा असो - त्याचा हिशेब न ठेवणं. निंदा, अपमान, स्तुती.. प्रोत्साहन मिळो वा उत्साहभंग होवो... कळतंय? आपल्या दैनंदिन नातेसंबंधांत हे सारं घडत असतं - त्याची नोंद, त्याची गणती न करणं शक्य आहे का?
मेंदू जर स्वतःबाबत घडणाऱ्या हरेक गोष्टीची मनोवैचारिक नोंद ठेवत बसला, तर त्याला निवण्याची, शांतवण्याची फुरसत कधीच लाभत नाही; तो निरावेग, निशांत होऊच शकत नाही. अहोरात्र घरघरणारी यंत्रणा अखेर झिजून जाते, शिणून जाते - सहाजिक आहे. नातेसंबंधांत नेमकं हेच घडत असतं. तेव्हा मनात एकमेकांबद्दल प्रतिमा न स्थापणं शक्य आहे का?

साधंसं तथ्य पहा: तुम्ही माझी निंदा करता, वा प्रशंसा करता - हे ज्ञान, ही जाणीव मनात रहाते. ती जाणीव, ती प्रतिमा मनात बाळगून मी तुम्हाला भेटतो. म्हणजे तुमची-माझी भेट कधी होतच नाही! प्रतिमाच प्रतिमेला भेटत असते! त्यामुळे वास्तविक पाहता तुमच्या-माझ्यात नातं नसतंच. ...मी त्या गोष्टींची नोंद घेतली रे घेतली, की तत्काळ प्रतिमा उभी रहाते, आठवण निर्माण होते. हा भूतकाळच मग वर्तमानाला भेटत रहातो.
तेव्हा नातेसंबंधांमध्ये ज्ञानाचं, पूर्वानुभवांचं, परंपरेचं - प्रतिमेचं स्थान काय?
- जे. कृष्णमूर्ती
Comments
Post a Comment