'निनावी' नावाची कविता निनावी नसते
लिहिणं म्हणजे काय?
विचारच कधी केला नाही.
शब्दांखालून चालत रहावं
पडतंच अंगावर काहीबाही,
क्वचित अंगीसुद्धा लागतं.
पुष्कळदा काहीच घडत नाही
मग आपणच गुणगुणावं
त्यांचं सद्गदलेपण नकळत वेचून घ्यावं
नाहीतर कुंपणावरून उडारण्याची पायांत ताकद ठेवावी
किंवा धरावं ध्यान, गुरुत्वाकर्षणात विलीन होईपर्यंत
गल्लीतले कुत्रे लोचट फार
कुत्री हवीय माझी की मी?
कसं बरं कळावं?
आपणही रस्त्यात उताणं लोळावं?
'रॉक्स अॅट द सी'
- उललेली अंगं, ते सुजलेले रंग... विलक्षण!
डोळ्यांनाच दिसावं सारं असा तिचा हट्ट नाही.
चित्रांतून ती आपलीशी वाटते. समजण्याची गरज संपते.
''का मी मारावं, चावावं, कुस्करावं तुला? सोसायची इतकी कसली हौस?'' तो विचारतो.
'x' बद्दल सांगायला नको होतं. नसता घोळ याच्या डोक्यात.
आईशी गाठ घालून देऊ?
माझ्याहून जास्त ओळखते म्हणे मला ती
तरी त्याला नाही आवडणार तिचं
अर्थगच्च बोलणं तिच्या
शबनमसारखं
किंवा तिच्याचसारखं तटतटून आलेलं.
काय माहित बाई लिहिणं म्हणजे काय!
घास चिवडावे तसं स्वतःतलं चिवडत गेले नि
भलतंच वाढून आलं समोर
उठायची नाही की जेवायची नाही इच्छा आता,
घाणेरडी सवय -
खरकट्या ताटात गिरवणं.
वाटतं काहीच बदलणार नाही,
बदललं तरी हरकत नाही
... ही सहजता सोडवत नाही.

Comments
Post a Comment