आवाजाचं म्हणणं

मला मनापासून वाटतं की जसजसे आपण गाण्यात खोल शिरतो तसतसा गळ्यातून निघणारा आवाजच विश्व असतो. आवाजच सारी इंद्रियं होऊन जातात. ते पुरेसं असतं. सारंकाही ज्या शांततेत जन्म घेतं व लुप्त होतं त्या शांततेशी नातं जुळलं की.....जेव्हा आपण कसबी नव्हतो; आपल्यापाशी होतं केवळ शरीर, केवळ जाणीव - त्या आदिमतेपर्यंत जाणं.

Comments