हे माशासाठी
पानांतून उनमुन दुपार वाहणं
बाकासमोर बाकापरी शांत बसून राहणं
- कॉफीचा आवाज,
वासाच्या नेतीचा अंमल चढत जाणं
काचेमागे अखंड हालचाल -
पांढरी, काळी, सळसळ मासोळी
त्या वेगात एक मासा
दिसला म्हणताच कलणारा
हुकला म्हणताच हसणारा,
फिरताना तो
मनात
उगाच
लख्ख पल्ला उठणारा
आवडणं म्हणजेच ओळखणं
'मागे कोण-पुढे काय' भान सुटणं...
का सांडावा हा क्षण
नि वेचाव्या काचा शब्दांच्या ?
बाकासमोर बाकापरी शांत बसून राहणं
- कॉफीचा आवाज,
वासाच्या नेतीचा अंमल चढत जाणं
काचेमागे अखंड हालचाल -
पांढरी, काळी, सळसळ मासोळी
त्या वेगात एक मासा
दिसला म्हणताच कलणारा
हुकला म्हणताच हसणारा,
फिरताना तो
मनात
उगाच
लख्ख पल्ला उठणारा
आवडणं म्हणजेच ओळखणं
'मागे कोण-पुढे काय' भान सुटणं...
का सांडावा हा क्षण
नि वेचाव्या काचा शब्दांच्या ?
Comments
Post a Comment