आपला गोंगाट थांबलाय. आता विविध पक्षी, प्राणी, कीटक घराच्या आसपास आढळू
लागलेत. एकेकाळी आपण त्यांच्यासोबत राहत होतो, पुन्हा राहू शकतो, आपण
पुन्हा मित्र होऊ शकतो. ज्याला स्वतःला बदलायचं आहे त्याच्याकरता प्रत्येक
क्षण ही एक संधी असते. आपण या मित्रांकडे पहावं, त्यांचं निरीक्षण करावं,
त्यांची माहिती घ्यावी. ते आपल्यासाठी काय करतात, आपण त्यांच्यासाठी काय
करू शकतो हे समजून घ्यावं.
जे आनावश्यक आहे ते (आपल्याला अत्यावश्यक वाटत असलं तरी) आपल्याकडून काढून घेतलं जातंय, आपण जितका प्रतिकार करू तितक्या त्वेषाने हिसकावून घेतलं जातंय कारण आपल्याला समजून घेण्याची इच्छा नाही. जे आवश्यक आहे ते आपल्यापाशी असू दिलं जातंय. समतोल साधण्याचा प्रयत्न होतोय. भवतालाकडे, हिरवाईच्या असंख्य छटांकडे, झुलणाऱ्या कळ्यांकडे, चिमुकल्या घरट्यांकडे, आकाश थोडंफार साफ झाल्यामुळे दिसू लागलेल्या ताऱ्यांकडे आपलं लक्ष जातंय? हे शिक्षण आहे, हे जीवनवैभव आहे, ते आपल्याकरतादेखील आहे!

आपण तितक्याच हावरेपणाने फुलं तोडतोय, वाटेत येणाऱ्या फांद्या छाटतोय; सतत
कानांत ओतण्यात येणाऱ्या बाळबोध सूचनांवर, माहितीवर समाधान मानतोय; ठणाणा
गाणी लावून मन रिझवतोय; आपल्या जिवाला नख लागू नये म्हणू एकमेकांना मदत
करतोय, 'मोठ्या मनाने' सवलती देतोय; नेते पुन्हा पुन्हा 'युद्धा'ची उपमा
वापरून स्वतःचा व जनतेचा अहंकार चेतवत आहेत,...कुठेतरी कुणीतरी वटवाघळं
नष्ट व्हावी म्हणून त्यांच्यात नवा रोग पसरवतोय.
आर्थिक चिंता वाढत असल्या तरी अंतर्मनाला क्वचित शांतता, संथता सुखावतेय - सुखावणारच! पृथ्वीची साद, तिची कंपनं आपल्याला जाणवणारच, आपलं तिच्याशी अनिवार्य नातं आहे.
पृथ्वीवर जगण्याचा स्वाभाविक वेग, सहज रीत आपल्यापुढे उलगडते आहे मात्र अद्यापही ''आपलं काहीतरी मुळापासून चुकलंय'' ही भावना आपण दाबून टाकत आहोत. सकारात्मकता, नकारात्मकता या पळवाटा आहेत.
आपण लॉकडाउन संपावं म्हणून तडफडतोय, जेणेकरून रोजच्या जगण्याचा कत्तलखाना, अंदाधुंद पुन्हा सुरू होऊ शकेल; आणि देवाला म्हणतोय ''आम्हाला वाचव''. कसं वाचवावं कुणी आपल्याला? का म्हणून?

Comments
Post a Comment