कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे

निक पॅटन वॉल्श, वास्को कोटोविओ | सी.एन.एन. , मार्च २०, २०२०

वटवाघूळ - अलिप्त, निशाचर, दाटी करून राहणारा प्राणी. वटवाघळाला कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत मानलं गेलं आहे. तथापि आपल्या दैनंदिन आयुष्यात उलथापालथ घडवणाऱ्या या रोगाचा प्रसार होण्यास वटवाघूळ जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत यावर काही वैज्ञानिकांचं एकमत आहे.
प्राणिशास्त्रज्ञ व रोग-विशेषज्ञांनी सी.एन.एन.ला दिलेल्या माहितीनुसार मानवी वर्तणुकीतील बदल - मानव करीत असलेला नैसर्गिक अधिवासांचा विनाश; तसंच त्याचं प्रचंड संख्येने, जलदगतीने पृथ्वीवर संचार करणं - यामुळे आतापावेतो निसर्गात कुलूपबंद असणारे विकार मानवामधे वेगाने प्रवेश करत आहेत.
कोरोना विषाणूची उत्पत्ती मुळात कशी झाली याचं खात्रीशीर उत्तर वैज्ञानिकांना अद्याप गवसलेलं नाही. संशयित प्रजातीतील जिवंत विषाणूचं पृथक्करण करता आल्यास त्याचा मूलस्रोत सिद्ध करता येईल - हे फार जिकिरीचं काम आहे.
परंतु कोविड-१९ रोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूशी कमालीचं साधर्म्य असलेले विषाणू चिनी नालाकृति वटवाघुळांमध्ये (horseshoe bats - Rhinolophidae) आढळले आहेत. मानव बहुतेकदा ज्यांच्या वाटेला जात नाही अशा वटवाघळांच्या वस्त्यांमधून विषाणू जगभर कसा पसरला यासंबंधी तातडीचे प्रश्न निर्माण झालेत, आणि प्रश्नांवर मिळत असलेल्या उत्तरांतून आपण पृथ्वीशी ज्याप्रकारचं वर्तन करतो, व्यवहार करतो त्याचा समूळ पुनर्विचार करण्याची निकड सूचित होतेय.
वटवाघूळ हा उडण्याची क्षमता लाभलेला एकमेव सस्तन प्राणी होय. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार वाघळं आपल्या वस्तीतून मोठ्या संख्येने विस्तृत क्षेत्रात हिंडू शकतात. ती कित्येक रोगकारक जंतु स्वतःत बाळगू शकतात. उडता येण्यासाठी वटवाघळांना अत्यंत क्रियाशील रहावं लागतं. म्हणूनच त्यांच्यातील (रोग)प्रतिकार यंत्रणेची घडण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.
झूओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन येथील वन्यजीव रोगसत्रविज्ञानाचे (Epidemiology) प्राध्यापक अँड्र्यू कनिंगहॅम यांनी याबाबत माहिती दिली: "जेव्हा वाघळं उडतात तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान जणू ताप भरल्याप्रमाणे शिगेला पहोचतं. हे दिवसातून किमान दोनदा घडतं - ती उडत उडत अन्नाच्या शोधात बाहेर पडतात तेव्हा आणि विश्रांती घेण्यासाठी परतून येतात तेव्हा. यामुळे वाघळांमधे विकसित झालेले रोग-जंतु हे उच्च शारीर तापमानाला तोंड देऊ शकतील अशारितीने उत्क्रांत झाले आहेत.
जेव्हा हे जंतु अन्य प्रजातींमधे शिरकाव करतात तेव्हा मात्र जटिल समस्या उभी ठाकते.
माणसांचंच पहाल तर विषाणूचा खात्मा करण्यासाठी एक नैसर्गिक बचाव-यंत्रणा म्हणून आपल्या शरीराचं तापमान वाढतं, आपल्याला ताप येतो."
परंतु हा विषाणू वाघळासारख्या प्राण्यात उत्क्रांत झाला असेल तर त्यावर उच्च शारीरिक तापमानाचा परिणाम होणार नाही असा इशारा कनिंगहॅम यांनी दिला आहे.
प्रथमतः हा विषाणू संक्रमित होतोच कसा? - कनिंगहॅम यांच्या मते उत्तर सोपं आहे. इतःपर आपल्याला जिची सवय करून घ्यावी लागेल अशी ही नवखी संज्ञा आहे 'झूनॉटिक स्पिलओव्हर' (zoonotic spillover) वा 'झूनॉटिक ट्रान्स्फर' (zoonotic transfer) अर्थात् प्राणिवर्ती रोगांचा अवपात, परोपगमन; प्राणिस्थित रोगजंतुंची (इतर प्रजातींमध्ये) सांडवण. या गोष्टीचा आपल्या जीवनावर अपरिहार्य प्रभाव पडणार आहे. कनिंगहॅम म्हणाले, "वटवाघळं वा इतर वन्य प्रजातींकडून रोगांचा अवपात होण्यामागील अंतःस्थित कारणांचा रोख हा बहुसंख्यवेळा - जवळपास नेहेमीच मानवी व्यवहाराकडे असतो. निरनिराळे मानवी उपद्व्यापच या साऱ्याला कारणीभूत आहेत."
आपली कत्तल झाल्याने, जंगलतोडीमुळे आपला अधिवास नष्ट झाल्याने जेव्हा वटवाघूळ तणावग्रस्त होतं तेव्हा त्याची रोगप्रतिकार यंत्रणा संकटात सापडते, एरव्ही आटोक्यात असलेल्या जंतूंना तोंड देणं यंत्रणेला अवघड जातं. "आमच्या मते माणसावर ताणतणावाचा जसा दुष्परिणाम होतो तसाच तो वटवाघळावरही होतो," कनिंगहॅम म्हणाले.
"अशा परिस्थितीत वाघळाकडून काय केलं जातं? जंतुसंसर्गात वाढ होऊ दिली जाते व मलमूत्राद्वारे ते उत्सर्जित केले जातात - बाहेर टाकले जातात. माणूस तणावाखाली असताना त्याच्या शरीरात नागिणीचे विषाणू (HSV 1) हजर असल्यास नागीण उठते ना, तसं आहे हे - विषाणू होताच, पण (तणावामुळे) तो 'व्यक्त' झाला. हेच वटवाघुळांमधेही घडू शकतं."
कोरोना विषाणूचं संभाव्य उगमकेंद्र समजल्या जाणाऱ्या चीनच्या वुहान प्रांतातील तथाकथित ओल्या बाजारपेठांत (wet markets) जंगली श्वापदांना डांबून ठेवलं जातं; उंची खाद्यपदार्थ किंवा पाळीव प्राणी म्हणून त्यांची विक्री केली जाते. अशा वातावरणात प्रजाती व विषाणूंचा भीषण मिलाफ होण्याची दाट शक्यता असते.
"जर अशाप्रकारे माणसांच्या, अन्य पशुपक्ष्यांच्या निकट सान्निध्यात या श्वपदांची वाहतूक होत असेल अथवा ती बाजारात मांडली जात असतील तर विषाणू मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जात असल्याची शक्यता उद्भवते", कनिंगहॅम यांनी सांगितलं. "अशा बाजारपेठांमधे वावरणारे इतर प्राणीदेखील संसर्गाला बळी पडण्याची शक्यता उंचावते कारण तेदेखील तणावाखाली असतात."
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील परिस्थितिकी (Ecology) व जैवविविधतेच्या विभागप्रमुख केट जोन्स म्हणाल्या: "आपण औषध, खाद्यान्न व पाळीव प्राण्यांच्या स्वरूपात वाढत्या संख्येने पशुपक्ष्यांची अभूतपूर्व वाहतूक करत आहोत. आपण त्यांचे अधिवासदेखील नष्ट करीत आहोत व त्या जागांना मानवी वर्चस्वाधीन, अत्यधिक मानवकेंद्री भूप्रदेशांमधे रुपांतरित करत आहोत. पूर्वी कधी झाली नसेल अशा विचित्र तऱ्हेने प्राणिमात्रांची सरमिसळ होत आहे. ओल्या बाजारात असंख्य प्राणी खेटून रचलेल्या पिंजऱ्यांमधून कोंडलेले असतात."
कनिंगहॅम व जोन्स दोघांनीही एका अशा घटकाकडे लक्ष वेधलं आहे ज्यायोगे प्राणिवर्ती रोगांचा अवपात होण्याच्या दुर्मिळ घटना काही आठवड्यांत जागतिक संकटाचं रूप धारण करू शकतात. "वन्यजीवांपासून रोगांचा अवपात पूर्वीही झाल्याचं इतिहासात आढळतं मात्र त्याकाळी रोगाचा संसर्ग झालेली व्यक्ती खेड्यातील, शहरातील रहिवाशांच्या खूपशी संपर्कात येण्यापूर्वीच मृत्यूमुखी पडत असावी, किंवा रोगमुक्त होत असावी," कनिंगहॅम म्हणाले. "आता मात्र वेगवान यांत्रिक व हवाई दळणवळणाच्या सहाय्याने आज मध्य आफ्रिकेतील जंगलात असणारी एखादी व्यक्ती उद्या लंडन शहराच्या मध्यवर्ती भागात सहज पोहचू शकते."
जोन्स यांनीदेखील याला दुजोरा दिला: "पूर्वी घडून येणाऱ्या प्राणिस्थित रोगजंतुंच्या सांडवणीला आता उत्तेजन मिळालं आहे कारण आपली संख्या बेसुमार वाढली आहे व आपण परस्परांशी उत्तमरित्या जोडलेले आहोत."
या साऱ्यातून मानवी समाज दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो, व तो त्या लवकरात लवकर शिकेल तर बरं.
"पहिली गोष्ट म्हणजे वटवाघुळांना दोष देता कामा नये. कदाचित त्यांच्या मदतीनेच वर्तमान समस्येवर तोडगा निघू शकेल", कनिंगहॅम म्हणाले. "आपण त्यांच्याशी ज्याप्रकारे वागतो त्यामुळे खरंतर या जंतुंचा महाप्रसार झाला आहे."
"आजच्या घडीला वटवाघळांच्या प्रतिकार यंत्रणेबद्दल आपलं ज्ञान तोकडं आहे. तिच्या अभ्यासातून काही महत्त्वचे संदर्भ हाती लागू शकतात. वाघळं स्वतःतील जंतुंना कशी तोंड देतात हे कळू शकल्यास आपल्यामधे त्यां जंतूंचा अवपात झाल्यास त्यांच्याशी सामना कसा करावा याचा अंदाज येऊ शकेल."
मानवी लोकसंख्या फुगत चालली आहे व ज्या स्थानांवर माणसानं पाऊल ठेवण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं अशा स्थानांवर तो आता बस्तान बसवत आहे, त्यामुळे कोरोना विषाणूसारख्या आजारांची टांगती तलवार आपल्यावर कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मानवानं आपली वर्तणूक, आपली जीवनशैली बदलणं हा प्रत्येक नव्या विषाणूकरता महागडी लस विकसित करण्यापेक्षा पुष्कळच सोपा मार्ग असल्याचं कनिंगहॅम व जोन्स यांनी एकमतानं प्रतिपादित केलं आहे.
पर्यावरणीय हानीमुळे माणसंदेखील चटाचट प्राणाला मुकतील हा स्पष्ट, निर्विवाद संकेत जणू कोरोना विषाणूद्वारे मानवाला मिळतो आहे - हे पुन्हा घडू शकतं, अगदी त्याच कारणांपायी.
"पृथ्वीवर अस्तित्वात असणारे लाखो विषाणू आपल्याला अज्ञात आहेत", कनिंगहॅम म्हणाले. "वन्यजीवांकडून होणाऱ्या प्राणिवर्ती रोगांच्या अवपात प्रक्रियेतील कळीचे नियंत्रणबिंदू कोणते हे समजावून घेण्याची व अवपात रोखण्याकरता आवश्यक ती पावलं उचलण्याची आपल्याला नितांत गरज आहे. माणसांना वाचवण्याचा हाच सर्वांत 'परवडण्याजोगा' मार्ग असेल."
"विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतोय कारण आपल्या लोकसंख्येनं कळस गाठला आहे व आपण परस्परांशी सुकररित्या जोडलेलो आहोत," जोन्स म्हणाल्या. प्राणिवर्ती रोगांनी मानवांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता वाढत आहे कारण आपण भूप्रदेशांचा ऱ्हास करत आहोत. अधिवास नष्ट होणं हे जर समस्येमागील कारण असेल तर अधिवास वाचवणं, त्यांचं संवर्धन करणं हाच समस्येवरील उपाय आहे.
आपण पृथ्वीला जी इजा पहोचवत आहोत, जो विध्वंस करत आहोत त्यामुळे आपल्यालाही इजा पहोचू शकते, ती वातावरण बदलासारख्या पिढ्यानपिढ्या, हळूहळू घडून येणाऱ्या स्थित्यंतरापेक्षा अतिशीघ्र, अतिभयंकर असू शकते, हा धडा आपल्याला मिळतो आहे.
"वातावरण, कर्ब-साठ्यावर (carbon storage) पडणारा प्रभाव, रोगांची उत्पत्ती व पुराचे धोके समजावून न घेता जंगल तोडणं, त्याजागी शेती करणं निश्चितच योग्य नाही, चालण्याजोगं नाही," जोन्स म्हणाल्या. "मनवावर सगळ्याचा एकंदर काय परिणाम होईल यासंबंधी बेफिकीर राहून एकांगीपणे अशा गोष्टी करून चालणार नाही."

Comments
Post a Comment