कोरोना-साथीमुळे वटवाघुळांवर चिडण्याआधी हे वाचा!
कोरोना-साथीचं खापर वटवाघूळांवर फोडणं ही चूक
पीटर अॅलागोना | 'दि कॉन्व्हर्सेशन ', मार्च २४, २०२०
कोविड-१९ कोरोना विषाणू उत्पत्ती संभाव्यतः वटवाघुळांमधे झाल्याचं निदर्शनास आणणाऱ्या जिनोमिक (जिनोमिक्स = गुणसूत्र-संचाचं विज्ञान) संशोधनाला माध्यमांतून प्रसिद्धी मिळाली आहे. एक मोठीच चिंता डोकं वर काढतेय - घाबरलेली जनता व गैरमाहिती मिळालेले अजाण अधिकारी रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्याच्या भरात या अद्भुत जीवांचा संहार करतील असा धोका निर्माण झाला आहे. ...जरा लक्षात घ्या - पूर्वीदेखील असले उपाय निष्फळ ठरले आहेत.
वटवाघूळ हा प्राणी आपली कशी मोलाची मदत करतो, या प्राण्याला संरक्षण मिळणं किती अत्यावश्यक आहे, ते धोक्यात आलेल्या प्रजाती व जीवशास्त्रीय वैविध्यावर लक्ष केंद्रित करणारा पर्यावरणीय इतिहासकार या नात्यानं मी जाणतो. कोरोना विषाणूच्या फैलावाचं खापर वटवाघळांवर फोडण्याऐवजी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
वटवाघुळं आपल्या शरीरात इतके विषाणू का वागवतात, व मानव जेव्हा वाघळांची शिकार करतो, त्यांच्या अधिवासांत हस्तक्षेप करतो तेव्हा क्वचित हे विषाणू मानवामधे संक्रमित का होतात याचा खुलासा करण्याचा प्रयत्न मी लेखाद्वारे केला आहे.
उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी असणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. उड्डाणक्रियेत भरपूर ऊर्जा खर्ची पडते. ही ऊर्जा मिळवण्याकरता वटवाघळं फळं, कीटक यासारखा पौष्टिक आहार घेतात.
अन्नाच्या शोधार्थ भटकताना वटवाघळं वनस्पतींच्या सुमारे ५०० प्रजातींचं परागसिंचन (pollination) करतात - आंबा, केळी, पेरू, घायपात (agave) यांसारख्या फळांचा त्यांत समावेश होतो. कीटकभक्षी वाघळं आपल्या शरीराच्या वजनाइतके कीटक एका रात्रीत फस्त करू शकतात - डेंग्यू, मलेरिया, झिकासारखे रोग पसरवणारे डास हेदेखील वाघळांचं एक भक्ष्य आहे बरं.
वटवाघळं आपण खाल्लेल्या अन्नाचं 'ग्वानो' नामक लीद किंवा विष्ठेत रुपांतर करतात. ही विष्ठा समस्त परिसंस्थेचा कस वाढवते. कित्येक शतकांपासून ही विष्ठा खत म्हणून गोळा केली जाते, तीपासून साबण व प्रतिजैवकंदेखील (antibiotics) तयार केली जातात.
फळं व कीटकांचं जीवन हे सामान्यतः उत्कर्ष-अपकर्ष (boomand bust) चक्रानुसार चालतं. त्यामुळे बहुतांश वटवाघुळं दीर्घ कालावधीसाठी 'सुस्तसमाधी' वा 'शीतनिष्क्रियते'च्या (hibernation) अवस्थेत जातात. यादरम्यान त्यांच्या शरीराचं तापमान ०६ डिग्री सेल्सियस (४३ डिग्री फॅरनहाइट) इतका नीचांक गाठू शकतं. ऊब राखण्यासाठी वाघळं गुफांसारख्या उष्णतारोधक (heat-insulated) ठिकाणी एकत्र येतात, पंखांचं पांघरुण लपेटतात व परस्परांना बिलगून वस्ती करून राहतात.
जेव्हा फळं पिकतात, कीटकसदृश जीव जन्मू लागतात तेव्हा वाघळं आपल्या समाधीतून जागी होतात व अन्नाच्या शोधात उडत उडत बाहेर पडतात. आता वेगळीच अडचण निर्माण होते: उडण्यासाठी इतक्या प्रचंड ऊर्जेची गरज भासते की वाघळांची चयापचय गती विश्राम-काळातील गतीहून चौतीसपटीने वाढू शकते, आणि त्यांचं शारीर तापमान अंदाजे ४० डिग्री सेल्सियस (१०४ डिग्री फॅरनहाइट) इतकी उसळी घेऊ शकतं.
अशावेळी शरीर अति तापू नये म्हणून त्यांच्या पंखांतील रक्तवाहिन्यांमधून उष्णता विकिरित (radiate) होते. याचबरोबर वटवाघळं आपली आयाळ चाटून स्वतःला घाम आणतात आणि कुत्र्यांप्रमाणे धापा टाकतात. शिवाय ती दिवसा उन्हं पडलेली असताना आराम करतात व रात्रीच्या गारव्यात भक्ष्य मिळवण्याकरता बाहेर पडतात. अंधारात विहार करताना प्रतिध्वनि-स्थाननिश्चयनाची (echolocation) त्यांना लाभलेली क्षमता कामी येते.
वटवाघुळाचा माणसाशी असलेला संबंध कुत्रा, गाय वा व्हेल माशाहूनही निकटचा आहे मात्र वाघळं परकी भासतात, त्यांच्याशी असलेलं नातं अनुभवणं आपल्याला कठीण जातं.
सस्तन प्राण्यांच्या २६ गणांमधील; अगदी रदंत (rodents), मांसभक्षी (carnivores) अशा व्यापक गटांचा विचार केला तरी वटवाघूळ हा अत्यंत आगळावेगळा प्राणी आहे. प्रतिध्वनि-स्थाननिश्चयनाच्या सहाय्याने दिशा जाणून घेणारा, खरीखुरी उड्डाणक्षमता लाभलेला हा एकमेव भूचर सस्तन प्राणी आहे.
पुष्कळशी वटवाघुळं आकाराने लहान असतात, त्यांची चयापचय गती जलद असते पण ती धीम्या गतीने प्रजोत्पादन करतात व दीर्घायुषी असतात. शार्क मासा, हत्ती यांसारख्या अवाढव्य प्राण्यांमधे ही प्रकृती हमखास आढळून येते. बाह्य परिस्थिती अनुसार वटवाघळांच्या शरीराचं अंतर्गत तापमान १५ डिग्री सेल्सियस (६० डिग्री फॅरनहाइट) इतकं कमीजास्त होऊ शकतं - भवतालातील तापमानाशी साम्य राखण्याचा कासव, पालींसारख्या थंड रक्ताच्या प्राण्यांचा हा स्वभाव असतो.
अन्य प्राण्यांमधे संक्रमित झाल्यास त्यांना आजारी पाडतील असे कित्येक विषाणू वटवाघुळांच्या शरीरात असतात. सार्स व मेर्ससारख्या श्वसनविकारांना कारणीभूत ठरणाऱ्या जवळपास २०० कोरोना विषाणूंचा यांत अंतर्भाव होतो. वाघळांच्या शरीरात अनेक फिलोविषाणूसुद्धा असतात. ज्यांमधे मारबर्ग व कदाचित इबोलासारख्या, माणसाला प्राणघातक रक्तस्रावी ज्वराला बळी पाडणाऱ्या विषाणूंचा समावेश असतो.
सामान्यतः हे विषाणू वाघळांच्या शरीरात व परिसंस्थांमध्ये दडून असतात, त्यांपसून मानवाला इजा होत नाही. औषध वा अन्न म्हणून माणूस वटवाघुळांची धरपकड करतो, त्यांच्या अधिवासांवर आक्रमण करतो व आंतरप्रजातीय संक्रमणाचा धोका ओढवून घेतो. विशेषतः पकडलेल्या वाघळांना माणसं बकाल वातावरणात इतर वन्यजीवांच्या सान्निध्यात कैद करून ठेवतात. हे अन्य प्राणी विषाणू संक्रमणाचा 'मध्यस्थ पोशिंदा / यजमान' (intermediate host) ठरतात. कोविड-१९ जिथे उगम पावला त्या वुहानच्या ओल्या बाजारात नेमकं हेच घडलं असावं असं कित्येक संबंधित तज्ञांचं मत आहे.
रेबीजसारखे मोजकेच अपवाद वगळता आपल्या शरीरात वास करणाऱ्या कोणत्याही जंतुमुळे खुद्द वटवाघळं रोगग्रस्त होत नाहीत. याविषयी २०१९ साली करण्यात आलेल्या एका संशोधनाला माध्यमांतून प्रसिद्धी मिळाली आहे. या संशोधनानुसार वटवघळांमधे घडून येणाऱ्या 'जनुक उत्परिवर्तना'मुळे (gene mutation) ती विविध विषाणू अंगी बाळगूनदेखील रोगमुक्त राहतात. जन-आरोग्याच्या दृष्टीने या उत्परिवर्तनात रस निर्माण होणं स्वाभाविक असलं तरी नोव्हेल कोरोना विषाणू पैदा कसा झाला हे माहित व्हायचं असल्यास आपल्याला वटवाघुळाचं 'वटवाघूळ असणं' म्हणजे काय ते समजावून घ्यावं लागेल.
इतक्या साऱ्या विषाणूंचा वटवाघुळांवर दुष्प्रभाव का बरं पडत नाही? - (रोग)प्रतिकार यंत्रणेला चालना देणाऱ्या जनुक उत्परिवर्तनाची त्यांना मदत होत असणारच. पण 'वटवाघूळ हा उडू शकणारा एकमेव स्स्तन प्राणी आहे' हे या प्रश्नाचं मूलभूत उत्तर म्हणावं लागेल.
'सुस्तसमाधी'च्या काळात हजारो वाघळं गर्दी करून रहात असताना त्यांची थुंकी, विष्ठा व श्वासोच्छ्वास एकमेकांत मिसळत असतात. म्हणजेच त्यांच्या निवासस्थानात, गुहेमधे जंतुंच्या उत्पत्ती व संक्रमणाकरता आदर्श परिस्थिती निर्माण होते. परंतु वाघळं उडतात तेव्हा त्यांच्या शरीरात तीव्र अंतर्गत उष्णता निर्माण होते, जीमुळे शरीरातील विषाणूंचा मुकाबला करण्यास वाघळं सक्षम होतात असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. यालाच 'उडत्या ज्वराचं' गृहीतक (flight as fever hypothesis) म्हणूनही ओळखलं जातं.
उपद्रवी कीटकांचं भक्षण करणारं, पीक-फळांचं परागसिंचन करणारं, खत पुरवणारं वटवाघूळ - या प्राण्याचं पृथ्वीवरील अस्तित्व कितीकाळ टिकून राहील हे सांगणं मात्र आता मुश्किल आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर दि कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर आणि बॅट कॉन्झर्व्हेशन इंटरनॅशनल यांच्या म्हणण्यानुसार वाघळाच्या किमान २४ जाती गंभीररित्या धोक्यात आहेत व १०४ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. (उर्वरित अंदाजे २२४ जातींसंबंधी माहिती उपलब्ध नाही.)
मोठ्या प्रमाणावर होणारी कत्तल, छळ व अधिवास हरवणं हे वटवाघळांच्या जिवाला भेडसावणारे सर्वात मोठे धोके आहेत हे खरं, पण आपल्यातच निर्माण झालेल्या नव्या आजारांनीही वाघळं त्रस्त होतात.
वाघळांना ज्यामुळे 'पांढरनाक्या विकार' (white-nose syndrom) होतो अशा प्स्यूडॉजिम्नोअॅस्कस डेस्ट्रक्टन्स (Pseudogymnoascus destructans - Pd) नामक कवकीय (बुरशीस्वरूप) जंतुची नोंद उत्तर न्यू यॉर्कमधे सर्वप्रथम २००७ साली करण्यात आली होती. उत्तर अमेरिकेतील वाघळांच्या १३ जातींमधे या रोगाची प्रसार झाला आहे; धोक्यात असलेल्या ०२ जातींचासुद्धा यांत समावेश आहे.
हा Pseudogymnoascus destructans (Pd) कुठून उगवला याबाबत अद्याप ठोस माहिती नाही परंतु मागे कधीही वाघळांना या रोगाची बाधा झाली नव्हती हे तथ्य लक्षात घेतल्यास माणसाने हा रोगजंतु निर्माण केला असावा, किंवा त्यांच्यात सोडला असावा ही शक्यता नाकारता येत नाही. गुफांसारख्या थंड, दमट ठिकाणी ही बुरशी फोफावते. शीतनिष्क्रियतेत असलेल्या वटवाघळांवर ती वाढते. बुरशीमुळे वाघळांना अतिशय आगआग होऊ लागते, ती अस्वस्थ होतात व अन्नाचा तुटवडा असलेल्या ऋतूत आपली बहुमूल्य ऊर्जा गमावून बसतात. पांढरनाक्या रोगामुळे लाखो वटवाघळांचे प्राण दगावले आहेत, काही जातींतील ९०% वटवाघळं मृत्यूमुखी पडली आहेत.
वटवाघूळ हा आपणा मानवांना अगणित प्रकारे सहाय्य करणारा विलक्षण जीव आहे. तो नाहीसा झाला, तर हे जग रूक्ष, भकास व आणखी असुरक्षित होऊन बसेल. वाघळावर होणाऱ्या घृणास्पद अत्याचार व शोषणापासून आपण त्याला वाचवायला हवं - आपल्या अशा वर्तणुकीमुळे आपल्याही आरोग्याला धोका संभवतो.

नाइमेह् नाईमी (Naeemeh Naeemei) या इराणी चित्रकर्तीच्या 'ड्रीम्स बिफोर एक्स्टिंक्शन' चित्रमालेतील वटवाघुळं
|

आशिया खंडातील काही
प्रदेशांत आढळणारं 'लेसर फॉल्स
व्हँपायर वटवाघूळ' (Megaderma spasma)
चित्र: स्मिथ्सोनिअन
इन्स्टिट्यूट (नॅशनल म्युझिअम
ऑफ एशियन आर्ट)
|
Comments
Post a Comment