कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे

* ईमेल खातं बददल्यामुळे जुनी पोस्ट पुनःप्रकाशित करतेय * कोरोना विषाणू - दोष वटवाघळांचा नाही, माणसाचा आहे निक पॅटन वॉल्श, वास्को कोटोविओ | सी.एन.एन. , मार्च २०, २०२० मराठी भाषांतर: मुक्ता 'असरार' वटवाघूळ: अलिप्त, निशाचर, दाटी करून राहणारा प्राणी. वटवाघळाला कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत मानलं गेलं आहे. तथापि आपल्या दैनंदिन आयुष्यात उलथापालथ घडवणाऱ्या या रोगाचा प्रसार होण्यास वटवाघूळ जबाबदार नसून आपणच जबाबदार आहोत यावर काही वैज्ञानिकांचं एकमत आहे. प्राणिशास्त्रज्ञ व रोग-विशेषज्ञांनी सी.एन.एन.ला दिलेल्या माहितीनुसार मानवी वर्तणुकीतील बदल - मानव करीत असलेला नैसर्गिक अधिवासांचा विनाश; तसंच त्याचं प्रचंड संख्येने, जलदगतीने पृथ्वीवर संचार करणं - यामुळे आतापावेतो निसर्गात कुलूपबंद असणारे विकार मानवामधे वेगाने प्रवेश करत आहेत. कोरोना विषाणूची उत्पत्ती मुळात कशी झाली याचं खात्रीशीर उत्तर वैज्ञानिकांना अद्याप गवसलेलं नाही. संशयित प्रजातीतील जिवंत विषाणूचं पृथक्करण करता आल्यास त्याचा मूलस्रोत सिद्ध करता येईल - हे फार जिकिरीचं ...