रहाणीमान बदललं तर...? (in Marathi and English)
*ईमेल खातं बददल्यामुळे जुनीच पोस्ट पुनःप्रकाशित करतेय*
(दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जे. कृष्णमूर्तींच्या दैनंदिनीतून)
डॉक्टर A.
सांगत होता, की वैद्यकीय व्यवसायाद्वारे तो बक्कळ पैसा कमावतो, पण
प्रचलित वैद्यकातून खऱ्या अर्थाने रोगनिवारण होत नसल्याचं त्याला कळून
चुकलंय. ...प्रामाणिक व्याधीमुक्तीच्या कामात A. स्वतःला झोकून देऊ इच्छितो. परंतु तसं केल्यास त्याच्या सध्याच्या रहाणीमानात बदल घडणार. खुद्द A.ला याची पर्वा नाही, मात्र पत्नी, मुलंबाळं या बदलाला आक्षेप घेतील. A.नं आपल्याला योग्य वाटणारा मार्ग पत्करल्यास त्याच्या कौटुंबिक जीवनाला तडे जातील.
आप्तेष्टांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकणं, त्यांच्या हौसामौजा पुरवणं यात A.चा स्वार्थ गुंतला होता का?
आप्तेष्टांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकणं, त्यांच्या हौसामौजा पुरवणं यात A.चा स्वार्थ गुंतला होता का?
प्राप्त परिस्थितीत नेमकं काय उत्तरदायित्व होतं त्याचं??
ऐंद्रीय,
भोगवादी मूल्यं निर्माण करून, त्यांना शरण जाऊन आपण घोर सामाजिक विपत्ती,
युद्धं, क्रूराचार व दैन्याची पायाभरणी करत असतो, नाही का? उच्चभ्रू रहाणी
सांभाळून, तीवर भर देऊन आपण निष्ठुरता, स्पर्धेबाजी व अहंमन्यतेने भरलेलं
यंत्रवत्, बर्बर जग निर्माण करतोय, हो की नाही? ...बाह्य परिस्थितीला शरण
गेल्याने - मग ती कौटुंबिक वा समाजिक स्थिती असो – उद्भवणाऱ्या व्यक्तिगत
आणि व्यापक दुःखाला A. जबाबदार होता.
...खुद्द A.ला
साधी रहाणी मानवेल का? बाह्य डामडौल, छानछोकी गळून पडू देणं त्याला
स्वतःला शक्य होईल का? केवळ आंतरिक शांती, बोधाची श्रीमंती व
प्रेमपूर्णतेनिशी थोड्यावर समाधानी राहणं जमेल त्याला??
‘हे कसं साध्य करावं?’ - A.चा
प्रश्न. आत्मभानातून उपजणाऱ्या सम्यक् चिंतनाद्वारे ते साध्य होईल.
आत्मबोधाविना सम्यक् विचार शक्य नाही; सम्यक् विचाराविना प्रेम, शांती
अवतरू शकत नाही...
(From J. Krishnamurti's journal entries during the Wold War II years)
Dr A. said
he had his practice and was making a lot of money, but was convinced he
was not really curing. ...He wanted to go in for the true healing. That
would involve a different standard of living, to which he was
indifferent, but his wife and family would object; and the breaking-up
of the family would ensue if he followed what he thought was right. Was
it selfish on his part to yield to the demands of the family? What was
his responsibility?
In
building up and yielding to sensate values, are we not creating social
catastrophes, wars, ruthlessness, and misery? By having a high standard
of living and giving emphasis to it, are we not creating a mechanistic,
barbarous world of cruelty, competition, and pride?
...In
yielding to the environment, whether of the family or of the
civilization, he was responsible for the general misery and for his own
particular misery.
...Was he himself capable of living a simple life, stripped of the outer paraphernalia and show, content with little, because inwardly he was at peace, rich in his understanding, full in his love?
...Was he himself capable of living a simple life, stripped of the outer paraphernalia and show, content with little, because inwardly he was at peace, rich in his understanding, full in his love?
How,
he asked, was he to arrive at these things? - By right thinking through
self-awareness. Without self-knowledge there is no right thinking, and
without right thinking there can be no peace, no love...
Comments
Post a Comment