Posts

Showing posts from 2019

क्षमा

जिथे क्षमेला थारा नसेल तिथे केलेले अपराध झाकण्यासाठी आणखी अपराध करणं हा माणसाचा जीवनधर्म बनून जातो.

ती पहात राहि

वाटभर गाणी आम्ही द्यावी अंथरून ती पहात राहि खाली सांकवावरून सांजधीमे हासणे ते मोगरे वेचावे - घटकेत गेला सारा बहर सरून! भिजलेल्या पापण्यांना रुमाल कागदी नाव ही कागदी आता, जाईल तरून? सट! तिने रुष्टतेचे चाबूक ओढावे झाकावे ते वळ आम्ही मौन पांघरून

जी.ए. वाचताना

मोठ्याने वाचताना माझ्या लक्षात येतंय की त्यांची कथा जाहीररित्या वाचण्याजोगी नाही. तरीसुद्धा आज रात्री मी नेमकं तेच करणार आहे. मी ते का करणार आहे, मलाच ठावूक नाही. किंवा परवा-परवापर्यंत ठावूकही असेल पण आता ती आठवण गळून पडली आहे. जी.एं.ची कथा सावकाश वाचण्याजोगी आहे - सावकाश आणि सावध. हे फार महत्त्वाचं. मैल अन् मैल निर्जन रान तुडवताना प्रवासी भवतालापासून सावध होता पण स्वतःपासून त्यानं सावध राहणं तितकंच गरजेचं होतं. अभिवाचन वाईट होईल की बरं होईल, ते चांगलं व्हावं याकरता... काही करता येणार नाही. घडवणारा मी नाही, खुद्द जी.ए.देखील नाहीत. घडू देण्याखेरीज माझ्या हातात काही नाही. एक एक ओळ लाटेसारखी येऊ द्यायची; आपण वाळूत रुतलेला शिंपला आहोत, ओलं-कोरडं होत रहायचं. तरच जी.ए. वाचता येतील - मनात आणि जनांतही.
Politics is a distraction. Judiciary is a tedious, grand affair. Man likes tedious stuff, he prefers it over simplicity. Our law and order mechanisms seem no different than priesthood to me. They are middlemen created by us to avoid dealing with our adversary directly, face to face. Who knows what might happen! He/She might avenge me, attack me, kill me! I might do the same! Or one may find out that there isn't an adversary at all! That we can be friends, that a problem can be resolved with a little more understanding, patience, affection...opening our hearts a little wider. We create a myriad of systems and outsource the responsibility to deal with the most fundamental question: How are we to coexist? Each human must engage directly with this question. It is our question.

हवेतच

तुझी छाती सरसावते निळ्या स्वेटरमधे खांदे किंचित वळतात, हात मिठी होऊ लागतात मी गर्द निळ्या आकाशात आकाश माझ्या पाशात न संपणारी पाठ ते उंच टाचांचे काठ - हवेतच हवे ते विस्कटले अणुरेणू तर - उशाखाली येतो जुनाच निळा धागा सुईने सांधलेली एक-एक रिकामी जागा ठसक्यासारखी लागते एक-एक चाहूल आणि दचकून जागा होतोस तू. तू.. तू.. तू - तू समजलास काय, ग्रीक देव मानून तुला आम्ही पानांचा मुकुट चढवू? तुझ्याभवती नाचत राहू? - हो नाचू ना, पंख फुटेपर्यंत गाऊ, हलके हलके जुन्या कथेत रक्त ओतत जाऊ ...मग तुला जरा छळू तुझ्या नाजूsक आतड्यांशी खेळू. विष बदलतं, सुळे प्रत्येकीलाच असतात आणि असते तयारी तुमचे राग-लोभ न मोडता खाण्याची, आणि असते सवय प्रत्येक अवतारात तुम्हाला हातपाय झाडताना पाहण्याची तू बोलावत नाहीस पण तुझी डोक्यामागची बाजू ओळख देते जगाच्या अगदी त्याs टोकावरून... कुणास ठाऊक झुळकन् येईन, फुटक्या टाचांवर माया करून जाईन! बाई विझवून विझत नाही, जाळल्याशिवाय जळत नाही तिला पुरुषातलं काsही कळत नाही: पडला नसता की उठला नसता प्रश्न लोंबत्या नसा-मांसाचा, मागे चिकटलेला नसतास तू जर.

निनावी

घुमटभर प्रार्थना भांडणापाठी भावना पसऱ्यावर कविता उभ्याएत होत्या तशा, कळत नाही आपल्यालाच वाचाव्या कशा.

'युद्धस्य कथा अपि न रम्या' (युद्धच काय, युद्धाच्या कथादेखील रम्य नसतात)

Image
 ' अनुभव ' मासिकात (ऑगस्ट २०१७) मी पहिल्या महायुद्धावर लेख  लिहिला होता. निराळ्याच शीर्षकाखाली तो छापण्यात आला. काही महत्त्वाचे फेरफार करून तो लेख पुनःप्रकाशित करत आहे:   'War is the spectacular and bloody projection of our everyday life, is it not?'  - J. Krishnamurti '...The act of defense is already an attack. The calamity of war comes from the strengthning and magnifying of empty distinctions of self and other, strong and weak, attack and defense.' - Masanobu Fukuoka काही काळापासून दोन्ही महायुद्धांबद्दल सतत काही ना काही वाचते, पाहते. का बरं? - ती विषण्ण वर्णनं वाचून, आत्मक्लेश करून घेऊन 'युद्ध' नामक कायदेसंमत, लोकसंमत गुन्ह्याला बळी पडलेल्या / पडणाऱ्यांसाठी अखिल मानवजातीच्या वतीने आपण प्रायश्चित्त करत आहोत' अशी उदात्त भावना मी उगाच कुरवाळत असेन का? की एकीकडे हिंसेची घृणा करताना मानवातील अंगभूत हिंस्रपणाबद्दलचं, त्याच्या संहारसामर्थ्याबद्दलचं कुतूहल शमवणं मला आवडत असावं? माझ्यातल्या जराश्या चिथावणीने डिवचल्या जाण्यास उत्सुक पशूचं काय कर

कूसा-हिबारी

Image
मूळ इंग्रजी लेखक: लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो  (१८५० - १९०४ ) मराठी संपादन व भाषांतर: मुक्ता असनीकर Lafcadio Hearn AKA Koizumi Yakumo हर्न यांच्याबद्दल: 'पाश्चात्त्य जगाला जपानची ओळख करून देणारा कथाकार' असा लेखक -पत्रकार  लेफ्कादिओ हर्न ऊर्फ कोइझुमि याकुमो यांचा मुख्य लौकिक म्हणता येईल. १८९० पासून आपल्या मृत्यूपर्यंत (१९०४) ते जपानमधे राहिले, जपानी भाषा, संस्कृती आत्मसात केली, विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधून जपानी लोकसाहित्याचा संग्रह व अनुवाद केला, जपानी स्त्रीशी विवाह केला, जपानी नागरिकत्व स्वीकारलं. यामागे व्यावहारिक कारणं असतीलही परंतु गूढ श्रद्धांनी, वैचित्र्यपूर्ण चालीरितींनी नटलेल्या, निसर्गाशी नातं सांगणाऱ्या तत्कालीन जपानी जीवनशैलीबद्दल त्यांना जिव्हाळा होता हे तितकंच खरं. आधुनिक पाश्चात्त्य औद्योगिकतेच्या प्रभावाखाली ही संस्कृती नष्ट होणार याची त्यांना खंत वाटे.   कोणताही धूर्त राजकीय, धार्मिक वा व्यापारी हेतू न बाळगणारा, साम्राज्यवादाचा तिटकारा असलेला, वंशभेद न मानणारा 'गोरा' म्हणून जपान्यांनीही त्यांच्यावर माया केली. 

Two words rooted in pain

I asked where anger comes from. it said 'where hunger comes from'.

untitled

you are branded with my kiss now there isn't a thing I miss

त्र्यूफोची नजर पाहताना... ०१

Image
 *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*    त्रूफोची नजर पाहताना... ०२      त्रूफोची नजर पाहताना... ०३ '..देर्निए मेत्रो'चं पोस्टर. एक बाई आणि पुरुष अंधारातून रोखून पाहताहेत. पुरुषाने झडपेसारखं काहीतरी उचलून धरलं आहे, त्यावर नात्सींचा झेंडा रंगवलेला. हे तर स्वतःच लपून बसल्यासारखे वाटतायत. यांचे डोळे सांगतायत की यांच्या छातीत धडधडतंय. संध्याकाळी लगोलग फिल्म पाहिली. चला, पाहता पाहता पोस्टरमधला स्टिल (स्थिरचित्र) नेमका कोणत्या दृश्यात आहे / कोणत्या दृश्यावरून प्रेरित आहे ते शोधून काढू. .. मारिआँच्या हातात कंदील आहे. मारिआँ (Marion) व बेर्नार (Bernard) अंधाऱ्या तळघरात उतरतात. तिथे मारिआँचा ज्यू नवरा, नाट्यदिग्दर्शक लुका श्ताइनेर (Lucas Steiner) गुप्तपणे राहतो आहे. तळघर तपासण्याकरता आलेल्या पोलिसांपासून लुकाचं अस्तित्व तडकाफडकी लपवण्याकरता मारिआँला बेर्नारची मदत हवी आहे. पोलिस तळघरात उतरतात. लुका आणि बेर्नार अंधारातून श्वास रोखून पाहत राहतात. सारे निघून गेल्यानंतर दोघेजण अडगळीतून बाहेर येतात. लुका म्हणतो "बायको सुंदर दिसते न

V स

तू आठवतेस आणि कित्ती आठवत जातेस आठवताना याचं आश्चर्य वाटतं. इतक्या गप्पा झाल्या? इतकी पत्रं आली, गेली? आकर्षणबिंदू असेल एखादा, भिंगातून तपास केल्यावर सापडेलही - तू पर्वताएवढी वाटली नाहीस तरी मी मुंगीएवढी वाटत राहिले मला. पहिला दिवस खिडकीबाहेर तुझा आवाज - खिडकीखाली तू गोबऱ्या गालांवर घसरणारी सकाळ, शुभ्र पातळ शर्टचा रंग बदलणारं ऊन ... माझ्या काळ्या डोळ्यात तेव्हा पडलेल्या पांढऱ्या ठिपक्यामुळे तू इतकी आठवतेस का?

Māyā

The world may or may not be  Māyā (माया), our perception of it is.

Respect for life means respect for death

I had a little chat with a friend who wishes to start a school with a radically different approach to education. In the course of our discussion he mentioned 'accountability' towards children (students). Here's what I jotted down later : The phenomenon called 'death' must be understood as we talk of accountability. What are we when we are accountable? What does it mean to be answerable? To whom? If caring means preventing danger, to what extent can one care? Does it mean preventing death, 'the ultimate danger' according to man? It is only when we fully accept the probability of death - without seeking it or inventing it - that we can love life. It may seem heart-wrenching, it may seem a terrible loss but we are more interested in escaping what we feel. We never learn to live in presence of death. We endure all of life's travails but constantly deny the inherent risk in being alive, and the inevitable end. Thus life becomes a circus. Agein