ती पहात राहि

वाटभर गाणी आम्ही द्यावी अंथरून
ती पहात राहि खाली सांकवावरून

सांजधीमे हासणे ते मोगरे वेचावे
- घटकेत गेला सारा बहर सरून!

भिजलेल्या पापण्यांना रुमाल कागदी
नाव ही कागदी आता, जाईल तरून?

सट! तिने रुष्टतेचे चाबूक ओढावे
झाकावे ते वळ आम्ही मौन पांघरून

Comments