हवेतच
तुझी छाती सरसावते
निळ्या स्वेटरमधे
खांदे किंचित वळतात, हात
मिठी होऊ लागतात
मी गर्द निळ्या आकाशात
आकाश माझ्या पाशात
न संपणारी पाठ ते उंच टाचांचे काठ
- हवेतच हवे ते विस्कटले अणुरेणू तर -
उशाखाली येतो
जुनाच निळा धागा
सुईने सांधलेली
एक-एक रिकामी जागा
ठसक्यासारखी लागते एक-एक चाहूल
आणि दचकून जागा होतोस तू.
तू..
तू..
तू - तू समजलास काय,
ग्रीक देव मानून तुला
आम्ही पानांचा मुकुट चढवू?
तुझ्याभवती नाचत राहू?
- हो नाचू ना, पंख फुटेपर्यंत गाऊ,
हलके हलके जुन्या कथेत रक्त ओतत जाऊ
...मग तुला जरा छळू
तुझ्या नाजूsक आतड्यांशी खेळू.
विष बदलतं, सुळे प्रत्येकीलाच असतात
आणि असते तयारी
तुमचे राग-लोभ न मोडता खाण्याची,
आणि असते सवय
प्रत्येक अवतारात तुम्हाला
हातपाय झाडताना पाहण्याची
तू बोलावत नाहीस पण
तुझी डोक्यामागची बाजू
ओळख देते जगाच्या अगदी त्याs टोकावरून...
कुणास ठाऊक झुळकन् येईन,
फुटक्या टाचांवर माया करून जाईन!
बाई विझवून विझत नाही, जाळल्याशिवाय जळत नाही
तिला पुरुषातलं काsही कळत नाही:
पडला नसता की उठला नसता प्रश्न
लोंबत्या नसा-मांसाचा,
मागे चिकटलेला नसतास तू जर.
निळ्या स्वेटरमधे
खांदे किंचित वळतात, हात
मिठी होऊ लागतात
मी गर्द निळ्या आकाशात
आकाश माझ्या पाशात
न संपणारी पाठ ते उंच टाचांचे काठ
- हवेतच हवे ते विस्कटले अणुरेणू तर -
उशाखाली येतो
जुनाच निळा धागा
सुईने सांधलेली
एक-एक रिकामी जागा
ठसक्यासारखी लागते एक-एक चाहूल
आणि दचकून जागा होतोस तू.
तू..
तू..
तू - तू समजलास काय,
ग्रीक देव मानून तुला
आम्ही पानांचा मुकुट चढवू?
तुझ्याभवती नाचत राहू?
- हो नाचू ना, पंख फुटेपर्यंत गाऊ,
हलके हलके जुन्या कथेत रक्त ओतत जाऊ
...मग तुला जरा छळू
तुझ्या नाजूsक आतड्यांशी खेळू.
विष बदलतं, सुळे प्रत्येकीलाच असतात
आणि असते तयारी
तुमचे राग-लोभ न मोडता खाण्याची,
आणि असते सवय
प्रत्येक अवतारात तुम्हाला
हातपाय झाडताना पाहण्याची
तू बोलावत नाहीस पण
तुझी डोक्यामागची बाजू
ओळख देते जगाच्या अगदी त्याs टोकावरून...
कुणास ठाऊक झुळकन् येईन,
फुटक्या टाचांवर माया करून जाईन!
बाई विझवून विझत नाही, जाळल्याशिवाय जळत नाही
तिला पुरुषातलं काsही कळत नाही:
पडला नसता की उठला नसता प्रश्न
लोंबत्या नसा-मांसाचा,
मागे चिकटलेला नसतास तू जर.
Comments
Post a Comment