पक्षीकर्ती
*ही मुलाखत मी घेतलेली नाही. एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतील निवडक अंशांचं हे भाषांतर आहे. सदर मुलाखतीवर, तसेच छायाचित्रांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा वा तिच्या भाषांतराद्वारे कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.*
...‘ती’ काय करते? ती पक्षी पाहण्यात रमते, पक्ष्यांच्या प्रतिकृती निर्माण करते. विविध शहरांतील, खेडेगावांतील शाळांमधून, पर्यावरण-उत्सवांमधून वन्यजीव संवर्धनाबद्दल संवाद साधते. ‘पेपर चर्र्प्स’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला तिच्या कारागिरीची झलक दिसते. मुख्यतः कागद वापरून साकारलेल्या अत्यंत देखण्या, बारकावेयुक्त प्रतिकृती बघताना आपण थक्क होऊन जातो.
दिल्लीस्थित या तरुणीचं नाव आहे निहारिका रजपूत.
तुझ्या पहिल्यावहिल्या पक्षीकृती बद्दल काही सांगशील?
२०१६ साली इंग्लंड मधील ‘बर्डर्स अगेन्स्ट वाइल्डलाइफ क्राईम’च्या जनजागृती मोहिमेकरता मी हेन हॅरिअर (Circus cyaneus) प्रजातीच्या हारीण पक्ष्याच्या काही प्रतिकृती बनवल्या. आजघडीला मी ज्या तऱ्हेच्या प्रतिकृती घडवते त्यांची ती सुरुवात म्हणता येईल.

निसर्गप्रेरित कलेकडे मुळात कशी वळलीस तू?
कॉलेजात असताना मी नव्या दिल्लीतील ‘पीपल ट्री’ या कलात्मक उत्पादनांच्या बुटीकमधे उमेदवारी (internship) करत होते. तिथे मी पुष्कळ थ्री-डी चित्रकला करत असे. बांबू, सुतळी-दोरा अशा विविध साहित्यापासून शिल्पांच्या रूपाने मी ती चित्रं प्रत्यक्षातदेखील आणत असे. एपॉक्सी वापरून पक्ष्यांची अगदी ढोबळ रूपातील शिल्पं साकारण्याचं कौशल्य मी त्याठिकाणी आत्मसात केलं. मात्र शिल्पं आणखी वास्तववादी व्हावीत यादृष्टीने प्रयोग करणं आवश्यक होतं. २०१५ साली हिमाचल प्रदेशात गेले असताना लाल-चोच्या निळ्या मॅगपाय पक्ष्यांचा (Urocissa erythroryncha) थवा देवदार वृक्षावरून झेप घेत असता पाहिलं मी... अन् आपसूकच पक्ष्यांच्या आणखी प्रतिकृती निर्माण करू लागले. नानाप्रकारचं साहित्यं वापरून, प्रयोग करत, शिकत, चुकत, सुधारणा करत आज जी प्रक्रिया अवलंबते तिथवरचा पल्ला गाठला.
आजवर तुझ्या हातून पार पडलेला सर्वांत आह्वानात्मक, दीर्घकालीन प्रकल्प कोणता?
किंगफिशरचं एक शिल्प पूर्ण करण्यास मला तीन महिने लागले. लंडनमध्ये आयोजित केल्या गेलेल्या एका वन्यजीव कलास्पर्धेसाठी मी ते साकारलं. ...त्या कृतीबद्दल खरं म्हणजे मोठी गोष्टच सांगता येईल. दोन पक्ष्यांमधे चाललेली देवघेव, संवाद त्यात दिसून येतो, थोडाफार पक्ष्यांचा भवतालही दिसतो. एका पक्ष्याच्या चोचीत मासा आहे — मासा घडवण्याची ही पहिलीच वेळ. दोन्ही किंगफिशर्सच्या अंगस्थिती (postures) अतिशय आह्वानात्मक असल्यामुळे काम पूर्ण होण्यास इतका अवधी लागला. हे शिल्प मी अगदी सावकाश, शांतचित्ताने साकारलं, कारण त्यात गडबड करून, चुका करून अजिबात चालणार नव्हतं.
वन्यजीव संवर्धनात कलाकार कशातऱ्हेची भूमिका निभावू शकताे असं तुला वाटतं?
लडाखमधील मुलांसोबत कार्यशाळा घेताना 'तुमच्या भागात कुठकुठले पक्षीप्राणी आढळतात' हा प्रश्न मी विचारते. यावर मुलांकडून 'हत्ती', 'वाघ', 'सिंह' अशी उत्तरं येतात - वास्तविक पाहता लडाख प्रांतात यापैकी कोणताही प्राणी आढळत नाही. म्हणजेच मुलांना, विद्यार्थ्यांना, स्थानिक जनतेला आपापल्या प्रदेशाची व्यवस्थित ओळख करून देणं गरजेचं आहे. मूलभूत गोष्टींबद्दलच अज्ञान असेल तर 'संवर्धनाच्या कामात स्थानिकांचा सहभाग असावा' ही अपेक्षा आपण कशाच्या आधारे करत आहोत?

तुझी दिनचर्या कशी असते?
सकाळी मी पायी फेरफटका मारायला बाहेर पडते. पक्षी-निरीक्षण करते. कधी दुर्बीण बाळगते, कधी माझा चष्माच पुरेसा ठरतो. नंतर मी कामाला लागते. टीव्ही/कॉम्प्यूटरवर पक्ष्यांवरील एखादा माहितीपट लावते. तो बघत-ऐकत काम करते. प्रतिकृतीच्या प्रक्रियेतील एखाद्या नवीन पायरीवर रोज काम चालू असतं. पण कागद कापून पिसं बनवण्यासारख्या काही पायऱ्यांमधे तोचतोपणा असतो, त्यांना बराच वेळ द्यावा लागतो.

(ही मुलाखत घेतली गेली तेव्हा) तुझ्या आगामी प्रकल्पांबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल.
सध्या हाती घेतलेली हमिंगबर्ड्सच्या प्रतिकृतींची मालिका पूर्णत्वाला नेऊन अधिकाधिक हमिंगबर्ड्स साकारण्याचा माझा मानस आहे. येत्या काळात त्यांचं प्रदर्शन भरवण्याचा विचार आहे. डोक्यात भरपूर योजना, कल्पना घोळत असतात. मला वाटतं आयुष्यभर पुरेल इतकं काम आहे माझ्या हातांत!

Comments
Post a Comment