गंधावर्त
सायंकाळ होताना तुमची डॉर्मिट्री जवळपास रिकामी असायची, तेव्हा यायचे मी कधीकधी – तूही नसायचीस तेव्हा.
मी तुझं व तुझ्या बंक पार्टनरचं सामायिक कपाट उघडायचे, एकामागून एक तुझे कॉस्मेटिक्स बाहेर काढायचे, हुंगून पहायचे, पुन्हा कप्प्यात ठेवून द्यायचे. आमच्या खोलीसारखीच ही मोठ्ठी खोली, बंकबेड्सने भरलेली. पण इथे उजेड खूपवेळ रेंगाळायचा. प्रसंगी हजर असलेल्या कुठल्याच मुलीनं तुझ्यापाशी चुगली केली नसावी. त्यांना वाटत असेल तुझी परवानगी आहे मला.
मॉइश्चराइजर, दोन प्रकारची तेलं, शांपू, सनस्क्रीन, लिपबाम, काजळ, इम्पोर्टेड काहीतरी - परक्या शब्दांकडे पाहता पाहता बारीक अक्षरांत लिहिलेला इंग्रजी अर्थ कायम विसरायचे मी. कप्प्यात मागच्या बाजूला जादा साबणांची एक-दोन खोकी, औषधी मलमं.. हं, टॅल्कम पावडर वापरत नाहीस. पण... 'तो' गंध हवाय मला..कुठाय तो?
प्रत्येक खोक्याचा, बाटलीचा, डबीचा मी आतून-बाहेरून वास घ्यायचे. तुझ्या पलंगाच्या उशाशी भिंतीला टेकवून ठेवलेला 'कोआला' – विमानात बसून, ऑस्ट्रेलियाहून आलेला – बिनपापण्यांच्या डोळ्यांनी सारा उद्योग पहात असायचा. त्याच्या नजरेत नापसंती दिसायची, पण त्यानंही तोंड उघडलं नसावं कधी. तो सर्वकाळ सर्वांकडेच किंचित संशयानं पहायचा. कुणाला त्याचं फारसं कौतुक नव्हतं – त्यावेळी कोआलाची ‘क्रेझ’ नव्हती. त्याचे केस खरखरीत, नखंही अस्सल जंगली वाटावी इतकी टोचरी. तुझा तो लाडका.
आणि तू – तुझ्या वासानं नादवलं होतं मला. 'वास' म्हणणं मान्यच नव्हतं, 'गंध' म्हणायचे मी त्याला.
त्यादिवशी रडता रडता मिठी मारलीस तेव्हापासून सगळं नुसतं अस्वस्थ अस्वस्थ - केसांचा ओलसर गारवा, आसवांची ऊब, तो गंध. केलं काय मला त्यानं?
माझा घोडा आपणहून बाजूला झाला. वेगळाच घोडा बेफाम दौडत होता माझ्यात. अस्सं. पण शिरला कसा तो या रानात? ..मी अनेकवार तुझ्या कप्प्यात हात घातला. काळजीपूर्वक तपास केला. त्या बाटल्या, त्याच डब्या आणि तेच संथपणे कमी होत जाणारे आतले पदार्थ. खाली अंथरलेला स्वच्छ कागद. कुठे डाग नाहीत, कशावर चिकटा नाही. शक्य तितक्या अचूकपणे मी सारं जागेवर ठेवत असे. ...त्या रात्री तुझं सांत्वन करत तुझ्या अंगालागी तसंच उभं रहावं अशी तीव्र इच्छा ज्यामुळं झाली, तो गंध - त्याचा छडा लागलाच पाहिजे. ती बाटली सापडताच सरळ खिशात टाकायची, संधी साधून मैदानाजवळच्या कुंपणावरून बाहेर भिरकावायची (यानं तुझं फार नुकसान होणार नव्हतं) म्हणजे ही फणफण उतरेल, तडफड थांबेल - अशी माझी कल्पना होती.

कपाट बंद केल्यावर साधारण पाच-दहा मिनिटांत खो-खोचा शेवटचा डाव संपवून तुमची टीम डॉर्मिट्रीत यायची. घामाचा दर्प, बडबडीची लाट यायची. मातकट कपडे, दमलेले केस - त्याही अवस्थेत तुझ्यावर लपून बसल्यागत तो गंध जाणवायचा. ...तुला सांगितलं नाही मी - तेव्हाही, नंतरही.
आंघोळीची तयारी करण्यासाठी तू कपाट उघडायचीस. दोन-तीनदा, मला आठवतं, डोळे बारीक करून आपला कॉस्मेटिक्सचा विभाग तू निरखलास. शेजारल्या पलंगावर बसून, हातांवर रेलून मी तुझ्याकडं पहात असायची. कपाट लावता लावता तुझं लक्ष जायचं माझ्याकडे, तेव्हा छानसं हसत मानेनंच विचारायचीस: 'काय, अं?'
एकदा तू बंक-पार्टनरला झापलंसदेखील माझ्यासमक्ष. "अगं कुणीतरी आपलं कपाट उचकतंय."
"अच्छा? काही गायब झालं का?"
"नाही गं, तसं नाही पण.. तुझे कप्पे नाहीत का विस्कटलेले? मी दिवसभर ग्राउंडवर असते, तुला माहित आहे - मॅचेस जवळ आल्यात. जरा लक्ष देत जा कपाटाकडे - की मागल्यावेळप्रमाणं तूच वापरलंस काहीतरी? ...हरकत नाही, पण सांगून घ्यायचं ना....."
मी तुझ्याकडे पहात बसून होते शेजारच्या पलंगावर. आपली नजरानजर होताच झापणबिपणं सुचेना तुला. पुढे अवाक्षर न बोलता आम्हाला पाठमोरी होऊन तू कपड्यांना घड्या घालू लागलीस.
गंध कॉस्मेटिक्समधे नव्हता हे पुरतं समजलं. उचकापाचक बंद. फक्त वाट पहायची तुझी.
आपण गप्पा मारायचो, पहाटे मुख्य गेटपर्यंत एकत्र फेरी मारायचो. विशेष काही नाही. का बाळगत होतीस मला तू? का घोटाळू देत होतीस स्वतःभवती? हो! हो, मला वाटायचं 'तू मला बाळगते आहेस, आणि मला ठाव नसलेलं काहीतरी त्यात आहे'! गंधाचं वेड दूर जाऊ देत नव्हतं. विचारण्याचं धाडस होत नव्हतं.

सर्व डॉर्मिट्रीजना हंड्याच्या आकाराची, गेरू रंगाची बाल्कनी होती. शनिवारी रात्री कोआलाला घेऊन तिथं बसायचीस त्यावेळेत तुला कोणाशीही भेटायचं-बोलायचं नसे. तुमच्याइथं सर्वांना माहित होतं.
मी थेट बाल्कनीचं लाल दार वाजवलं. दारापासच्या पलंगावर बसलेल्या घोळक्यानं गप्पा थांबवून मला इशारा केला. मीदेखील खुणेनं सांगितलं: 'ती आणि मी काय ते बघून घेऊ'.
"कोण आहे?"
"मी."
"अच्छा? 'मी' कोण?"
"..मी. ...दार उघड."
"का?"
"उघड ना."
"का."
"उघड ना... दोन मिनिटं. प्लीज."
जेमतेम शिरता येण्याएवढी फट दारात निर्माण झाली.
"काय गं?"
"मी.. म...."
"बस."
मी तुझ्याशेजारी. माझ्याशेजारी अरूंद कोपऱ्यात कोआला.
आकाशात पौर्णिमा, भवती अस्तर-अंधार. मी तिरमिरीत तुझ्याकडे वळून तुझ्या नाकाखाली ओठ ठेवले. पुढल्या क्षणी ते तुझ्या ओठांवर नीटच घसरले. तुझे ओठ रेखीव, पूर्णाकार - उमलले. खुद्द तोंडांची, जिभांची, नाकांची, जिवण्यांची, दातांची परस्परांना भेटण्याची ही तऱ्हा होती. खो-खो खेळणाऱ्या, कार्यक्रमांचं नियोजन करणाऱ्या तुला; गाणाऱ्या, इतिहास, व्याकरण समजावून सांगणाऱ्या मला ठावूक असो वा नसो, शरीराला ती बरोब्बर ठावूक होती. शरीर नेहेमी तयार असतं का साऱ्यासाठी? - आपल्याला पत्ताच नसतो या तयारीचा? एकमेकांच्या लाळेत जिभा लोलवण्याबद्दल, दातांनी ओठांचा घास घेण्याबद्दल आपलं काय मत आहे, काय कल्पना आहेत - बकवास झटकून शरीर पाहिजे ते मागत होतं, मिळवत होतं.
माझा अंगठा तुझ्या गालावर, बोटं मानेवर ठसली होती. दुसरा हात तुला जमेल तसा कवटाळत होता. तुझे दोन्ही तळवे माझ्या गालांवर होते. त्यांच्या पोकळीत दमटपणा जाणवत होता. टेकड्यांच्या दिशेने निघालेला गार वारा अर्ध्या बाह्यांतून आत घुसत होता. आपले श्वासोच्छ्वास दारापलीकडे ऐकू गेले नसतील ना..?
तू मला अलगद दूर सारलंस. मी डोळे उघडले. दारावर दबून विस्कटलेले केस सावरत, श्वासांचे लगाम खेचत तू म्हणालीस: "झाली दोन मिनिटं."
निमूट आत आले मी. सांडलेला चंद्रप्रकाश गोळा करून घेत दार हलकेच बंद झालं.

गंध तुझा होता. त्याला नाव असो-नसो, त्याचं भान असो-नसो; तुला - तुझ्यावर तो असणार होता. 'उत्तर मिळालं. शोध संपला. आता तिला त्रास द्यायचा नाही' - मी स्वतःला बजावलं, व त्याबद्दल स्वतःचाच राग-राग केला.
आपण पुन्हा भेटू लागलो, गप्पा मारू लागलो, 'वॉक'ला जात राहिलो - 'तिकडे' मात्र फिरकलो नाही.
तू बोलावलंस. मी आले.
आता तू 'सीनियर' होतीस, तुम्हाला इस्टर्न ब्लॉकमधे स्वतंत्र खोल्या होत्या. वाटलं, केवळ असली ऐट मिळते म्हणून इथून बाहेर पडायला नको होतं.
सॅक जमिनीवर ठेवून मी खोलीभर नजर फिरवली: 'नॉट बॅड'.
"कशी आहेस?"
"तू कशी आहेस?"
"ए, मी आधी विचारलं -"
"मग? मी जास्त मनापासून विचारलं! सांग आता."
मी काही बोलले नाही. गंधाचा वेध घेत राहिले. चक्क पत्रालाही होता तो - की भास झाला मला?
नजरेत नजर घालून आपण काय पहात होतो?
"मी हवीय ना तुला?"
माझ्या घशातून आवाज फुटेना.
"- हवीय ना?"
मान गुपचूप हलली. तू थट्टेत हसशील असं वाटलं.
तू हसलीस - त्यात थट्टा नव्हती.
गुडघे गादीत रोवून तू उठलीस. बंद खिडक्यांचे पडदे सारलेस.
माझ्याजवळ बसत कुजबुजलीस: "घे मग."
गंधाची माळ माझ्या गळ्यात चढली.
Comments
Post a Comment